Contents1 ऋषिराज पवार यांचे अपहरण आणि अश्लील व्हिडिओ व फोटो यांचे चित्रीकरण केल्याचा आरोप ?1.1 ऋषीराज पवार हे आमदार अशोक पवार यांचे पुत्र आणि कारखान्याचे चेअरमन !1.1.1 शिरुर,दिनांक 10 आक्टोंबर : (डा.नितीन पवार यांच्याकडुन )1.1.2 विधानसभा मतदार संघ शिरुर हवेली तील घटना….1.1.3 बंगला कुणाचा? निर्मनुष्य की स मनुष्य ?….1.1.4 महिला/मुलगी कोण?कुणी आणली?कशासाठी आणली?कुठे गेली?…..1.1.5 खंडणी उकळण्याचा प्रकार?…..1.1.6 विरोधक असलेल्या कार्यकर्यांची प्रतिक्रिया. …..1.1.7 ‘घोडगंगा सहकारी साखर कारखान्या’ चा प्रश्न. …1.1.8 सारांश…..1.1.9 About The Author1.1.9.1 Dr.Nitin Pawar1.1.10 ❤️ Support Satyashodhak Blog ऋषिराज पवार यांचे अपहरण आणि अश्लील व्हिडिओ व फोटो यांचे चित्रीकरण केल्याचा आरोप ? ऋषीराज पवार हे आमदार अशोक पवार यांचे पुत्र आणि कारखान्याचे चेअरमन ! शिरुर,दिनांक 10 आक्टोंबर : (डा.नितीन पवार यांच्याकडुन ) ऋषिराज पवार यांचे अपहरण आणि अश्लील व्हिडिओ व फोटो यांचे चित्रीकरण केल्याचा आरोप आज करण्यात आला आहे. ही घटना खळबळजनक तर आहेच पण ऋषीराज पवार हे आमदार अशोक पवार यांचे पुत्र आणि कारखान्याचे चेअरमन आहेत. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न सध्या एक संवेदनशील प्रश्न असल्याने या घटनेकडे पाहिले जात आहे. विधानसभा मतदार संघ शिरुर हवेली तील घटना…. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निवडणुकीतील प्रचार ऐनभरास आलेला असताना शिरूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार श्री. अशोक बापू पवार यांचे पुत्र ऋषिराज पवार यांच्यावर आज प्राणघातक अपहरण व त्यांचे अश्लील व्हिडिओ फोटो काढण्यात आला अशी माहिती ऋषीराज पवार यांनी माध्यमांसमोर दिली आहे. आमदार अशोक पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ,’ आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याची हे अत्यंत घाणेरडे कृती असून राजकारण एवढ्या खालच्या स्तराला जाईल असे वाटले नव्हते.’ मात्र यामागे नेमका कोणाचा हात आहे याबाबत स्पष्टता झालेली नाही. श्री. अशोक पवार आणि कृषिराज पवार यांनी पोलिसांकडे या प्रकाराची कसून आणि त्वरित चौकशी करण्याची मागणी केलेली आहे .’ऋषिराज प वाद’ दरम्याण शिरुर पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला आहे.त्यात कोळेकर हा प्रमुख आरोपी असुन इतर चार जण त्याचे साथीदार आहेत,असे समजते. बंगला कुणाचा? निर्मनुष्य की स मनुष्य ?…. विविध माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार ऋषीराज पवार हे आज सकाळी नऊ ते बारा/ एक वाजण्याच्या दरम्यान मांडवगण फराटा परिसरामध्ये होते .त्यावेळेस एक नुकताच त्यांच्या पक्षांमध्ये आलेला कार्यकर्ता त्यांना दुसऱ्या एका मित्राकडे जेवणासाठी घेऊन म्हणून निघाला. त्यावेळेस इतर काही जणांनी ऋषिराज पवार यांना एका बंगल्यामध्ये नेले. तेथे त्यांना दम देण्यात आला. गळा आवळण्याचा प्रयत्न झाला. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली . ‘ समोरच्या पार्टीकडून दहा कोटी रुपयांची सुपारी तुझे अश्लील फोटो व व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मिळालेली आहे ! तुझे फोटो आणि व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत आणि आता दहा कोटी रुपये दे नाहीतर हे सर्व व्हिडिओ फोटो व्हायरल केले जातील’ अशी त्यांना धमकी दिली. महिला/मुलगी कोण?