माझी स्टोरी भाग 2: MBBS सोडल्यानंतर आत्मशोध आणि वैचारिक बदलाची सुरुवात
Contents
- 1 माझी स्टोरी भाग 2: MBBS सोडल्यानंतरचा वैचारिक संघर्ष
- 1.1 माझी स्टोरी भाग 2: वाचनातून बदललेले जीवन
- 1.2 छातीवरचं दडपण उतरलं
- 1.3 वाचनाची नव्याने सुरुवात
- 1.4 जात, गुण आणि अपमान: माझी स्टोरी भाग 2 ला असलेला एक सामाजिक पैलु!
- 1.5 माझ्यातील आक्रमक विचारवंत
- 1.6 समाजाचा खरा चेहरा
- 1.7 लोकशिक्षकाची बीजं
- 1.8 ज्ञान म्हणजे प्रतिष्ठा
- 1.9 मी मोठा झालोय?
- 1.10 पुढच्या प्रवासाची चाहूल
माझी स्टोरी भाग 2: MBBS सोडल्यानंतरचा वैचारिक संघर्ष
माझी स्टोरी भाग 2: वाचनातून बदललेले जीवन
माझी स्टोरी भाग 2 ही माझ्या आयुष्यातील त्या टप्प्याची कथा आहे जिथे MBBS सोडल्यानंतर माझ्या विचारविश्वात मोठा बदल झाला.
गावात परत येताना माझ्या हातात कोणतीही पदवी नव्हती.पण माझ्या छातीत एक मोठं ओझं उतरलं होतं.
MBBS सोडणं हे बाहेरच्या लोकांना पराभवासारखं वाटलं असेल.नव्हे तर गुन्हा असं वाटलं. मी स्वतः ते सोडले. असे लोकांना वाटत असे. पण मी स्वतः ते सोडणे शक्य नव्हते. आजही माझे Admission एन डी एम व्ही पी समाज्स मेडिकल कालेज, आडगाव, नासिक येथे आहे. अनुसुचीत जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचे Admission रद्द करायला कोणी धजावत नाही. एट्रोसिटीला घाबरतात. जी आर आहे तसा. मध्यन्तरी माझ्या एका नातलगाच्या पत्नीने अलिकडे अपूर्ण राहीलेले M.D. पूर्ण केले आहे. मग मी का नाही परत जात? पुर्ण करत? उत्तर पुढे सांगेन.आता इथे फक्त माझी स्टोरी भाग 2 आणि काही मर्यादित भाग.
त्यावेळी कदाचित काहींनी हळूच पुटपुटलं असेल –
“इतके मार्क्स घेऊनही टिकला नाही…”
पण त्या रात्री जेव्हा आम्ही CBS बसस्थानकातून एसटी पकडली.तेव्हा मी आणि वडील दोघंही जाणून होतो –काय जाणायच ते ! तेढी पुढे येईल. पण हा पराभव नव्हता.तर मग काय होते ते माझी स्टोरी भाग 2 म्हणून या भागात देतो.
हा निर्णय होता.जीवन वाचवण्याचा निर्णय होता. माझा आणि वडीलान्चाही!सर सलामत तो पगडी पचास ही म्हण मी तोपर्यंत कुठं तरी वाचली होती. नव्हे!आठवलं-दहावीत इग्रजीच्या तासाला तरटे सरांनी कुठेतली तो उच्चार केला होता.
छातीवरचं दडपण उतरलं
त्या मेडिकल कॉलेजच्या वातावरणात
मी स्वतःच पेशंट झालो होतो.हे माझी स्टोरी भाग 2 मधे विशेष लक्षात घ्या. मला आज काही सिद्ध किंवा असिद्ध करायचं नाही. फक्त एक स्टोरी सागायकीय, खरी!
TB ने शरीर कमकुवत झालं होतं.हे मी आज सांगु शकतो. कारण त्याला आता जमाना झाला आहे. आणि मला काही सोयरीक पहायची नाही. तो पुर्ण बरा होणार आजार होता. आधीच कधी तरी बरा होवून गेला. एक्स रे काढतो. तेव्हा काही नसतं. ही आजची स्थिती. पण त्यावेळी मला त्याबाबत अनेक ऐकीव गोष्टी माहित होत्या. पुढे त्यांनी कोनता आणि किती त्रास झाला हे ही पुढे येईल.
मनात भीती मरतो की काय?
रक्ताची उलटी होते की काय?
मग आप्पान्चे काय हाल होतील?
ते कदाचित प्राण सोडतील.
भविष्य अनिश्चित. प्रत्येक सहा महिन्यांनी परीक्षा.
त्या पेन्डीन्ग फीचा प्रश्न.प्राध्यापकांचा तुटक संवाद.त्यांचे बोलणेच समजत नसे.
इंग्रजी माध्यमाची भीती.म्हणजे फ्लुएन्ट इन्ग्लिश ची!ही बाब माझी स्टोरी भाग 2 मधे विशेष नमुद करण्यायोग्य!त्याचा परिणाम इतर बर्याच Students वर झाला तिथे. हे मला नन्तर समजले.
