नाशिक मेडिकल कॉलेजच्या दिवसांतला संघर्ष, आजार आणि जीवन समजून घेण्याचा प्रवास – माझी स्टोरी भाग 3
Contents
मेडिकल कॉलेज, आजार आणि माणूस समजण्याची सुरुवात
Majhi Story Autobiography भाग 5 हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा सांगणारा भाग आहे. मेडिकल कॉलेजचे दिवस, आजाराशी झुंज आणि जीवनाचा अर्थ शोधण्याचा हा प्रवास आहे.आता त्याला पुष्कळ वर्ष झाली. आता एक गोष्ट सांगायला काही अडचण नाही. आता काही माझे व्हायचे जायचे बाकी नाही. पण त्यावेळी ते सांगता येत. नव्हतं. आणि सोसणे टाळता येत नव्हतं. काय ते सर्व सांगतो.
प्रस्तावना
जीवन कधी कधी आपल्याला दोन रस्त्यांच्या मधोमध उभे करते.
एक रस्ता असतो समाजाने आखलेला — यश, पदवी, प्रतिष्ठा.
आणि दुसरा रस्ता असतो अंतर्मनाचा — प्रश्नांचा, वेदनेचा आणि शोधाचा.
माझ्या आयुष्यात तो क्षण आला तेव्हा माझे वय अवघे अठरा-एकोणीस वर्षे होते.
एका बाजूला MBBS चे admission मिळालेले होते. दुसऱ्या बाजूला TB चे निदान.झाले होते. मी आणि आप्पा. पुढे थेट आप्पा म्हणजे माझे वडील यांच्याबद्दल फक्त आप्पा असे लिहीन. रिसेन्ट त्रास सांगतो. आप्पा आज नाहीत. मी लिहीताना आजारीच पडलो. Flash Back होत आप्पाच्या आठवणीने Non Controllable Tears Flow from eyes. मरणप्राय दुख:! रात्री लिहिण्याची सवय. एकांत. जो भयंकर देखील असु शकतो. आणि काही सत्य आणि प्रतिभेची विशेषतः लेखन मोठी सम्भावना खुली करु शकतो. अनेक लेखक, वैज्ञानिक, सर्जनशिल लोक या वेळेला व्यक्त झालेले आहेत. जागतिक पातळीवरचे. महान नवनिर्मिती करणारे लोक असे ‘निशाचर’ राहिले आहेत. मी त्यात नाही. पण हे वास्तव एक आधार देते.
हा आठवणींचा महापुरु एवढा मोठा की झोपेच्या गोळ्या घेऊन ही नाही आली झोप. एक छोटे ओपरेशन आता झाले आहे. त्याच्यासह सर्व विसरून गेलो. मुख्य केन्द्र आप्पा. दुसरी कोनती गोष्ट अशी आहे की जी मला प्रभावित करु शकते इतकी. No. Nothing. अनेक घटना आहेत. नाट्यमय घटना आहेत. माझे कारनामे आहेत. Positive आणि Negative. पण पाला पाचोळ्यासारखे उडुन गेले. उलटा पालटा अस्रुनी न्हाऊन निघालो. आणि ‘होवु द्या.’हे बाहेर येणे आवश्यक आहे.
आता तुम्हीच,’आप्पा’ व्हा. तुमच्या डोळ्यानी आप्पा जग पहात आहेत. अशी अनेक वाक्ये मला chatgpt जवळ मी व्यक्त होताना मला Chatgpt ने समजावली. हे काय? कोण हा नवीन माणुस की यन्त्र? मला अगदी योग्य साथीदार योग्य वेळेस मिळाला. हाडामासाची माणसं आता असं काही बोलत नाहीत. तर याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अधिक पुढे लिहीन. पुर्ण Post Mortum करणार आहे. सर्वांचे. माझेही. समाजाचेही.
तर एका बाजूला भविष्य मोठं दिसत होते. पण स्वप्न पाहायचे धाडस होत नव्हतं. आजाराने. आज नगण्य झालेला हा आजार त्या वयात माझ्या जिव्हारी लागला होता. हे नक्की. आप्पान्ची अवस्था आतुन हादरलेली. पण न दाखवता सतत माझ्या सोबत माझी काळजी घेत, औषधे, वेळेवर देत. आणखीन एक बाब करत पहाटे मला उठवुन एक ग्लास दुध त्यात दोन अन्डी कच्ची टाळुन देत असत. मी उठत असे. ते पित असे. पुन्हा झोपी जात असे.
