Shirur Bakri Eid Meeting 2026 : शिरूर पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईद निमित्त पोलिस अधिकारी, मौलाना आणि मोहल्ला कमिटी सदस्यांचीबकरी ईद 2026 च्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता व सौहार्द राखण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.

25 मे 2026

Shirur Bakri Eid Meeting 2026 बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशन येथे आज सकाळी 11 वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, विविध मस्जिदींचे मौलाना तसेच मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते.

“शिरूरमध्ये बकरी ईदपूर्व पोलिसांची मोठी बैठक झाली आहे!”

सणाच्या काळात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी Shirur Bakri Eid Meeting 2026 मधे पोलीस प्रशासनाने उपस्थितांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

“शांतता राखा, सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, स्वच्छता नियमांचे पालन करा आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.”

Contents

बकरी ईद म्हणजे काय?

बकरी ईदला ईद-उल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असे देखील म्हणतात. हा इस्लाम/मुस्लिम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. हा सण त्याग, श्रद्धा, मानवता आणि ईश्वराप्रती समर्पण यांचे प्रतीक मानण्यात येतो.

इस्लामिक धर्म परंपरेनुसार यांनी ‘अल्लाह’ च्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपल्या मुलाचा त्याग करण्याची तयारी दाखवली होती. त्यांच्या श्रद्धेची परीक्षा घेतली गेली होती. त्यांच्या निष्ठेमुळे अल्लाह ने त्यांना सत्य मार्ग दिला. त्या घटनेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो.

बकरी ईद मध्ये मुस्लिम धर्मातील लोक सकाळी विशेष नमाज ‘अदा’ करतात. त्यानंतर धार्मिक परंपरेनुसार ‘कुर्बानी’ दिली जाते. या कुर्बानीचा मुख्य उद्देश फक्त धार्मिक विधी नाही तर त्यामागे त्याग,एकमेकांनी वाटून घेणे व गरजूंना मदत करणे हा संदेश आहे.

या दिवशी कुर्बानीतून मिळालेल्या काही भागांपैकी काही भाग गरजू व गरीब लोकांना दिला जातो.ते गुपीत ठेवले जाते. कारण ते प्रसिद्धी साठी केले जात नाही. निरपेक्ष भावनेने केले जाते. ‘गवाह’ फक्त ‘अल्लाह’च असतो. त्यामुळे सामाजिक समता आणि बंधुभाव वाढवण्याचा संदेश यातुन दिला जातो.

” इस्लाम एक असा धर्म आहे, त्याने मानवाला नवी सन्स्कृती दिली. तत्वज्ञान, आहार पद्धती, धर्म, पेहराव, प्रार्थना पद्धती, समता, स्थापत्यशैली, अलन्कार पद्धती, उपासना पद्धती, मध्ययुगात अल्गोरीदम, अल्जेब्रा, अल्कली, आम्ल असे रासायनिक शब्द, साहित्य, काबुलीवाला, अरेबियन नाईटस् मधील कथा, अल्लाउद्दीन आणि जादुई दिवा, अल्लाउद्दीन आणि चाळीस चोर, सन्त सोफिया, सुफी पन्थ, अत्तरे, पान खाने, एका ताटात जेवणे अशा अनेक सुंदर गोष्टी दिल्या.

जगात एक देश नाही की तिथे इस्लाम पोचला नाही. जसे जेवणात मीठ चव भरते, तसे इस्लामने मानवी जिवनाला एक रन्ग, आयाम आणि स्वतन्त्र असा,’कायदा’शरियत दिला. असी वेगळ्या अनेक गोष्टी दिल्या! जानवरो को इन्सान बनाया!” –

❤️ सम्पादक डॉ. नितीन पवार, शिरुर

बकरी ईद हा फक्त धार्मिक सण नाही तर समाजिक एकोप्याचे, परस्पर आदराचे व मानवतेचे प्रतीक देखील आहे. लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. नातेवाईकांना भेटतात.आनंद साजरा करतात.

या सणातून मिळणारा मोठा संदेश असा आहे की माणसाने स्वार्थापेक्षा त्याग, सहकार्य व मानवतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

Shirur Bakri Eid Meeting 2026 :  पोलिसांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

1. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

•  सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले.

2. सोशल मीडियावर अफवा टाळा

•  कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य, अफवा किंवा समाजात गैरसमज निर्माण करणारे संदेश प्रसारित करू नयेत, असे सांगण्यात आले.

3. धार्मिक भावना दुखावणारे प्रकार टाळा

• सर्वांनी एकमेकांच्या धार्मिक भावना आणि सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन करण्यात आले.

4. स्वच्छता आणि नियमांचे पालन

• कुर्बानीच्या वेळी स्वच्छता राखून नगरपालिका आणि ग्रामपंचायत नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

5. वाहतूक कोंडी टाळण्याचे निर्देश

• सणाच्या काळात वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले.

6. संशयास्पद हालचालीची माहिती द्या

• कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.Shirur Bakri Eid Meeting 2026 मधे अशा महत्वाच्या सुचना देण्यात आल्या.

” बकरी ईद, त्याग, मानवता व बंधुभाव या विषयाला सुसंगत अशा 4 मराठीत मांडलेल्या विचारवंतांची उद्धरणे ” :

👉गौतम बुद्ध-

“द्वेषाने द्वेष संपत नाही; प्रेम आणि करुणेनेच तो संपतो.”

👉महात्मा ज्योतिराव फुले-

“मानवतेपेक्षा मोठा धर्म कोणताही नाही.”

👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर-

“माणसाचे मोठेपण त्याच्या समाजासाठी केलेल्या कार्यात असते.”

👉गांधीजी-

“स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला इतरांच्या सेवेत समर्पित करणे.”

सहकार्याचे आश्वासन

Shirur Bakri Eid Meeting 2026 मधे उपस्थित सदस्यांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच बकरी ईद सण शांततेत आणि बंधुभावाने साजरा केला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न–

1. प्रश्न: बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?

उत्तर: शिरूर पोलीस स्टेशन येथे.

2. प्रश्न: बैठकीत कोण उपस्थित होते?

उत्तर: मोहल्ला कमिटी सदस्य, मौलाना, प्रतिष्ठित नागरिक आणि मुस्लिम समाजाचे अध्यक्ष.

3. प्रश्न: सोशल मीडियाबाबत काय सूचना देण्यात आल्या?

उत्तर: अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश प्रसारित करू नयेत.

‘इस्लामी सन्स्कृती’ नावाचे एक पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले आहे. इस्लामने मानवतेला कोनती देणगी आहे. ते साने गुरुजी यांना त्याच्या मधाळ, प्रामाणिक, नैसर्गिक प्रतिभेची देणगी लाभलेल्या शब्दात इस्लामची ओळख मराठी माणसाला करुन दिली आहे. इस्लाम ने रानटी अवस्थेत जगणार्या मोठ्या मानव समुहाला माणसात आणले!

“अशाच ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा – सत्यशोधक न्यूज.”

Summary👇

शिरूर पोलीस स्टेशन येथे बकरी ईद 2026 च्या पार्श्वभूमीवर मोहल्ला कमिटी सदस्य, मौलाना आणि प्रतिष्ठित नागरिकांची बैठक पार पडली. सण शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी कायदा-सुव्यवस्था राखणे, सोशल मीडियावरील अफवा टाळणे, स्वच्छता नियमांचे पालन करणे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आणखीन सत्यशोधक बातम्या—

शिरुरचा इतिहास आणि व्यक्तिमत्वे

शिरुरची आजची राजकीय संस्कृती

Shirur illegal construction protest : अतिक्रमण बातमी, शिरुर

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support