SC Sub Categorization Maharashtra – महार-मातंग वादाचे वास्तव भाग 3, अनुसूचित जाती उपवर्गीकरण, सामाजिक न्याय आणि आरक्षणावरील माहिती.SC Sub Categorization Maharashtra : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरण, महार-मातंग वाद, सामाजिक न्याय, आरक्षण आणि संविधानातील समानतेच्या तत्त्वाचा अभ्यास.
Advertisement
Advertisement

SC Sub Categorization Maharashtra हे उपवर्गीकरण, सामाजिक न्याय आणि पुढील दिशा (भाग ३ – निष्कर्षात्मक विश्लेषण) हा तिसरा लेख क्रमाणे प्रकाशित करत आहे. महत्वपूर्ण व ऐतिहासिक वळणावर काही वेळा व्यक्ती व समाज असतो. तेव्हा खुप विचार पुर्वक, दुरदृष्टीने त्याकडे प्राप्त काळात पाहणे गरजेचे असते.

SC Sub Categorization Maharashtra उपवर्गीकरणाच्या चर्चेपलीकडे : पुढे काय?

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही. हे समजणे सोपे आहे.तो सामाजिक न्याय, सार्वजनिक धोरण, प्रतिनिधित्व आणि संविधानातील समानतेच्या तत्त्वांशी जोडलेला विषय आहे.

त्यामुळे या प्रश्नावर केवळ राजकीय भूमिकांच्या आधारे नव्हे, तर विश्वसनीय आकडेवारी, सामाजिक संशोधन आणि घटनात्मक मूल्ये यांच्या आधारे चर्चा होणे आवश्यक आहे.

आर्थिक आधार आरक्षणाला नाही. कारण आर्थिक आधारावर वर्ग ठरतात हे खरे आहे. पण जात जन्मावर ठरते. बदलता येत नाही. शिवाय दर्जाबाबतची उतरन्ड बदलत नाही. दलित राष्ट्रपती, आदिवासी मुख्यमंत्री इ. शब्द आपण ऐकतो. फक्त मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती म्हणताना जिभेला जड जाते. ते ही उतरन्डीतल्या स्थानावरुन हे आपण पाहतो.

आर्थिकच सर्व रचना ठेवायची म्हटले तर मार्क्सवादी घटनेसह सर्व बदलावे लागेल. ते ही कल्याणकारी आहेच. ते शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्याशी सुसन्गतही ठरेल. कारण ते डाव्या विचारसरणीच्या चळवळीमधे आधीच जनजागृतीचे कार्य करत होते. रशियाने त्यांना सन्मानितही केले. हा विषय मोठा आहे. वेगळे मन्थन करण्याचा विषय आहे.

SC Sub Categorization Maharashtra सामाजिक वास्तव : समान समस्या, समान संघर्ष

महार, मातंग आणि इतर अनेक अनुसूचित जातींना आजही सामाजिक पर्यायाने सर्व बाबतीत पुढील आव्हानांचा सामना करावा लागतो:

• गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव

• बेरोजगारी

• कौशल्य विकासाच्या मर्यादित संधी

• ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कमतरता

• सामाजिक भेदभाव

• आर्थिक असमानता

• शहरी स्थलांतर आणि असुरक्षित रोजगार

या समस्या कोणत्याही एका समाजापुरत्या मर्यादित नाहीत. त्यामुळे दीर्घकालीन उपायांसाठी व्यापक सामाजिक सहकार्य महत्त्वाचे ठरते.

उपवर्गीकरण पुरेसे आहे का?

सार्वजनिक धोरणाच्या दृष्टीने अनेक अभ्यासकांचे मत आहे की, उपवर्गीकरण हा काही समस्यांसाठी एक संभाव्य उपाय असू शकतो, परंतु तो स्वतःमध्ये सर्व प्रश्नांचे उत्तर नाही.का? तर

दीर्घकालीन सामाजिक न्यायासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत:

• रिक्त सरकारी पदे वेळेवर भरणे

• गुणवत्तापूर्ण सार्वजनिक शिक्षण

• कौशल्य विकास

• उद्योग आणि रोजगारनिर्मिती

• उद्योजकतेला चालना

• आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा

• सामाजिक ऐक्य का महत्त्वाचे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांवर भर दिला. आजच्या काळात अनेक अभ्यासक असे सुचवतात की, विविध अनुसूचित जातींमध्ये संवाद, परस्पर आदर आणि समान प्रश्नांवर संयुक्त प्रयत्न झाल्यास सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळू शकते.