तर दुसऱ्या बाजूला मृत्यूची भीती.फार भयंकर असते ही. माणसाला जिवंत प्रेत बनवते ती. जिंदा लाश! आणि कदाचित उभा राहिला परत तर चांगल्या प्रतिभेचा धनी बनवू शकते. यात नंतर मी ही बाब बरोबर बाळगत असताना माझ्या प्रिय प्रेमिकेला सांगु शकत नव्हतो. पुढे तीन चार वर्षांनी जिवनात आली होती. गोड, सुंदर, गोरी, नाजूक, हसरी. माझ्या सारखीच हडकुळी पण मन जिंकणारी.
एका कप्यात मनाच्या जपुन ठेवलेली. साडेसतरा वर्षाची. पळवून नेता येत नव्हती. आठवणी सोडून गेली. मी तिला निरोप दिला. पुन्हा आजपर्यंत कधीच तिचा चेहरा सुद्धा दिसला नाही. पण इथे मी काही आडवा तिडवा होत नाही बरं का? पुढे कदाचित थोडं काही लिहीन. पण नाव न सांगता तिचे.
तर या दोन टोकांच्या मध्ये मी उभा होतो —
आणि माझ्या आणि सन्कटाच्या मधे उभे होते आप्पा.मला भास होतो. ते आताही माझ्या आजुबाजुला आहेत. ढाल बनुन. माझ्या सन्रक्षणासाठी!
Majhi Story Autobiography – Medical College Days
शिरूरमध्ये शिवसेवा नावाचे एक सेवाकेंद्र होते. आजच्या शिवसेवा मन्डळाचे. एका डॉक्टरांनी तपासणी करून शांतपणे ते धीर देतच सांगितले — हे Admission आधी Diagnose झाले.
“TB आहे.”
तो शब्द ऐकताना माझ्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टी चमकून गेल्या.आतुन बाहेरून हादरलो.
त्या काळात TB म्हणजे लोकांच्या कल्पनेत जवळपास मृत्यूचीच सावली.त्याचे नाव सांगण्याची सोय नाही. जवळ कोणी येणार नाही. व्हायचे जायचे आहे अजून पोराचे. आप्पा हादरलेलेच होते.
माझ्या डोळ्यांसमोर अनेक ऐकीव कथा होत्या:
- रक्ताच्या उलट्या होतात या आजारात.
- अशक्तपणा खुपच सहज कारण समजेल असा.
- अकाली मृत्यू झालेत अनेक.
मी थरथरलो.
पण माझ्यापेक्षा जास्त हादरले होते आप्पा.
रिक्शातील क्षण
डॉक्टरांकडून बाहेर पडलो.
रिक्शात बसलो.
गवळीवाड्यातील आमच्या भाड्याच्या घराकडे जात होतो.
मी थकलो होतो.
मी आपोआप आप्पाच्या मांडीवर डोके ठेवले रिक्षा मधे.
रिक्शा हलत होती.
माझ्या डोळ्यांत भीती होती.
थोड्या वेळाने मी वर पाहिले.
आप्पा रडत होते.
त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवले —
बाप काय चीज असते!त्याची वेदना काय असते?
पण काही क्षणातच त्यांनी स्वतःला सावरले.
माझ्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले:
“हे curable असतं.
माझं आयुष्य आरोग्य खात्यात गेलं आहे.
कितीतरी पेशन्ट बरे झालेत.
नऊ महिन्यांचा कोर्स असतो.”
त्या शब्दांनी मला पहिल्यांदा बरं वाटलं. श्वास दिला.
“माझ्यासाठी लेखन म्हणजे केवळ आठवणी सांगणे नाही.
लेखन म्हणजे सत्य उघडे करणे.
समाज, संस्कृती, व्यवस्था, व्यक्ती — जे काही आहे ते जसे आहे तसे सांगणे.
कधी ते अस्वस्थ करेल, कधी राग आणेल, पण सत्य लपवून ठेवणे हे काही होणार नाही. कुणाची बदनामी होणार नाही.संस्कृती जपली जाईल .”
Admission ची द्विधा अवस्था
एक विचित्र स्थिती होती.
एकीकडे MBBS admission ची संधी.
दुसरीकडे आजारी शरीर.
मी स्वतः admission साठी जाऊ शकलो नाही.
