Missing Senior Lady : कवठे येमाई येथील ५० वर्षीय अनिता थोरात बेपत्ता, शिरूर पोलिसांत नोंदकवठे येमाई येथील ५० वर्षीय महिला अनिता थोरात बेपत्ता; शिरूर पोलिसांत मिसिंगची नोंद.

 

Missing Senior Lady : कवठे येमाई येथील ५० वर्षीय महिला बेपत्ता; शिरूर पोलिसांत नोंद

शिरूर,दिनांक 20 ऑगस्ट 2026:

61677 50kb(सिराज शेख,प्रतिनिधी,शिरूर तालुका यांच्याकडून)

कवठे येमाई ,ता. शिरूर, जि. पुणे येथील अनिता जालिंदर थोरात (वय ५०) या महिला ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग क्रमांक १२५/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

● Missing Senior Lady:अनिता थोरात असे महिलेचे नाव

अनिता थोरात या गावात चप्पल शिवून घरी परत येते, असे सांगून सकाळी सुमारे ११.५० वाजता राहत्या घरातून बाहेर पडल्या. मात्र, त्या अद्याप घरी परतलेल्या नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

● Missing Senior Lady:महिलेचे वर्णन

बेपत्ता महिलेचा रंग काळा-सावळा असून बांधा मध्यम आणि उंची सुमारे ५ फूट आहे. त्यांच्या डोक्यावर काळे-पांढरे लांब केस आहेत. त्यांनी राखाडी रंगाची, हिरव्या पट्ट्यांची साडी व ग्रे रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

त्यांच्या गळ्यात मणीमंगळसूत्र आणि नरेंद्र महाराज यांच्या फोटोची माळ आहे. कपाळावर अष्टगंध असून डाव्या हातात लाल-पिवळा धागा व इंग्रजीतील ‘S’ अक्षर कोरलेले आहे. पायात पैजण व चप्पल आहेत.

●शिरूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

Missing Senior Lady बाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास शिरूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार बनकर  करीत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विनोद पाटील काम पाहत आहेत.

●Read more news

Shirur Missing Girl Case: क्लासला सोडल्यानंतर 20 वर्षीय तरुणी बेपत्ता; शिरूर पोलिसांत नोंद

Shirur Missing Woman Case : मोराची चिंचोली येथील 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; शिरूर पोलिसांकडून शोध सुरू

About The Author