शिरूर तालुक्यातील आण्णापुर येथे पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून बेकायदेशीर हातभट्टी व्यवसाय उध्वस्त केला. हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त.
Contents
- 1 Breaking Mews Police Action at midnight near Shirur
- 2 Breaking News Police Raid at Midnight Target Yevalematha :
- 3 गुप्त सुत्राकडून मिळाली माहिती–
- 4 Breaking News Police Raid at Midnight Action सुरु —
- 5 400 लिटर कच्चे रसायन, 35 लिटर तयार हातभट्टी दारू 43 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल—-
- 6 आरोपी येवलेमाथा, आण्णापुरचे—-
- 7 आरोपीनी जवळच्या झाडाझुडपात धूम ठोकली—
- 8 शिरुर पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल—
- 9 अधिक ‘सत्यशोधक’ बातम्या पुढे-
Breaking Mews Police Action at midnight near Shirur
11 May 2026 | सत्यशोधक न्यूज टिम
शिरूर तालुक्यातील आण्णापुर गावच्या हद्दीत शनिवारी रात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बेकायदेशीर हातभट्टी व्यवसायाचा पर्दाफाश झाला.
Breaking News Police Raid at Midnight Target Yevalematha :
येवलेमाथा परिसरातील विहिरीजवळ सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीवर पोलिसांनी अचानक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर कच्चे रसायन, तयार दारू आणि भट्टी साहित्य जप्त केले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेत झाडाझुडपांतून पसार झाले.
गुप्त सुत्राकडून मिळाली माहिती–
शनिवारी रात्री सुमारे 9.50 वाजण्याच्या सुमारास येथील पोलीस पथकाला येवलेमाथा परिसरात बेकायदेशीर गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस अंमलदार सागर कैलास बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाड टाकली.
Breaking News Police Raid at Midnight Action सुरु —
पोलिसांनी विहिरीजवळील झुडपांच्या आड सुरू असलेला संपूर्ण अड्डा पाहून धक्का बसला. तीन दगडांच्या चुलीवर मोठे लोखंडी बॅरल तापवले जात होते. काही बॅरलमध्ये कच्चे रसायन उकळत होते, तर एका निळ्या कॅनमध्ये तयार गावठी दारू विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती आणि धुराच्या लोटांमध्ये संपूर्ण अवैध कारखाना सुरू असल्याचे दिसून आले.
400 लिटर कच्चे रसायन, 35 लिटर तयार हातभट्टी दारू 43 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल—-
पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 400 लिटर कच्चे रसायन, जळके रसायन असलेले बॅरल, चुलीवरील लोखंडी ड्रम, स्टीलचे चाटू आणि 35 लिटर तयार हातभट्टी दारू असा एकूण 43 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त साहित्यामध्ये निळ्या आणि काळ्या रंगाचे मोठे बॅरलही आढळून आले.
आरोपी येवलेमाथा, आण्णापुरचे—-
या प्रकरणात भाऊसाहेब इब्राहिम गव्हाणे, सतपाल इब्राहिम गव्हाणे आणि रावसाहेब इब्राहिम गव्हाणे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही येवलेमाथा, आण्णापुर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हातभट्टी कोणत्याही परवान्याविना सुरू होती. मानवी आरोग्यास गंभीर हानी पोहोचवणाऱ्या रसायनांपासून दारू तयार केली जात होती. ही दारू परिसरातील ओळखीच्या लोकांना विक्री करण्यासाठी साठवून ठेवण्यात आली होती.
आरोपीनी जवळच्या झाडाझुडपात धूम ठोकली—
मात्र पोलीस आणि पंच घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत जवळच्या झाडाझुडपात धूम ठोकली.
शिरुर पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल—
या प्रकरणी येथे भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटींग करत आहेत. प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे.
Breaking News Police Raid at Midnight या घटनेमुळे ग्रामीण भागात अजूनही सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी व्यवसायामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. स्वस्त नशेच्या आहारी गेलेल्या अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना, पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा अवैध धंद्यांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.
अधिक ‘सत्यशोधक’ बातम्या पुढे-
Shirur Accident News : उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू
Shirur Crime : सख्या भावाला जीवे मारण्याची धमकी! गुन्हा दाखल.
🙏 सत्यशोधक न्यूजला सहकार्य करा
स्वतंत्र, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी
तुमचे आर्थिक सहकार्य महत्त्वाचे आहे.
आपले छोटे सहकार्यही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे ❤️
