Contents1 नाशिकच्या बाबांची महा-लीला : (उपरोधिक विनोदी मराठी कविता)1.1 About The Author1.1.1 Dr.Nitin Pawar1.2 ❤️ Support Satyashodhak Blog नाशिकच्या बाबांची महा-लीला : (उपरोधिक विनोदी मराठी कविता) 22 मे 2026 — नाशिकच्या बाबांची महा-लीला कथा! — सान्स्कृतिक नाशिक नगरी गाजत होती, —पोस्टर होते चौकाचौकात ‘सुटबुटातले’, —“बाबा आले,अनेकांचे भाग्य उजळले!” —‘लुगड्यान्ची’ लाईन लागली भक्तगणात! — कोणी म्हणे खरेच “दैवी शक्ती”, — कोणी म्हणे नव्हे – “साक्षात ज्ञानी”, —- बाबा उभे ‘ताठ'(😅) मात्र AC रूममध्ये, —- मोजत होते नोटा आणि ‘वेगळेच’ पाणी! — गळ्यात मोठी रुद्राक्षमाळ, —- डोळ्यात भारी ‘गरम’ गूढ प्रकाश, —- भक्तीनी म्हणती – “देवच अवतरला!”, —– आतून सुरू होता पैशांचा घमघमाट ! —– कधी अप्सरा,गोर्या यक्षिणी,चिकणे मुखडे, —- कधी ग्रहांचा उलटा ‘मागून’ खेळ, —– जो जास्त जरी घाबरला पुढे, —– त्याच्याबरोबर तसा जास्तच मेळ! — एका ‘गजगामिनी’ ताईनी म्हटले बाबा, —-“अग अग तुझ्यावर ही काळी सावली!” — उपाय म्हणून एकान्तात पाच ‘पू’जा, — आणि फी भारी वेगळी,लय भारी, लय भारी! —- एका काकांनी तरी विचारलं, —- “मुलगी पास होईल का?” —- बाबा म्हणाले “शनी आहे रागात!” —- आणि घेतले हातात दोन दोन नारळ पहा! — कोणी आणे भेट सोन्याची चैन, —- कोणी घेऊन येई हार, —- बाबांच्या त्या “स्पेशल दर्शनाला”, —– UPI वरती लागले भार! —- मोबाईलवर मागणी फुल व्हिडीओ भक्ती स्टेटस, —– Facebook वर ‘तोंडात’पाहून जयजयकार, —- Reels मध्ये बाबा झाले ट्रेंडिंग —– गोगल जणू काही फिल्मस्टारवाला ! —– “बाबांच्या मिळे कृपेने नोकरी!”, —– “बाबांच्या कृपेने ठरली लग्ने!”, —- असं म्हणत म्हणत ‘भक्ती’ वाढली, —- जसा वाढतो online hot seen scam! —- आश्रम झाला भारी मोठा, — गाड्या आल्या काळ्या काचा, —- भक्त म्हणती ‘वेगळा”चमत्कार’!” —- शेजारी म्हणती “काय असते काचामागे?” —- कुणी म्हणे “रात्रीच देवी येते”, —- कुणी म्हणे “भिंतीआड उपचार !”, —- अहो पण CCTV लागल्यावर?, —- सगळे चमत्कार पळतात! —- पत्रकार आले, बातम्या आल्या,व्हिडीओ आले, —- Breaking News चा पाऊस पडला , —– “मुद्दा बाबांच्या गूढ साम्राज्याचा” —- TRP वर धंदा मोठा झाला! —- लॅपटॉप, पेनड्राइव्ह, फायली,व्हिडीओ, —- पोलीसांनी केल्या जप्त, — भक्त म्हणाले “नाही, नाही, हे षड्यंत्र आहे!” —- पण गाव झाले थोडे साशंक! — ईडी आली,’वेडी’चौकशी झाली, — कोट्यवधींची चर्चा झाली भारी, —- कालपर्यंत तो कसा साधूबाबा? — आज म्हणती “आर्थिक अधिकारी!” — एका भक्तिणीने सांगितले, —- बाबा म्हणाले- देवी येते पण ‘इनडोअर’, —- पण ‘मागून’येते, नंतर लक्षात आले, — देवीपेक्षा फीच जास्त वेगळी असते! — काहींना दिले ‘गुप्त अमृत’ उपाय, — काहींना खास ‘तोंडी’ मंत्र, —- जी जास्त श्रीमंत दिसली! —- त्याच्याकडे जास्तच तंत्र! —- राजकीय भक्त म्हणाले “बाबा महान!”, —- विरोधी म्हणाले – “धंदा भारी!” —- एका रात्रीत – “आध्यात्मिक गुरु”! —- झाली news channel ची सवारी! —- कालपर्यंत होता चरणस्पर्श, —- आज memes आणि jokes, — काल “परमपूज्य महाराज”, —- आज WhatsApp वर full trolls ! —- नाशिकपासून पुण्यापर्यंत, —- चर्चा झाली टपरीवर, — “देवी येते म्हणणारे बाबा आणि — ‘देव्या’ व्हिडीओ मधे दिसती लाईनवर, — स्वतःच अडकले paper वर!” — एक आजोबा ‘भारी’ बोलले, — “पूर्वी साधू जंगलात”, “— आता बाबा व्हिडीओ वर, — आणि भक्त सारे comments मध्ये, — एक भक्त म्हणाला रडत, —- “मी तर सगळं दान केलं ‘हवाली’ !” —- शेजारी हसतो-“बाबांनी तुलाच scan केलं!” — कोणी म्हणे “राजकारण आहे” — कोणी म्हणे “कट रचला”, —- पण सामान्य माणूस म्हणे, — “आपणच जरा जास्त भुललो!” —- अंधश्रद्धेचा market कायमच भारी, —- भावनांचा होतो व्यापार, — भीती, दुःख, संकट,आजार, —- यावरच चालतो संसार! — जोपर्यंत प्रश्न विचारत नाही, —- तोपर्यंत बाबा जन्मतात, — तर्क झोपला की गावोगावी, — नवीन चमत्कार उगवतात! — म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, —- ज्ञानापेक्षा मोठं काही नाही, — विज्ञान, विचार, शिक्षण यांना, — पर्याय अजून मिळाला नाही! — ना ताईत, ना गंडेदोरे, — ना ग्रहांचा खोटा खेळ, — मेहनत, अभ्यास, जागृती यानेच, —- बदलतो आयुष्याचा मेळ! – हसाल थोडं या कवितेवर, — पण अर्थ तिचा खोल आहे, — भोंदूगिरीच्या अंधाराला, — प्रश्न विचारणंच तोड आहे! —————— ❤️ कवी: सम्पादक– डॉ.नितीन पवार,शिरुर/पुणे🌹 आणखीन कविता —- कविता;शिरुरची निवडणूक–2025 स्पेशल! About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन निकालांचा महोत्सव