SAVE 20241101 222241

बहुजन मुक्ती पार्टी चे नाथाभाऊ पाचर्णे ‘शिरुर हवेली’ विधानसभा निवडणूकीच्या मैदानात ! स्व आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे ते जवळचे नातलग !

बहुजन मुक्ती पार्टी च्या उमेदवारामुळे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत ?

शिरुर, दि.2 नोव्हेंबर : ( प्रकाश करडे यांच्याकडून) 

बहुजन मुक्ती पार्टी चे नाथाभाऊ पाचर्णे ‘शिरुर हवेली’ विधानसभा निवडणूकीच्या मैदानात  उतरले आहेत. ते स्व. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे ते जवळचे नातलग आहेत. तर बहुजन मुक्ती पक्ष हा बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष श्री.वामन मेश्राम , बामसेफ संघटनेच्या परिवारातील हा अक्ष असल्याने बहुजन मुक्ती पार्टी च्या या उमेदवारामुळे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत रंगणार आहे मात्र निश्चित आहे.

पाचर्णे घराण्याचा वारसा : स्व.बाबुरावजी पाचर्णे यांचे जवळचे नातलग नाथाभाऊ ! 

 

बहुजन मुक्ती पार्टी चे नाथाभाऊ पाचर्णे 'शिरुर हवेली' विधानसभा निवडणूकीच्या मैदानात  उतरले आहेत. ते स्व. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे ते जवळचे नातलग आहेत. तर बहुजन मुक्ती पक्ष हा बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष श्री.वामन मेश्राम , बामसेफ संघटनेच्या परिवारातील हा अक्ष असल्याने बहुजन मुक्ती पार्टी च्या या उमेदवारामुळे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत रंगणार आहे मात्र निश्चित आहे.
स्व.बाबुरावजी पाचर्णे यांचा वारसा!

 

बहुजन मुक्ती पार्टी चे नेते व सामाजिक कार्यकर्ता नाथाभाऊ शिवराम पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातुन भरला आहे. शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील माजी आमदार , लोकनेते बाबुरावजी पाचर्णे साहेब यांच्यानंतर जनसामान्य लोकांचा हक्काचा माणूस म्हणून पाचर्णे कुटुंबातूनच नाथाभाऊ पाचर्णे यांच्या रूपाने नवीन चेहरा शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात मिळाला आहे. त्यामुळे या मतदार संघातील मतदारांच्या अपेक्षा पाचर्णे यांच्याकडुन वाढल्या आहेत. बहुजन मुक्ती पार्टीने शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात यावेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे.

स्व.बाबुरावजी पाचर्णे यांच्यानंतर शिरूर हवेलीच्या राजकारणात
पाचर्णे आडनावाचं गेल्या 35 वर्षात घोंगावत असलेले वादळ शांत होत आहे की काय याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. या पंचवार्षीकला यावेळी ‘पाचर्णे’ परिवारातील ‘कोणी निवडणुकीला उभे असणार की नाही ? अशी चर्चा सुरू होती. त्याला पुर्ण विराम मिळाला आहे.

चौरंगी लढत रंगणार? 

निवडणुक अर्ज भरताना बहुजन मुक्ती पार्टीने शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात भव्य शक्ती प्रदर्शन या निमित्ताने केले आहे. महाआघाडी चे उमेदवार श्री.अशोक पवार, महायुतीचे उमेदवार श्री.माऊली आबा कटके, राष्टीय समाज पक्षाचे श्री. शिवाजीराव कुर्हाडे यांच्या बरोबरीने आता नाथाभाऊ पाचर्णे यांच्यामुळे  शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात तुंबळ लढत रंगणार हे स्पष्ट आहे.

नाथाभाऊ शिवराम पाचर्णे : सामाजिक जाणीव व सामाजिक कार्यकर्ता ….