अशा CVS cardio vascular system वर 😅 त्या सर्वांचा एक दाब येत होता.जणू कुणीतरी आतून दाब देत आहे.नेमका Heart वर!
गावी आलो.
पहिल्या आठवड्यातच जाणवलं.श्वास खोल जातोय.
झोप लागतेय. आईजवळ, भाऊ, बहीणीबरोबर बसताना शांत वाटतंय.
मी हरलो नव्हतो.
मी श्वास घेत होतो.
श्वास महत्वाचा बनला होता. दोघांचा.
मी आणि आप्पा.माझी स्टोरी भाग 2 चा हा आत्मा आहे. हे खरे!
वाचनाची नव्याने सुरुवात
गावात परतल्यावर
मी पहिल्यांदा पुस्तक हातात घेतलं ते अभ्यासासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी.
मी स्वतःला विचारलं –
“MBBS म्हणजे काय?
जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे का?”काय आहे हे जीवन.आपण कशासाठी जगतोय? जर मृत्यू आपला शेवट करणरच आहे. प्रसिद्धी मिळाली तर ती दिवस टिकते. मृत्यू नन्तर चर्चा झाली तर ते आपल्याला समजण्याचा मार्ग तो कोनता? अलेक्झान्डर सिकंदर आपण आठवतो. पण कोनता. जी आपल्या मनाने त्याच्याबाबत जे वाचले असेल. जे कल्पना चित्र बनवले असेल. तो अलेक्झान्डर आपण समजतो. तो मुळ असणारा कधी एकच असतील का? हे इतरही सर्व प्रसिद्ध लोकांबाबत. म्हणजे केवळ एक भ्रामक चित्र. त्याची मेमरी. MBBS अमर असतो का? UPSC topper अमर असतो का? पन्तप्रधान की प्रेसिडेंट? हे काय चाललं आहे.
उत्तर मिळालं – नाही.
मी वाचायला सुरुवात केली.पहिलीच गाठ पडली ओशोची. सम्भोगातुन समाधीकडे!पुस्तकाचे नाव. पुर्ण वाचलं. प्रेम करायचं नसतं. प्रेममय व्हायचं असते. स्वर्ग आपणच जर आपले मनोविश्व स्वच्छ व सुंदर. नसेल तर नर्क आपणच. इथं आणि आताच. म्हणून वर्तमानात जगणे. पण ते कसे शक्य आहे? शक्य नाही. हे ही ओशो सांगतात. फक्त ते पाहणे साक्षीभावाने. हा साक्षीभाव तोच ‘मी’असतो. पहिल्या भागात मी विचार करत होतो तेव्हा लक्षात आलेला. असं बरच काही ओशो यांचे मोठे तत्वज्ञान. पुढे ते वाचतच गेलो. पदोपदी सावरायचो स्वतःला ते पुन्हा ओशो वाचुन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.कार्ल मार्क्स,तत्त्वज्ञान,समाजशास्त्र, विशेषतः भारतीय,मानसशास्त्र, मग स्टिफन हाकिन्ग, आईनस्टाइन चे ‘सापेक्ष’, म्हणजे पुन्हा व्यक्ती गणीक सत्य वेगळे.काळ अस्तित्वात नाहीच. सर्व एकाच नजरेत जो पाहील त्याला काय दिसेल. काल, आज, उद्या एकाच वेळेस.
मला समजू लागलं.समस्या माझी वैयक्तिक नव्हती.मुळात ती नव्हतीच. मनाने निर्माण केलेली.अशी जेवढी मने तेवढी विश्वे. पण काल्पनिक. मग Absolute Truth काय?
ती रचनात्मक (structural) होती.व्यवस्थेची होती.सर्वांची होती. म्हटलं तर कुणाचीच नव्हती.
जात, गुण आणि अपमान: माझी स्टोरी भाग 2 ला असलेला एक सामाजिक पैलु!
मेडिकल कॉलेजमध्ये मी एक गोष्ट पाहिली होती –
काही मुलांना वारंवार practical मध्ये कमी मार्क्स.
मौखिक परीक्षा मध्ये जाणीवपूर्वक अपमान.
“तुम्हाला हे जमत नाही.”
पण तेच विद्यार्थी जे नंतर ८–१० वर्षे
निबरगट्टपणे उभे राहिले आणि MBBS झाले.
मी एक सहाध्यायी गमावला.माझा एक classmate होता मेडिकल स्टुडंट.
त्याने आत्महत्या केली.
कारण?
प्रत्येक वेळी २–३ मार्क्स कमी Practical ला. म्हणून फेल.
त्या काळात मला जाणवलं –
भारतीय समाजात जात अदृश्य नाही.
ती शांतपणे उपस्थित असते.ती तोंडात येणार नाही. पण मनात येणार. असणार. त्यावर आधारित पुर्वग्रह व प्रत्यक्ष वागणे. याचे नमुने मी पुढे सांगीन.
कोणी बोलत नाही.
पण वर्तन सांगतं.
