Shirur Atikraman Puran 19 शिरुर अतिक्रमण पुराण हे आता 18 पुराणांच्या नंतर 19 वे पुरण म्हणून संस्कृत साहित्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अतिक्रमण म्हणजे शिरूरच्या सर्व स्तरातल्या, सर्व वर्गातल्या, सर्व जातींच्या आणि सर्व धर्मांच्या, प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या आणि एकूणच सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न राहत आलेला आहे. Contents1. Shirur Atikraman Puran 19 : दिनांक 25 मे 20262. Shirur Atikraman Puran 19 आणि कायदा3. मिडीया ची भुमिका4. पक्षपात हा नेहमीच?5. Shirur Atikraman Puran 19 : जमीन कुणाची?मुलभूत प्रश्न!6. सर्व सारखेच!7. मिनी भारत?8. अतिक्रमण पुराण 198.1. आणखीन खास ‘सत्यशोधक’ सम्पादकीय वाचा:8.2. About The Author8.2.1. Dr.Nitin PawarShirur Atikraman Puran 19 : दिनांक 25 मे 2026आज दिनांक 25 मे रोजी पुन्हा एकदा अतिक्रमण करणाऱ्यांच्या अतिक्रमणावर सरकारी हातोडा पडलेला आहे. एकूणच या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये कारवाईकर्त्यांमध्ये, अतिक्रमणधारकांमध्ये आणि अतिक्रमणविरोधकांमध्ये ‘कही खुशी तो काही गम’,’ तो काही ‘बीच वाली’ भावना दिखाई देती है. बीच वाल्याना यांना याचे काही सोयर सुतक नसते. हे झाले तरी ठीकच.आणि हे झाले नाही तरीही ठीक आहे. आणि काहीही झाले तरी ठीकच,अशी मानसिकता किंवा जीवनातच कशात कधी नकारात्मक ना सकारात्मक हस्तक्षेप करण्याची करण्याचा स्वभाव असणारी मंडळी असतात.म्हणून तो उल्लेख!Shirur Atikraman Puran 19 आणि कायदाअखेर कायद्याप्रमाणे मुख्याधिकारी, शिरुर नगरपालिका यांच्या आदेशाने, शिरूर पोलिसांच्या व इतर पोलिसांच्या बंदोबस्तात, शिरूर शहरातील मुख्य पुण नगर रोड रोडवरील पाबळ फाट्यापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंतच्या भागामध्ये जे अतिक्रमण होते ते पाडण्यात आले. काही अपवाद!आणखीन या कार्यवाहीचा पुढचा भाग ऊद्या असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आता नेमके ऐकावे कुणाचे? असा प्रश्न तटस्थ आणि कायद्याची माहिती असणारे व्यक्तीला पडतो. अतिक्रमण करणे हा कायद्याने गुन्हा तर आहेच. मग तो कोण आहे, गरीब असो, धनवाद असो, पाच कंदील चौकात एक इंच जरी अतिक्रमण असलेला असो किंवा नदीच्या बाजूला हळदी मोहल्यासारख्या व इतर भागांमध्ये झोपड्या वगैरे बांधणारे असोत.ते सरकारी जागेत असतात, ते बांधणे, काही बांधून पुन्हा भाड्याने देणे, भाडे घेणे हे सर्वच बेकायदेशीर असतेच. दुसऱ्या बाजूला गोरगरीब, अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या हातावर पोट चालधणार्या कष्ट कर्याचे असो, त्यांचे कापडी, त्यांच्या पधारी,त्यांच्या हातगाड्या किंवा अन्य काही ते पाडले जाते.मिडीया ची भुमिकाअशा सर्व प्रकारचे व्हिडिओ, ऑडिओ, चर्चा करणे,मते घेणे, लोकांची प्रतिक्रिया विचारणे या सगळ्या गोष्टींसाठी साधने उपलब्ध झालेली आहेत असा तो हा जमाना आहे.पुढे तो कायमच असणार आहे.आम्ही दहावी झाल्यानंतर अकरावीला इथे आलो.