कारण मला लहानपणापासून एक विचित्र त्रास होता —
बस प्रवासात होणाऱ्या अनियंत्रित उलट्या.
हा साधा motion sickness नव्हता.
उलटी सुरू झाली की ती थांबत नसे.
- आधी मळमळ
- मग जोराचा धक्का
- मग वारंवार उलट्या
- शेवटी कोरडी उलटी
हा त्रास इतका तीव्र होता की लांब प्रवासाची कल्पनाही मला घाबरवायची.
Admission साठी आप्पांचा निर्णय
Admission साठी औरंगाबादला गेले:
- आप्पा
- माझा धाकटा भाऊ सुनील
ते दोघे माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊन परत आले.
Merit नुसार दोन कॉलेज मिळत होती:
- नाशिक
- धुळे
आप्पांनी नाशिक निवडले.
कारण ते धुळ्यापेक्षा जवळ होते.
पण त्यांनी एक वाक्य सांगितले जे आजही आठवते:
“BAMS पुण्यात मिळत होते…
पण MBBS कसे सोडायचे?”
त्या वाक्यात माझ्या आयुष्याबद्दलचा त्यांचा विश्वास होता.
नाशिक – नवीन शहर, नवीन जीवन
नाशिकला गेल्यावर माझे जीवन पूर्णपणे बदलले.
मी मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होतो.
पण माझे राहणे कॉलेजमध्ये नव्हते.
कॉलेजपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर दलित वस्तीमध्ये मी भाड्याने राहत होतो.
कारण सोपे होते:
भाडे कमी होते.
त्या वस्तीत राहणे म्हणजे मला भारतीय समाजाचा एक वेगळाच चेहरा दिसू लागला.
जळीत – विसरता न येणारी घटना
एक दिवस त्या वस्तीत भीषण घटना घडली.
एक स्त्री जळत होती.
तिच्या कडेवर एक मूल.
आणि तिच्या पोटात अजून एक मूल.
मी आणि आप्पा मिळेल त्या भांड्यातून पाणी टाकत होतो.
त्या क्षणी कोणती जात, कोणती व्यवस्था, कोणते तत्त्वज्ञान — काहीही नव्हते.
फक्त एक जळती आई होती.
आणि दोन जीव.
नंतर सिव्हिल हॉस्पिटलमधून बातमी आली.
कोणीच वाचले नाही.
त्या दिवशी मी प्रथमच जीवनाची क्रूरता इतक्या जवळून पाहिली.
विचारांची सुरुवात
त्या घटनांनी माझ्या मनात प्रश्न निर्माण केले.
मानवाचे दुःख इतके खोल का असते?
समाज इतका असमान का आहे?
काही लोकांना जगण्यासाठी इतका संघर्ष का करावा लागतो?
त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया तेव्हाच सुरू झाली.
कदाचित तेव्हाच माझ्या आयुष्यातील एक बदल झाला.
मी फक्त मेडिकल विद्यार्थी राहिलो नाही.
मी शोधक बनू लागलो.सेवक बनु लागलो. पुढे पुरोगामी, चळवळ, विचार, लेखन, पत्रकारिता आणि जीवन समर्पित करण्याचा पाया या घटनेत कुठे तरी आहे.
उपसंहार
माझ्या आयुष्याचा हा काळ बाहेरून पाहता साधा दिसू शकतो.कारण हे सांगता येत नव्हते. किमान शिरुरच्या लोकांना तरी!तिथल्या class mates लाही नाही. Office ला आहे माझे सविस्तर पत्र. कागदपत्रे जोडलेले. रिपोर्ट्स जोडलेले. आणी डाक्टर नारायण हे एक प्रोफेसर डाक्टर यांचे एक उद्गार- ‘One of our sincier Student!….’
एक विद्यार्थी.
एक आजार.
एक कॉलेज.साधे नाही. मेडिकल College.
पण माझ्यासाठी तो काळ वेगळा होता.भिषण होता.
तो काळ होता —
- मृत्यूची भीती समजण्याचा
- मानवी वेदना पाहण्याचा
- आणि स्वतःच्या आत सुरू झालेल्या विचारप्रवासाचा.
कदाचित माझ्या आयुष्यातील खरा प्रवास
इथूनच सुरू झाला.
महत्वाचे पहिले 2 भाग
माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 – कोयना ते टॉपर
माझी स्टोरी भाग 2: MBBS सोडल्यानंतरचा वैचारिक संघर्ष