माझ्यातील आक्रमक विचारवंत
गावात परतल्यावर
मी स्वतःला विचारलं –
“तू पुन्हा वर कसा येणार?”
उत्तर होतं – ज्ञानाने.
मी अभ्यास केला.
तासन्तास.
विषय खोलवर.
भारतीय संदर्भ.
जागतिक संदर्भ.
वैज्ञानिक दृष्टी.
हळूहळू लक्षात आलं –
मी जेव्हा बोलतो,
समोरच्याची बोलती बंद होते.
एका वयस्कर गृहस्थाने एकदा सांगितलं –
“तुम्ही समोरच्याला hypnotize करता.”
मी हसलो.
ते hypnotism नव्हतं.
तो अभ्यास होता.पण इतका समोरचा प्रभावित होवु शकतो. हे अहन्काराला सुखावणारे होते. पण त्याचा काही पगार मिळत नाही.
ज्ञानाची धार घासुन घासून तिक्क्ष्ण होत होती.पण हे आत चालले होते. बाहेर मी साधारण मुलगा. जेव्हा कधी मी बोलत असे. बहुदा डॉक्टर, वकील, प्राध्यापक मित्रान्शी तेव्हा ते चमकुन बघत माझ्या कडे!
समाजाचा खरा चेहरा
मला एक गोष्ट स्पष्ट दिसली –
भारतीय माणूस जात पाहूनच वागतो.
तो बोलणार नाही,
पण मनात ती ओळख ठेवतो.
तो म्हणेल –
“आम्ही आहोत तुझ्यामागे.”
हजार-पाचशे प्रसन्गी देईल पण. पण आम्हाला मोठे मान. नम्रतेने वाग. गरीबासारखे रहा. जास्त डोकं मात्र चालवु नको. काही अडचण आली तर मी आहे ना!टेन्शन नको घेऊ.
सहानुभूती दाखवेल.
पण एक अदृश्य मर्यादा ठेवेल –
“आमच्या वर येऊ नका.”
हे समजल्यावर
मी समाजाचं मत घेणं सोडलं.
मी ठरवलं –
मीच विचार मांडेन.
लोकांनी स्वीकारला तर ठीक.
नाही स्वीकारला तरी ठीक.
माझी स्टोरी भाग 2 मधे अखेर व्यवस्थेचे काय करायचं याचा मी हा घेतलेला निर्णय!
लोकशिक्षकाची बीजं
मी शिक्षणशास्त्राचा पदवीधर झालो पुढे.
पण आता मला शिक्षक होण्याची नव्याने जाणीव झाली.
लोक मागत नाहीत विचार.
पण समाजाला विचाराची गरज असते.
मी ठरवलं –
मी लोकशिक्षक बनेन.
मी जे वाचतो,
जे समजतो,
ते मांडेन.
माझ्यात करुणा आहे.
ती वडिलांकडून आलेली.
मी “नाही” म्हणू शकत नाही सहज.
कधी कधी लोक त्याचा गैरफायदा घेतात.
पण माझं देणं थांबत नाही.
ज्ञान म्हणजे प्रतिष्ठा
मी पाहिलं –
ब्राह्मण श्रीमंत नसेल,
पण त्याला सन्मान असतो.
का?
कारण तो बोलतो.
मांडतो.समजावून सांगतो. अपशब्द वापरत नाही. नाही पटलं तर हात जोडून माफी मागेल.
तो अजून लोकप्रिय आहे. बहुसंख्या त्याच्या मागे आहे.
ज्ञान प्रतिष्ठा देतं.
ही माझी शिकवण होत होती.
मी मोठा झालोय?
एक दिवस आरशात पाहिलं.
मी स्वतःला विचारलं –
“तू मोठा झालास का?”
MBBS नाही.
सरकारी पद नाही.
मोठी संपत्ती नाही.
पण समज वाढली आहे.
आतून शांतता येते आहे.
आक्रमकतेतून स्पष्टता येते आहे.
कदाचित मोठेपणा पदवीत नसतो.
तो जाणीवेत असतो.
पुढच्या प्रवासाची चाहूल
गावात परत येणं हा शेवट नव्हता.
तो एक वळण होता.
मी आता मेडिकल विद्यार्थी नव्हतो.
मी शोधक झालो होतो.
माझ्या आयुष्यातील
“यश” ची व्याख्या बदलली होती.
पुढे काय होणार होतं?
मी कोणता मार्ग निवडणार होतो?
समाजाशी माझा संघर्ष कसा वाढणार होता?
हा प्रवास आता सुरू झाला होता.माझी स्टोरी भाग 2 इथे सम्पवला पाहिजे. पुढे आणखीन आठवणे व चिंतन करणे, योग्य ठरेल!
भाग ३ मध्ये –
गावातील वास्तव, आर्थिक संघर्ष, स्वतःची ओळख पुन्हा उभी करण्याची धडपड आणि वैचारिक लढाई.
माझी स्टोरी भाग 1 वाचा येथे →
https://www.satyashodhak.blog/majhi-story-atmakatha-bhag-1/