तेव्हा देखील इंदिरानगर मध्ये ‘हाच ‘ विषय आणि त्यानंतर तेथे समजूत काढण्यासाठी त्यावेळी दिवंगत ‘रसिकलाल धारीवाल आलेले आणि बोललेले मला अजून आठवते. त्यानंतर जवळपास पाच दहा वर्षांनी पुन्हा पुन्हा अतिक्रमण हा विषय नागरिकांच्या समोर येतोच. नागरिकांचे म्हणणे देखील खरे आहे. खऱ्या वाटतात आणि कायद्याची भूमिका देखील खरी असते, खरी वाटते.अशा वेळेस ‘कुट प्रश्न’ ज्याला म्हणतात,तसा जणू काही प्रश्न निर्माण होतो. एका बाजूला भावना, दुसऱ्या बाजूला जर जबाबदारीने संविधान जाणणारा, कायदे मानणारा कोणी व्यक्ती असेल तर त्याच्या मनामध्ये जणू काही एक धर्मयुद्ध सुरू होते.तत्त्वांचे युद्ध सुरू होते. हे मात्र खरे.पक्षपात हा नेहमीच?‘पक्षपात’ होत असल्याचे मात्र प्रत्येक वेळेस मी पाहत आलेलो आहे.तसा आरोप होत असल्याचे पाहत आलेला आहे. तर काही जनानी ते योग्यच आहे.असे कायदेशीर उत्तर दिले गेलेले देखील मी पाहत आलेलो आहे. आता इथं व्यक्तिगत कोणी नगरसेवक असेल,अधिकारी असेल,कार्यकर्ता असेल,पोलीस असेल यांच्या बद्दल काही न बोलता मुळापर्यंत जाऊन काही शोधणे आवश्यक आहे.Shirur Atikraman Puran 19 : जमीन कुणाची?मुलभूत प्रश्न!जमीन निसर्गाची की मानवाची? की मानवांमधल्या काही सत्तेतील लोकांची? की आर्थिक दृष्ट्या कंगाल असणाऱ्या, ‘नाहिरे’ वर्गाच्या शोषणाची बाब असते? ती जमिनीचे लोकेशन, जागेचे लोकेशन,त्याला असणारा भाव, त्यावर मोठी बांधकामे करणे,काही हजार करोड रुपयांचे मोठे मोठे प्रकल्प आणि पैसा यांची स्वप्न पाहणारे लोक यांची असते?यांचा हेतू पाहायचा की कायद्याचे महत्त्व की भावनिक आणि गरिबीचे महत्त्व पाहिले पाहिजे? असे प्रश्न निर्माण होतात.सर्व सारखेच!पण एक गोष्ट आता नमूद करावी लागेल आपल्याला वाटते की अमुक ठिकाणचे अतिक्रमण हे खरोखरच गरीबाचे आहे का? तर ते तसे असतेच असे नाही.तर फुकटखाऊचे आणि बऱ्याच काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या भागांमध्ये छोटी मोठी अतिक्रमणे, छोट्या जागा, रोडवरील जागा, गाड्या, छोटे दुकाने,टपऱ्या, हातगाड्या या त्या वेळच्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्षांच्या आशीर्वादाने बांधलेल्या होत्या. त्यांनी एकापेक्षा जास्त कितीतरी अशा प्रकारच्या टपर्या भाडे घेऊन,जागा भाड्याने देऊन, परराज्यातील आणि थोड्या स्थानिक कष्टकऱ्यांकडून भाडे घेऊन काही ‘माया’ जमा केली. आणि ती ‘मोहमाया ‘ सोडवत नाही. असे दिसते.बहुतेक अतिक्रमणे नवीन नाहीत. जुनी आहेत. मग याने त्याला विकले असे दाखवले आणि कष्टकऱ्यांनी त्या ठिकाणी कष्ट करत तेथे व्यवसाय करणे, चालवणे त्यातून प्रगतीही करणे आणि इथल्या ‘ऐतखाऊ ‘ प्यारासाईट, भाई,गुंड यांना त्यांची योग्यता नसताना थोडेफार श्रीमंत करण्यास हातभार लागला जाणे हे घडले .त्यातून मग राजकीय विरोधक, समर्थक आर्थिक हित संबंध असणे,नसणे यावरून अतिक्रमण हे ‘राजकीय हत्यार ‘ म्हणून विरोधकांनी,सत्तेतल्यानीही वापरणे सुरु झाले.आणि महत्त्वाचे म्हणजे आर्थिक तोटे, फायदे, यानुसार आपले मुख्य ‘इंटरेस्ट्स’ पूर्ण करणे हे झाले.