IMG 20260425 052457 1

Breaking News Shirur :
मध्यरात्री दरोडा ; वयोवृद्ध महिलांना मारहाण करत 1.64 लाखांचे दागिने लंपास!

Breaking News Shirur 1.64 Lakh Rupees Gold Theft

दिनांक 5 जुलै २०२५ | प्रतिनीधी |

Breaking News Shirur : शिरूर तालुक्यातील आंबळे गावात मध्यरात्री घरात घुसून सहा अनोळखी चोरट्यांनी दोन वयोवृद्ध महिलांवर दांडक्यांनी हल्ला करत ₹1.64 लाखांचे सोन्याचे दागिने लुटले. शिरूर पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास, शिरूर तालुक्यातील आंबळे गावात तब्बल सहा अनोळखी दरोडेखोरांनी घरात घुसून दोन महिलांवर हल्ला करत सुमारे ₹1,64,000 किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.

फिर्यादीनुसार, सौ. कल्पना प्रताप निंबाळकर (वय 60, व्यवसाय – घरकाम व शेती, रा. आंबळे) या आणि त्यांची सासरची बहीण सौ. रत्नाबाई शितोळे यांच्यावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घरातच दरोडेखोरांनी दांडक्यांनी मारहाण केली. या घटनेत दोघी महिला जखमी झाल्या आहेत.

दरोडेखोरांची ओळख—-

वय अंदाजे २० ते २५ दरम्यान, अंगाने सडपातळ, मराठी भाषिक, अनोळखी सहा इसम.

चोरलेला ऐवज—-

कल्पनाबाईंना – सुमारे ₹84,000 किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, कानातील कर्णफुले व चांदीच्या जोडव्या

रत्नाबाई शितोळेंना – ₹80,000 किमतीचे सोन्याचे पोत व कर्णफुले

एकूण चोरीचा ऐवज: ₹1,64,000 इतका झाला आहे.

फिर्याद दिल्यानंतर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर 478/2025 भा.दं.वि. कलम 310, 311 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔹 दाखल अंमलदार: पोसई दिलीप पवार
🔹 तपास अधिकारी: पोसई शुभम चव्हाण
🔹 प्रभारी अधिकारी: पोलीस निरीक्षक संदेश केंजळे

शिरूर पोलीसांकडून या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना •••• 

🌐 

https://mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ

https://pune.gov.in – पुणे जिल्हाधिकारी संकेतस्थळ

https://map.gaonconnection.com – गाव नकाशा तपासण्यासाठी

सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••••

Missing Woman : उरळगाव येथील विवाहित महिला बेपत्ता – पतीने दाखल केली मिसिंगची तक्रार

ADVERTISEMENT
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

About The Author