कुणी आणली?कशासाठी आणली?कुठे गेली?….. एवढेच नाही तर एका महिलेला त्या ठिकाणी आणण्यात आलेले होते. आणि त्या महिलेला तिचे अंगावरील कपडे काढायला लावून बळजबरीने ऋषिराज पवार यांचे तिच्यासोबत काही फोटो व व्हिडिओ घेण्यात आले. त्यानंतर त्या महिलेला दुसरीकडे पाठवण्यात आले. त्यानंतर ऋषिराज पवार यांना गाडीवरून नेत असताना ऋषिराज पवार यांनी आपल्या मित्रांना मेसेज करून रस्त्यावर थांबण्यास सांगितले होते. त्यानंतर ते ज्यांच्या बरोबर जात होते त्यांना त्यांच्या मित्रांनी ताब्यात घेतलेले आहे. आणि सर्व झालेला प्रकार त्यांनी माध्यमांत पुढे सांगितलेला आहे. त्यामुळे असा हा प्रकार कोणीही केलेला असला तरी निश्चितच निषेधार्ह आहे. शिरूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून यामागे काय कारस्थान आहे? किंवा कोणी आणि कशासाठी हे कारस्थान केलेले आहे ? हे सर्व नागरिकांसमोर ठेवावे आणि ‘दूध का दूध पाणी का पाणी’ करावे अशी अपेक्षा विविध स्तरातल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे . एकंदरीत असा प्रकार शिरुर हवेलीसाठी नवीन आणि निंदनीय असा आहे. या प्रकरणात गुंतागुंत असल्याचे स्पष्ट दिसते. या कामासाठी एक महिलाही संबंधित बंगल्यामध्ये आणण्यात आलेली होती.ती कोण होती ? कुणी आणली होती की? इतर आणखी काही प्रकार यामागे आहे का? खंडणी उकळण्याचा प्रकार?….. राजकीय कारणे आहेत की वैयक्तिक कारणे आहेत की सुपारी घेऊन गेलेले कृत्य आहे की अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रकार आहे. याबाबत कसुन तपास होणे गरजेचे आहे. श्री .अशोक पवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून यामागे कोण आहे ते पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढले पाहिजे आणि ‘आपण गांधीवादी परंपरेतील असून इतक्या खालच्या स्तरावरचे राजकारण यापूर्वी तरी पाहिलेले नाही आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे’ असे म्हटलेले आहे. दरम्यान खाजगी मध्ये बोलताना अनेक विरोधकांनी सुद्धा याबाबत आम्ही अशा प्रकारचे कुठलेही क्रृत्य कधीच करू शकत नाही. मात्र या मागचा उद्देश दुसरा काही वेगळा असावा , वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत. विरोधक असलेल्या कार्यकर्यांची प्रतिक्रिया. ….. त्यामुळे प्रमुख विरोधक असणाऱ्या गटाकडून अशा प्रकारच्या कुठल्याही क्रुत्याचा प्रकार होणार नसल्याचे नसल्याचे सामान्य विरधी कार्यकर्त्यांनी तरी सांगितले आहे. कार्यकर्त्यांची तशी मानसिकता नाही. असे नाव न सांगता एका कार्यकर्त्यांने मत व्यक्त केले आहे. मात्र याबाबत खरोखर तपास होऊन सत्य पुढे आले पाहिजे.हे स्वतंत्रपणे नियोजित कारस्थान आहे,असे मात्र दिसते. याला राजकीय रंग देऊ नये .अशा प्रकारची भूमिका विरोधक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सत्यशोधक न्यूज बोलताना सांगितले आहे. मात्र हा झालेला प्रकार कोणी स्वतःवर करेल अशी शक्यताही नाही आणि नुकताच काही दिवसापूर्वी आलेला एक व्यक्ती ऋषीराज पवार यांच्याबरोबर होता.तो कोनत्या हेतुने आला होता?