काहींचे ‘ते’ अपूर्ण राहीले.प्रमुख नोंदवण्याची गोष्ट म्हणजे यात सगळेच सारखे आहेत.हा पश्चिम महाराष्ट्र आहे.औद्योगिक क्षेत्रांचा भाग आहे. खरोखरच गरीब म्हणून म्हणावा असा इथे चुकून एखादा सापडेल. इथला गरीब तीन-चार विमलच्या पुड्या प्रत्येकी 25 रुपये किंमत असणाऱ्या दिवसाला खातो.दोन-तीनशे रुपयेची दारू पितो.अनेक प्रकारच्या कमाई ‘करणाऱ्या’ ही इथे आहेत.यांच्याकडे देखील दुर्लक्ष करणे म्हणजे योग्य विश्लेषण न करणे असे होईल.मिनी भारत?तर असे घटक आहेत. गुंतागुंतीच्या अंतरक्रिया आहेत. त्याचेही प्रमुख कारण हे महाराष्ट्रातल्या नेहमीच्या आणि सर्वत्र असणाऱ्या गावांसारखे हे गाव नाही.गावासारखी रचना नाही. यात उत्तर आणि दक्षिण भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या,अगदी उत्तरपूर्वेकडील राज्यांमधल्या आणि केरळ, तामिळनाडू अशा सर्व भागातला जणू ‘मिनी भारत’ येथे निर्माण झालेला आहे. आणि भारताच्या ‘ड्रायव्हर्सिटी’ मध्ये ‘भारी एकता’, मनोरंजन,आर्थिक देवाणघेवाण,लाफडा लफडी असा सर्व काही मसाला आहे इथं ! तो या शिरूर शहर आणि परिसरामध्ये खचून भरला गेला आहे.तो अलीकडच्या काही वर्षांमध्ये जास्त वाढला .मोठा पैसा इथे झाला.म्हणून त्याला वेगवेगळे अँगल्स आहेत. आणखीन काही काही तुम्ही म्हणाल ते निकष, पुरावे, फॅक्ट्स,सर्वे, संशोधने आणि आणखीन काही काही लावले तर आपण यावर अगदी मोठी ‘पुराणकथा ‘ लिहिली जाईल आणि ती एकूण पुरानामधे 19 वे नवीन पुराण म्हणून मान्य देखील होईल! तेही आता सोपे झाले आहे.तसे भारतीय धर्मशास्त्र फ्लेक्झीबल आहे आणि तेच त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या मागचे एक कारण आहे. संस्कृती फ्लेक्सिबल आहे. म्हणूनच टिकली असेही यातील अभ्यासकांनी सांगितलेले आहेच. लिहीलेले आहे.अतिक्रमण पुराण 19तर असे हे ‘अतिक्रमण पुराण’ काहींना आनंद देणारे, काहींना त्रास देणारे,तर काहींना दुसऱ्याला त्रास झाल्याने ‘असुरी ‘ आनंद होतो,या प्रकारातले आहे. ते लोकांना देखील त्यांच्या त्यांच्या इंटरेस्ट प्रमाणे काही बाबतीत खुशी काही बाबतीत गम देते. हे मात्र खरे!अशीही Shirur Atikraman Puran 19 कथा सुमंगळ आणि सम्पन्न! आणखीन काय काय असते ते , पहिले प्रत्येक गोष्टीमध्ये असायचे ते,अशी आहे आणि प्रत्येकाने आपण त्यात कुठे बसतो? हे आपल्या आपल्या मनात शोधून पहावे! एवढेच काय ते खरे आहे!आणखीन खास ‘सत्यशोधक’ सम्पादकीय वाचा:नगरपालिकेचा विद्युत विभाग असे का वागतो? | Shirur Electricity Office वर गंभीर प्रश्नShirur Education News: सरकारी शाळा वाचवा अभियानांतर्गत पद नियुक्ती कार्यक्रम उत्साहातShirur Crime Drugs News : मोठी बातमी? शिरूरमध्ये अमली पदार्थ प्रकरण उघड; तिघांना अटक, 21.52 लाखांचा मुद्देमाल जप्त!About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनTrupti Films च्या निर्मात्यांच्या कन्येचा शुभविवाह श्रीगोंद्यात थाटामाटात संपन्न Shirur Bakri Eid Meeting 2026 : शिरूर पोलिसांची बकरी ईदपूर्व बैठक; शांततापूर्ण सण साजरा करण्याचे आवाहन