श्री.नाथाभाऊ पाचर्णे हे एक उच्चशिक्षित व अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व आहे.साधेपणा व नम्रता यांच्या बरोबरीने वैचारीक आधार असणारे ते आहेत. विद्यार्थी,पालक यांना शिक्षण संदर्भात असणाऱ्या समस्या, शिरूर तालुक्यातील खाजगी शाळांचा भ्रष्टाचारास आळा बसला पाहिजे यासाठी पुणे जिल्ह्यात त्यांनी  मोठ्या प्रमाणावर केलेली आंदोलने आणि त्याचे फळरुप कोट्यवधी रुपयांची फी सवलत, शेतकऱ्यांचे प्रश्न व छोट्या व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठेच्यासाठी आंदोलने, बेकायदेशीर वुक्षतोड करून चोरी करत असलेल्या अधिकाऱ्यांना दंड तसेच शिक्षा करण्यासाठी केलेले आंदोलन, तसेच सामान्य माणसांना प्रशासन व्यवस्थेत काही अडचण आल्यास तत्काळ मदतीला उभा असणारा सामान्य लोकांचा हक्काचा माणूस अशी त्यांची शिरूर,पारनेर व श्रीगोंदा या तीनही तालुक्यात मोठी ओळख आहे.

एम आय डी सी मधे स्थानिक व मोफत शिक्षण आरोग्य. …

सर्वसामान्य माणसात वावरणारे ते कार्यकर्ते आहेत. बालवाडी ते पदवी पर्यंत मोफत शिक्षण मुलांना मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांना हक्काची सर्व सुविधायुक्त बाजारपेठ, शेतमालाला हमीभाव,
शिरुर तालुक्यात असलेल्या रांजणगाव एम आय डी सी मधे स्थानिक भूमिपुत्रांना व सुशिक्षित तरुणांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा, औद्योगिक वसाहती मूळे होणाऱ्या प्रदूषणावर आवश्यक उपाययोजना तत्काळ करणे, सर्वसामान्य माणसांना, मोफत उत्तम दर्जाचे शिक्षण, सुसज्ज मोफत आरोग्य सुविधा, तरुणांना रोजगार मिळावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

उच्च विद्या विभुषित नाथाभाऊ….

नाथाभाऊ पाचर्णे हे स्वत: व्यवस्थापन शास्त्र मध्ये एम.बी.ए.   प्रशासन व्यवस्थापन मध्ये ,एम.ए. – लोकप्रशासन तसेच विधी शास्त्रात एल.एल.बी. पदवीधर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून नाथाभाऊ पाचर्णे हे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ‘बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक’ या  पदावर ते कार्यरत आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रासह प्रशासन व्यवस्थेमध्ये त्यांचा चांगला अनुभव आहे. शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात अनेक विद्यार्थी,पालक,शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आपला माणूस अशी त्यांची ओळख असल्याने या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित प्रचंड धनशक्ती असणाऱ्या नेत्यांच्या विरोधात सर्वसामान्य स्वाभिमानी मतदारांच्या साथीने नाथाभाऊ हे मोठे मतदार खेचण्यात यशस्वी ठरतील असे चित्र दिसत आहेत. असे घडल्यास शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील समीकरणे ते बदलु शकतात.

तसेच नाथाभाऊ पाचर्णे यांना सर्व बहुजन समाजाची मते मिळतील. कारण बहुजन मुक्ती पार्टी हा  ”बहुजन ‘ चळवळीतील एक महत्वाचा पक्ष आहे, त्यामुळे बहुजन समाजाच्या मतरुपी आशीर्वादाने त्यांना भरघोस मते मिळतील असा त्यांना विश्वास आहे.

सौम्य पण लक्षणीय संख्येने समर्थकांसह
उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येने पायी, दुचाकी आणि चारचाकी वाहनांतुन महिला, पुरुष मोठ्या संख्येने शिरुर तहसिल कार्यालय परिसरात जमा होउन नाथाभाऊ पाचर्णे यांना समर्थन करण्यासाठी जमला होता.त्यामुळे मतदारांचे लक्ष वेधुन घेण्यात बहुजन मुक्ती पार्टीला यश मिळाले आहे. हे आज स्पष्ट दिसत आहे.

बहुजन मुक्ती पक्षासह ‘बामसेफ’ चे कार्यकर्ते उपस्थित. …

यावेळी प्रमुख उपस्थिती बामसेफ संघटनचे राष्ट्रीय महासचिव गोरखनाथ वेताळ, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य विधानसभा प्रभारी सचिन भाऊ बनसोडे, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष फिरोझ सय्यद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या निवडणुक अर्ज दाखल करताना उपस्थित होते.

About The Author