Contents1 Shirur Education News: सरकारी शाळा वाचवा अभियानांतर्गत पद नियुक्ती कार्यक्रम उत्साहात1.1 शिरुर मधील आणखीन बातम्या वाचा >>>>>>1.2 About The Author1.2.1 Dr.Nitin Pawar1.3 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Education News: सरकारी शाळा वाचवा अभियानांतर्गत पद नियुक्ती कार्यक्रम उत्साहात शिरूर,दिनांक 11 एप्रिल 2026: प्रतिनिधी Shirur Education News अन्तर्गत शिरुरमधील शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण बातमी हाती येत आहे. शिरूरमध्ये शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा ‘सरकारी शाळा वाचवा ‘या अभियाना अंतर्गत पद नियुक्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे . या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. शिक्षण क्षेत्रातील हा महत्वाचा भाग म्हणून या कार्यक्रमाची मोठी चर्चा होत आहे. सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत. त्यामधे भौतिक सुविधा सुधारल्या तर विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल. या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. Shirur Education News नुसार या अभियानामुळे खाजगी शाळांकडून होणारी पालकांची आर्थिक लूट थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.ही बाब यात अधोरेखित होत आहे. भारतातील शिक्षण धोरणाबद्दल अधिक जाणून घ्या: https://www.education.gov.in या अभियानाचे मुख्य संयोजक मा. सुदामराव लगड यांनी सांगितले की, ‘ सरकारी शाळांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणे’ हेच या अभियानाचे मुख्य ध्येय आहे. त्यांच्या या पुढाकाराला शिरूरमधील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे या Shirur Education News मध्ये नमूद करण्यात आले आहे. शिक्षणाचा अधिकार (Right to Education) बद्दल माहिती: https://dsel.education.gov.in/rte या अभियानाची औपचारिक सुरुवात शिरूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अॅड. किरण आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, शिक्षणप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. असे Shirur Education News मध्ये सांगितले आहे. कार्यक्रमादरम्यान विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. हाजी अजीम भाई सय्यद यांची शिरूर तालुका अध्यक्षपदी, मौलाना ताहेर काझी यांची शिरूर शहर उपाध्यक्षपदी, शाबान शाह यांची प्रमुख संघटकपदी तसेच सिराज शेख (बब्बू भाई) यांची शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे.या नियुक्त्यांमुळे अभियानाला अधिक बळ मिळणार असल्याचे Shirur Education News मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी शाळांच्या सुधारणा उपक्रमांबद्दल वाचा: https://www.ncert.nic.in नवीन पदाधिकाऱ्यांनी भविष्यात सरकारी शाळांना भेटी देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच भौतिक सुविधा सुधारून लोकसहभागातून शाळांचा विकास साधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. Shirur Education News नुसार हा उपक्रम शिरूरच्या शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.हे नक्की. या निवडीबद्दल शिक्षण हक्क मंच पुणे व पालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चांदभाई बळबट्टी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिरुर मधील आणखीन बातम्या वाचा >>>>>> नगरपालिकेचा विद्युत विभाग असे का वागतो? | Shirur Electricity Office वर गंभीर प्रश्न Shirur illegal construction protest : अतिक्रमण बातमी, शिरुर Shirur Municipal Council Election 2025: प्रशासकीय अपयश, पाणी संकट आणि राजकीय समीकरणांचे विश्लेषण About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Accident News : उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू MD Drug Seizure Shirur : शिरुर मेफेड्रोन बालक ताब्यात , ₹1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त