शिरूर तहसील कार्यालय परिसरात उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी महिला आघाडीचे बेमुदत उपोषण
Contents
- 1 Subdistrict Hospital शिरूर मध्ये अद्याप का नाही? संतप्त नागरिकांचा सवाल
- 2 Subdistrict Hospital शिरुर भाजपा महिला आघाडीचे बेमुदत उपोषण!
- 3 Subdistrict Hospital बाबत चुकीचा प्रस्ताव:प्रिया बिरादार,भाजप, महिला आघाडी,शिरुर
- 4 Subdistrict Hospital: शासकीय आधार केंद्र सुरु करावे—
- 5 प्रिया बिरादार यांता इशारा—-
- 6 नागरिकामधे नाराजी व सन्ताप—
- 7 ❓ FAQs
Subdistrict Hospital शिरूर मध्ये अद्याप का नाही? संतप्त नागरिकांचा सवाल
शिरुर,दिनांक 4 मे 2026 : प्रतिनिधी
Subdistrict Hospital अर्थात पुणे जिल्हा उप रुग्णाल शिरुर शहर व तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात यावे बांधण्यात यावे अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीने केलेली आहे.
Subdistrict Hospital शिरुर भाजपा महिला आघाडीचे बेमुदत उपोषण!
शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालय परिसरात भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. शहरात तातडीने उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे, तसेच नागरिकांना होणारा आरोग्याचा त्रास प्रशासनाने दूर करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.
Subdistrict Hospital बाबत चुकीचा प्रस्ताव:प्रिया बिरादार,भाजप, महिला आघाडी,शिरुर
या उपोषणामध्ये महिलांनी प्रशासनावर गंभीर आरोपही केले आहेत. जागेसंबंधीचा प्रस्ताव तातडीने योग्य प्रकारे पाठवावा, तसेच मंडळ अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पाठवलेला चुकीचा प्रस्ताव त्वरित दुरुस्त करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली आहे.
Subdistrict Hospital: शासकीय आधार केंद्र सुरु करावे—
शहरात अधिकृत शासकीय आधार केंद्र सुरू करावे, तसेच विद्यमान सीएससी केंद्रांमध्ये अधिकृत दरपत्रक लावण्याची सक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रत्येक सेवेसाठी निश्चित शासकीय दर स्पष्टपणे प्रदर्शित करावेत आणि बंद पडलेली केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करावी, असेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
प्रिया बिरादार यांता इशारा—-
महिला कार्यकर्त्या प्रिया बिराजदार यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की,“आमच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास हे उपोषण अधिक तीव्र केले जाईल.”त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकामधे नाराजी व सन्ताप—
शिरूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत येथे उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता खूप आधीपासून होती,असे नागरिकांचे मत आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे नगरपालिका नसतानाही उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले असून, तेथील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होत आहे. मात्र, शिरूरसारख्या मोठ्या शहरात अशी सुविधा अद्याप उपलब्ध नाही, ही बाब नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे.
सध्या शिरूरमध्ये असलेले ग्रामीण रुग्णालय मर्यादित सुविधांवर चालत आहे. किरकोळ तपासण्या आणि औषधोपचार येथे होतात; मात्र गंभीर आजार असल्यास रुग्णांना थेट ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
ससून रुग्णालयात प्रचंड गर्दी,वाहतुकीचा ताण आणि ट्राफिक जाम यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळतील की नाही,याची भीती निर्माण होते.या परिस्थितीमुळे अनेकदा रुग्णांचे नातेवाईक घाबरून जातात आणि पर्याय म्हणून खाजगी रुग्णालयांचा आधार घेतात.
याचाच फायदा घेत काही खाजगी रुग्णालये अनावश्यक तपासण्या आणि औषधे देऊन रुग्णांचा आर्थिक बोजा वाढवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.त्यामुळे गरीब, निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असून,ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान,शिरूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात अडथळा कोण घालत आहे,असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. काही खाजगी रुग्णालयांचा दबाव प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर आहे का,किंवा त्यांच्यात काही संगनमत आहे का,असेही प्रश्न आता नागरिकांकडून विचारले जात आहेत.
यावेळी आधार छाया फाउंडेशनच्या सविता बोरुडे,आदिशक्ती महिला मंडळाच्या शशिकला काळे, वात्सल्य सिंधू फाउंडेशन उषाताई वाखारे,श्रुतिका झांबरे,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, सुजाता पाटील,भारती शहाणे ,कविता परदेसी, सृष्टी करंजुले, कोमल भगवे, रिटा, विजयालक्ष्मी उपाध्याय, वर्षा मालेवार, जयश्री थिटे, रोहिणी बडे या महिला आन्दोलक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
तसेच जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे,भारतीय जनता पार्टीचे संजय पाचंगे,नयना परदेसी,भारतीय जनता पार्टी, तालुका सरचिटणीस विजय नरके, पत्रकार डॉ.नितीन पवार हे उपस्थित होते.
❓ FAQs
Q1. शिरूरमध्ये महिला आघाडीने उपोषण का सुरू केले आहे?
शिरूर शहरात उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करावे, तसेच आरोग्य सुविधांचा अभाव दूर करावा या मागण्यांसाठी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
Q2. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
उपजिल्हा रुग्णालय सुरू करणे, चुकीचे प्रशासनिक प्रस्ताव दुरुस्त करणे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, तसेच शहरात अधिकृत आधार केंद्र आणि सीएससी सेवा पारदर्शक करणे या प्रमुख मागण्या आहेत.
Q3. सध्या शिरूरमधील आरोग्य परिस्थिती कशी आहे?
शिरूरमध्ये केवळ ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे मर्यादित उपचार उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले जाते, ज्यामुळे वेळ, खर्च आणि त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो.
नागरिकांच्या अधिक माहितीसाठी लिंक्स—
👉 महाराष्ट्र आरोग्य विभाग अधिकृत वेबसाइट
https://arogya.maharashtra.gov.in
➡️ (उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य सुविधा संदर्भासाठी)
👉 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM India)
https://nhm.gov.in
➡️ (ग्रामीण व उपजिल्हा आरोग्य सेवा धोरण माहिती)
👉 जिल्हा प्रशासन पुणे अधिकृत वेबसाइट
https://pune.gov.in
➡️ (शिरूर तालुका व स्थानिक प्रशासन माहिती)
सत्यशोधक च्या आणखीन बातम्या वाचा >>>
Police Patil Meeting Shirur:गावांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय
Shirur Education News: सरकारी शाळा वाचवा अभियानांतर्गत पद नियुक्ती कार्यक्रम उत्साहात
नगरपालिकेचा विद्युत विभाग असे का वागतो? | Shirur Electricity Office वर गंभीर प्रश्न
