IMG 20250503 WA00041

कवीता:” कारभार शिरुर नगरपालिकेचा” 

कविता: कारभार शिरुर नगरपालिकेचा:"शिरुर नगरपालिकेच्या कारभारावर आधारित दोन सडेतोड विनोदचित्रं! खड्ड्यांवरून प्रशासनाच्या योजनांवर टोकदार विनोद आणि वास्तव दाखवणारं हास्य. लोकशाहीत नागरिकांचा आवाज हास्याच्या माध्यमातून!"

कवी:डॉ.नितीन पवार.

शहर म्हणे आहे ‘शिरुर’ आपलं, भीमा तीरावर वसलेलं,
इतिहास, संस्कृती,आणिक परंपरेचं सोनं जपलेलं.

माणसं सोज्वळ,बनूल, मेहनती,आणि शेतकरी स्वाभिमानी,
पण नगरपालिकेचा कारभार? – फारच मनमनी…

एकेक रस्ता बनलायन खड्ड्यांचा राजा,
मळलेली वाट, वाहतूकीच्या गडबडीत साजा.
संध्याकाळी पायवाटे चालताना इथे,
विजेचा लपंडाव — अंधारातच घसरणं, हेच तर मानणं पडतन ‘भाग’ !

कचऱ्याचे ढिग, इथे उघड्यावर तुंबलेले नाले,
पावसात पाणी येते घरात, हिवाळ्यात असते  धुराळे.
स्वच्छतेच्या घोषणा लावल्यात इथे भिंतीवर,
पण वास्तवात दुर्गंधचं भरभरून दरवळतं दर.

शाळा, दवाखाने,घंटागाडी, बालवाडी –
फक्त फाइलांमध्ये सुंदर रंगवलेले,
मात्र ग्राउंडवर पाहिलं तर,
पडझड, गळकी छप्परं नि  स्वप्नं मोडलेले.

“सिंगापुर सिटी”ची स्वप्नं दाखवली,
पण मूलभूत हक्क विसरले.
पाणी, रस्ता, आरोग्य आणि शिक्षण —
या सगळ्यांतून प्रशासन राहिले गाफीलच उतरले.
अधिकाऱ्यांच्या गाड्यांना नसते खड्ड्यांची भीती,

जनतेच्या दु:खांनी यांची झोप मात्र येई घोटी.
फारच झाल्या योजना, आराखडे, उदघाटनं णि भाषणं,
पण प्रश्न आहे – कधी सुरू होणार खरं कामं?

जनता विचारते, “कधी सुधारणार इथं कारभार?”
प्रशासनाचं उत्तर ठरलेलं – “लवकरच येईल सर्वंकश विकासाचा भार!”
पण दर निवडणुक, तेच वचन, तेच थाटातलं उद्घाटन,

कुठं आहेत त्यांचे ठोस परिणाम, हे विचारण्याचं आहे कुणाला धाडस?
मुलभूत गरजांसाठी भरपुर अर्ज-नोंदणी,
रांग, शिफारस, आणि फक्त प्रतिक्षा असते,

कोणी जर तक्रार केली तर “तपासतो” म्हणतात,
आणि शेवटी फाईल कुठल्या कपाटात हरवतात?
तरीही आम्ही असतो आशावादी —
कारण लोकशाहीवर आमचा विश्वास आहे.

एक दिवस नक्की येईल,
जेव्हा प्रशासन जबाबदार असेल, आणि खऱ्या अर्थाने लोकहित साधेल !
महिला, युवक, कामगार,आणि शेतकरी ,
सगळेच झिजतात रोज अशा व्यवस्थेत.
शहराचा विकास, असतो केवळ घोषणांत ,
तरी कृतीत दिसावा — हीच एक प्रामाणिक अपेक्षा आहे आमच्यात.
निवडणूक आली की यांना सगळे आठवतात,

दारोदार येऊन हात जोडतात.
पण एकदा सत्तेत आले की,
जनतेचा आवाजच बधीर होतो त्यांच्या दरबारात.

म्हणूनच सांगतो —
हे प्रशासन, आता जागं हो रे !
जनतेच्या प्रश्नांना उत्तर दे रे !
कारभाराला ‘पारदर्शकते’ची वाट दाखव!
शहर आमचं आहे, तुम्ही तर आमचे सेवक,

नेते नव्हे, कामगार बना रे ! हेच आमचं आहे ध्येयवाक्य.
शिरुरचा विकास हवा आम्हाला खराखुरा,
कारभार हवा जनतेचा, पारदर्शक तसाच सच्चा!


IMG 20250503 WA0005

शिरुर नगरपालिकेत एक नवीन योजना आली ! – “गडगडाट योजना”!

एक पत्रकार विचारतो,
” काय आहे ही योजना साहेब?”

अधिकारी म्हणतो,
“शहरात कुठेही चालताना कोणी  खड्ड्यात पडून ‘गडगड’ झाला,

तर आम्ही त्याच्या मोबाईलवर ,
‘Sorry for inconvenience’ मेसेज पाठवतो!”

पत्रकार: “पण इलाज करणार काय?”
अधिकारी: “इलाज नाही… तो येईल पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये !”



IMG 20250505 002243

खास वैचारिक भेट. ..

काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-

सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.

डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇

• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…

अंक ३३, सत्यशोधक मार्क्सवादी

About The Author