Contents1 ✒️ शिरूर तहसील कार्यालयासमोर झालेल्या बेमुदत महाधरणे आंदोलनाची दखल1.1 ✒️ २२ डिसेंबर रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण बैठक1.2 ✒️ पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे बहुजन समाजाचे आवाहन1.3 तहसील प्रशासनाची तत्काळ हालचाल1.4 पत्रकार बंधूंना उपस्थित राहण्याचे आवाहन1.5 पत्रकारांच्या सहकार्याबद्दल आभार1.6 About The Author1.6.1 Dr.Nitin Pawar1.7 ❤️ Support Satyashodhak Blog ✒️ शिरूर तहसील कार्यालयासमोर झालेल्या बेमुदत महाधरणे आंदोलनाची दखल ✒️ २२ डिसेंबर रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण बैठक ✒️ पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे बहुजन समाजाचे आवाहन शिरूर, दिनांक 20 डिसेंबर 2025| पुणे जिल्हा प्रतिनिधी| शिरूर तालुक्यातील मागासवर्गीय, दलित, मातंग, शोषित, पीडित व बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणांना न्याय मिळावा, या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या बेमुदत महाधरणे आंदोलनाची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार २०२५ सन्मानित राजेंद्र लक्ष्मण आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनास १९ डिसेंबर २०२५ रोजी तहसीलदार कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला. तहसील प्रशासनाची तत्काळ हालचाल तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार गिरी गोसावी, रेषेवाड व येडे यांचे शिष्टमंडळ आंदोलनस्थळी दाखल झाले. शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या, प्रश्न व तक्रारी जाणून घेतल्या. तक्रारींच्या निवारणासाठी लेखी आश्वासन देत सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या बैठकीत तक्रारी ऐकून प्रत्येक प्रकरणावर न्याय देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पत्रकार बंधूंना उपस्थित राहण्याचे आवाहन या संदर्भात शिरूर तालुक्यातील सर्व वर्तमानपत्रांचे संपादक, पत्रकार, युट्यूब चॅनल प्रतिनिधी यांना आवाहन करण्यात आले आहे की, ही महत्त्वाची बातमी आपापल्या लोकप्रिय माध्यमांत प्रसिद्ध करून जनतेपर्यंत पोहोचवावी. तसेच २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकारांच्या सहकार्याबद्दल आभार आंदोलनास आतापर्यंत मोलाची साथ दिल्याबद्दल शिरूर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे राजेंद्र लक्ष्मण आल्हाट यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. संपर्क : श्री. राजेंद्र लक्ष्मण आल्हाट (महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार २०२५ सन्मानित) मो. : ९७३०३६४८११ — प्रतिनिधी, शिरूर About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन शिरूर नगरपरिषद निवडणूक 2025 : मतमोजणीच्या दिवशी नगरपरिषदेसमोरील मुख्य रस्ता बंद क्लिन्टन, ट्रम्प, गेट्स निघाले रंगीले? कोणा मोठ्या भारतीयाचे नाव अजून गुलदस्त्यात?