Contents1 बाळाला आईच्या सुखरूप ताब्यात देताना पोलिसांचे डोळे पाणावले — रांजणगाव MIDC पोलिसांची हृदयस्पर्शी कामगिरी1.0.1 About The Author1.0.1.1 Dr.Nitin Pawar1.0.2 ❤️ Support Satyashodhak Blog बाळाला आईच्या सुखरूप ताब्यात देताना पोलिसांचे डोळे पाणावले — रांजणगाव MIDC पोलिसांची हृदयस्पर्शी कामगिरी शिरूर | दि. 27 ऑक्टोबर 2025 | प्रतिनिधी | https://www.satyashodhak.blog/wp-content/uploads/2025/10/VID-20251028-WA0026.mp4 मानवतेचे दर्शन घडवणारी घटना रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात घडली. तीन वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आईच्या सुखरूप ताब्यात देताना पोलिसांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. रिक्षाचालक सद्दाम अकबर खान (रा. शिरूर, जि. पुणे) हे दुपारी सुमारे 1.30 वाजता रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये आले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, “हा लहान मुलगा मला कारेगाव गावच्या हद्दीतील पुणे रोडलगत ‘हॉटेल पाटिलवाडा’ येथे एकटाच भटकताना आढळला. तो काही बोलू शकत नाही, म्हणून त्याच्या आई-वडिलांचा शोध घ्यावा.” असे सांगून त्यांनी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही माहिती पोलिस अंमलदार पो. हवा. वैजनाथ नागरगोजे यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करून मुलाचे आई-वडील शोधण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करून मुलाचा व्हिडिओ प्रसारित केला आणि नागरिकांना उपयुक्त माहिती देण्याचे आवाहन केले. या जनजागृतीला यश मिळाले — सायंकाळी सुमारे 6 वाजता दिव्यभारती राम खिलारी (रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) या महिला पोलिस स्टेशनमध्ये आल्या आणि “हा माझा मुलगा आहे — मटरू राम खिलारी, वय 3 वर्षे” असे सांगितले. त्यांनी सांगितले, “मी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तो घरातून बाहेर पडला आणि हरवला. मी सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नाही. सायंकाळी शेजारीणबाईने रांजणगाव पोलिसांनी बनवलेला सोशल मीडियावरील व्हिडिओ दाखवला, तेव्हा मी धावत पोलीस स्टेशनकडे आले.” पोलिसांनी योग्य पडताळणी करून लहान मटरूला आईच्या ताब्यात सुखरूप दिले. त्या क्षणी उपस्थितांचे डोळे पाणावले. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याच्या महिला अंमलदारांनी त्या चिमुकल्याला चॉकलेट, खेळणी देत मायेने शांत केले. इतका जीव लावल्यामुळे तो आईकडे जायला तयार नव्हता, पण अखेर आईच्या कुशीत झेपावताच सर्वांच्या नजरा ओलावल्या. ही संपूर्ण हृदयस्पर्शी आणि आदर्शवत कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. वैजनाथ नागरगोजे, पो. कॉ. आकाश सवाने, पो. कॉ. संदीप भांड, योगेश गुंड, तसेच महिला अंमलदार शीतल रौंधळ आणि पूजा नाणेकर यांनी केली. रांजणगाव MIDC पोलिसांच्या या तत्परतेमुळे एक आई आणि मुलाचे आयुष्य पुन्हा उजळले — आणि समाजासमोर पुन्हा एकदा “मानवतेपेक्षा मोठं काही नाही” हा संदेश जिवंत झाला. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन शिरुर नगरपालिका निवडणूक 2025 : मतदारांमधील मानसिक गुलामगिरी कायम राहणार? वाघोलीत राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीतिक बैठक: शिरूर-हवेली मतदारसंघातील निवडणूक तयारीला वेग