” याचा अर्थ मतभेद नसावेत असा नाही; तर मतभेदांचा आधार पुरावे आणि सार्वजनिक चर्चा असावा.”

राजकीय चर्चेकडे कसे पाहावे?

उपवर्गीकरणावर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि अभ्यासकांची भिन्न मते आहेत.

👉काहींच्या मते, यामुळे मागास उपजातींना अधिक न्याय मिळू शकतो.

👉काहींच्या मते, यामुळे अनुसूचित जातींच्या एकात्मतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

👉काही आंबेडकरी संघटना या प्रक्रियेवर टीका करतात आणि तिच्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करतात.

👉दुसरीकडे, उपवर्गीकरणाचे समर्थक हे आरोप नाकारतात आणि हे धोरण सामाजिक समतेसाठी आवश्यक असल्याचे सांगतात.

👉म्हणून या परस्परविरोधी दाव्यांचे मूल्यमापन करताना विश्वसनीय पुरावे आणि अधिकृत आकडेवारी यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

” मात्र ही आकडेवारी जातनिहाय जनगणना प्रामाणिकपणे, अचुक व पारदर्शक असणे ही पुर्वअट असावी.”

धोरणकर्त्यांसाठी काही विचार

जर कोणतेही राज्य उपवर्गीकरणाचा विचार करत असेल, तर पुढील बाबी महत्त्वाच्या ठरू शकतात:

• स्वतंत्र सामाजिक आणि सांख्यिकीय सर्वेक्षण.

• सर्व संबंधित समाजांशी व्यापक सल्लामसलत.

• निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता.

• न्यायालयाने सांगितलेल्या घटनात्मक निकषांचे पालन.

• उपवर्गीकरणाबरोबरच शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी पूरक धोरणे.

निष्कर्ष

SC Sub Categorization Maharashtra हा विषय भावना, इतिहास, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक धोरण या सर्वांचा संगम आहे.

या चर्चेत कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी काही मूलभूत प्रश्न विचारणे आवश्यक आहे:

👉निर्णयाचा आधार विश्वासार्ह आकडेवारी आहे का?

👉यामुळे सर्वात वंचित घटकांना प्रत्यक्ष लाभ होईल का?

👉सामाजिक ऐक्यावर त्याचा काय परिणाम होईल?

👉रोजगार, शिक्षण आणि आर्थिक संधी वाढवण्यासाठी समांतर उपाय केले जात आहेत का?

लोकशाहीत या प्रश्नांवर मतभेद असणे स्वाभाविक आहे. परंतु कोणतेही धोरण संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांशी सुसंगत असणे आवश्यक आहे.

👉खालील Infograph द्वारे आम्ही मानतो की ही प्रक्रिया खालील क्रमाणे पारदर्शक व्हावी.

100084256

आधीचे भाग वाचा–

Mahar Matang Sambandh : महार- मातंग उपवर्गीकरणाच्या पाश्वभुमिवर एक सत्य लेखमाला

SC Sub Categorization Maharashtra : उपवर्गीकरण, आरक्षणाचे वास्तव आणि सामाजिक ऐक्याची गरज (भाग 2)

👉English मधील लेख शक्य झाल्यास वाचा. भाषांतर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. भाषा icon वर click करुन मराठी किंवा इतर 15 भाषा उपलब्ध आहेत. लेख भाषांतरीत तत्काळ होतो.

आरक्षणात आरक्षण?

Reservation Within Reservation in Maharashtra – 13% SC Sub-Reservation in Maharashtra : Justice or Division Before Ambedkar Jayanti ; 12

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support