त्याने त्यांना बरोबर घेऊन जेवणासाठी म्हणून दुसऱ्या एका मित्राकडे जाण्यासाठी ते निघालेले होते आणि अशा वेळेस एका ठिकाणी त्यांची गाडी काही कारणांमुळे थांबली की थांबवली ? आणि त्या प्रसंगी त्यांना एका बंगल्यामध्ये नेण्यात आले.,बंगल्यात इतर कोणी नव्हते का? त्यानंतर सर्व प्रकार घडला असल्याचे ऋषीराज यांनी सविस्तर सांगितले आहे. ऋषिराज पवार यांनी एका व्यक्तीच्या गाडीवर बसलेले असताना त्यावेळेस त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मित्रांना , कार्यकर्त्यांना मेसेज केला आणि मदत मागितली . रस्त्यात थांबायला सांगितले. असे सांगितले आहे. जीवाच्या भीतीपोटी त्यांनी पैसे देण्याचेही कबूलही केले . थोडेफार पैसे माझ्या मित्रा जवळ असतील त्यांच्याकडून घेऊन देतो असे सांगितले आहे. हे स्वाभाविक आहे . ‘घोडगंगा सहकारी साखर कारखान्या’ चा प्रश्न. … परंतु एकूणच राजकीय तापलेल्या पार्श्वभूमीवर शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघात घडलेली ही घटना काय संकेत देत आहे? तसे पहिले तर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये श्री. अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दोन वेळा आमदार असलेले आणि आता तिसऱ्यांदा लढत असलेले उमेदवार आहेत. त्यांचे पुत्र ऋषीराज हे देखील राजकारणात असून कारखान्याचे चेअरमन आहेत. शिरूर तालुक्यात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न एक ज्वलंत प्रश्न सध्याच्या स्थितीमध्ये आहे . त्याबाबत भावना तीव्र आहेत आणि वेगवेगळे दावे प्रती दावे केले गेलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विषयात विशेष भाग घेतलेला आहे. अशोक पवार यांच्यावर अजित दादा पवार हे नाराज तर आहेच पण पूर्वी त्यांनी म्हटले होते की अशोक पवार यांना मी निवडून येऊ देणार नाही आणि ताज्या भाषणांमध्ये त्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना मी बंद पडला आहे असे तुम्ही म्हणत असाल तर मी तुमचा देखील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडू शकतो असे म्हटले होते . साखर कारखाना, निवडणुका, पैशांच्या, मोठी कामे, कंत्राटी, वेगवेगळी विकास कामे शिरुर शहरातील बस स्थानक, अतिक्रमणे उठवणे वगैरे इत्यादी अनेक गोष्टी अशोक पवार यांच्या दृष्टीने वादग्रस्त ठरलेले आहेत. त्या त्याबाबत त्यांनी देखील आपली भूमिकाही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. सारांश….. थोडक्यात म्हणजे या सर्व प्रकारानंतर शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंसाचार किंवा अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याची काळजी कार्यकर्त्यांनी ,नागरिकांनी, आणि सर्वांनी घेणे आवश्यक आहे.शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघाचा इतिहास अशा प्रकारच्या राजकारणाचा नाही . शिरूर विधानसभा मतदारसंघातील जनता ही राजकारण चांगले समजते . हिंसाचारावर कधी येत नाही. आरोप प्रत्यारोप अनेक प्रकारचे होतो राहिले आहेत. परंतु हिंसा मात्र या हवेली मतदारसंघांमध्ये घडण्याची शक्यता गेल्या दोन तीन घटनांच्या नंतर निर्माण झालेली असल्यामुळे हा मतदारसंघ संवेदनशील मतदार संघ म्हणून त्याकडे विशेष लक्ष पोलीस खात्याने पुरवणी आवश्यक आहे. एवढे मात्र या निमित्ताने म्हणता येईल ! About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन पत्रकार कसे बनावे ? दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत व्यावहारिक जीवनातही प्रगतीशिल !