Contents1. धडाकेबाज कामगिरीचा शिरूर पोलिसांचा सिलसिला सुरूच !1.1. धडाकेबाज कामगिरी करताना ‘कानोकान’ खबर लागू न देता बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक !1.1.1. शिरुर दिनांक 26 जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )1.1.2. धडाकेबाज कारवाई शिरुर पोलीसांकडुन !1.2. जरा इकडेही लक्ष घाला !1.2.1. —- संपादक ,डॉ नितीन पवार, ‘शिरुर’,सत्यशोधक न्युज’, शिरुर.1.2.2. पोलिसांचा धडाकेबाज एक्शन प्लान !1.2.3. आरोपीला थांगपत्ता लागला नाही. आणि…1.2.4. वरिष्ट पोलिस अधिकारी नजर ठेवुन होते !1.2.5. धडाकेबाज चित्रपटाची आठवण आली !1.2.6. About The Author1.2.6.1. Dr.Nitin Pawarधडाकेबाज कामगिरीचा शिरूर पोलिसांचा सिलसिला सुरूच !धडाकेबाज कामगिरी करताना ‘कानोकान’ खबर लागू न देता बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक !शिरुर दिनांक 26 जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )(Thanks for Images in this content to pixabay.com )धडाकेबाज कामगिरीचा शिरूर पोलिसांचा सिलसिला सुरूच आहे ! आज धडाकेबाज कामगिरी करताना ‘कानोकान’ खबर लागू न देता बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमाला शिरूर पोलीसांनी अटक केली आहे. सविस्तर बातमी पुढे वाचाच एकदा. …धडाकेबाज कारवाई शिरुर पोलीसांकडुन !शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर. शिरूर शहरामध्ये बेकायदेशीरपणे छोटी पिस्तूल बाळगणाऱ्याला शिरुर पोलीसांनी आज बेड्या ठोकल्या आहेत. शिरूर तपास पथकाच्या कारवायांचा हा धडाका गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार शिरूर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण , पोलीस अंमलदार सचिन भोई ,निलेश थोरात, नीरज पिसाळ ,विजय शिंदे, निखिल रावडे या शिरुर पोलीसाच्या पथकाने शिरूर शहरांमध्ये पेट्रोलिंग करीत असताना शुभम चव्हाण यांना बातमीदांमार्फत बातमी मिळाली.’धडाकेबाज‘Dr.Nitin Pawar, Editor -satyashodhaknews.com जरा इकडेही लक्ष घाला !“अशीच धडाकेबाज एक्शन शिरुर शहर व तालुक्यातील बेकायदेशीर हातभट्टी दारु बनवणे व विकणे,बेकायदेशीरपणे शासकीय आवारात उदा..आय टी आय प्रशिक्षण केंद्राची जागा,सेंटर दवाखान्याजवळील नगरपालिकेच्या शाळेमागची जागा ,कुकडी वसाहतीच्या हुडकोजवळच्या पडक्या सरकारी घरांमधे इ.ठिकाणी अंधार पडु लागला की दारुची पार्टी करणारे,वेश्यावृत्तीच्या झोपडपट्टीतील मुलींना तेथे आणणे, सिक्यूरिटीला दम देणे,झोपडपट्टीतील जुगार अड्डे,मटका अड्डे व त्याचे दलाल,बेकायदा विमल गुटका,माणिकचंद गुटका,इ.विकणे,अगदी नव्या पोलिस स्टेशनच्या बांधकामाच्या जवळच्या टपर्यांमधेदेखील पाठीमागे पोलिस उपस्थित असताना या वस्तु विकणे,बस स्थानक परिसरातील चोर्या,अगदी पाण्याच्या टाकीजवळ व बाबुरावनगर येथे बेकायदा घरगुती वेश्या व्यवसाय चालणे इ.बेकायदेशीरपणे चालणाऱ्या धंद्यांच्या ठिकाणी ‘कानोकान’ खबर न लागु देता धाड पडलेल्या देखील बातम्या मिळणे अपेक्षित आहे.”——-—- संपादक ,डॉ नितीन पवार, ‘शिरुर’,सत्यशोधक न्युज’, शिरुर.Read more >>शिरुर जवळील एका गावात एक व्यक्ती ,’हवेत’,कोयता फिरवुन ,’हवा’ करत होता.तेवढ्यात पोलिस आले ! पुढे काय घडले ते वाचा…..शिरुर मधे धारदार हत्याराने वार ? तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी ! पोलिसांचा धडाकेबाज एक्शन प्लान !त्यानुसार किरण सुनील पवार, राहणार -साईनगर, शिरूर -तालुका, शिरूर ,जिल्हा – पुणे हा येथे ‘टार्गेट’ होते. तो मार्केट यार्ड च्या मागच्या बाजूला साईनगर समोर गावठी पिस्तूल बाळगून फिरत होता. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लगेचच सदर माहिती पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंद्रे यांना कळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बातमीच्या अनुषंगाने साईनगर परिसरात पोलीसांनी ‘सापळा‘ लावला.आणि सीताफिने किरण सुनील पवार ,वय-27 वर्ष साईनगर ,शिरुर, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे याला ताब्यात घेतले.आरोपीला थांगपत्ता लागला नाही. आणि…बेकायदेशीर पिस्तूल बाळगुन फिरणे नडले ! त्यावेळी किरण सुनील पवार यांच्या ताब्यातील अवैध बिगर परवान्याचे 20 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल सापडले. या कारवाईबाबत निखिल भिमाजी रावडे पोलीस अंमलदार शिरूर पोलीस स्टेशन यांनी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 61/ 2025 असा आहे. तर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण सुनील पवार ,वय- 27 वर्ष ,राहणार – शिरूर ,तालुका- शिरूर ,जिल्हा -पुणे याला या गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली आहे. माननीय न्यायालयाने दिनांक 30/ 1 /2025 पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावलेली आहे.आरोपी—-किरण सुनील पवार ,वय-27 वर्ष साईनगर ,शिरुर, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे याला ताब्यात घेतले.Read more >>शिरुर बस स्थानकातील चालकास झोपेतच लोखंडी टामीने प्रहार ! तर दुसर्या घटनेत वडगाव रासाईत एका मुलीस वाहनाची जोरदार धडक !शिरुर तालुक्यात, “तुझा मुलगा जरी वकील असला तरी माझा जावई आत्ताच ‘मर्डर’ च्या गुन्हयामधुन जेलमधुन बाहेर आला आहे.” असे वक्तृव्य ! काय प्रकरण आहे ते वाचा !वरिष्ट पोलिस अधिकारी नजर ठेवुन होते !पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत .सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय अधिकारी शिरूर विभाग ,पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,पोलीस सब इन्स्पेक्टर अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे ,पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ ,पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिवणकर ,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे यांनी या कारवाई मध्ये भाग घेतला.धडाकेबाज चित्रपटाची आठवण आली !धडाकेबाज हा शब्द महाराष्ट्राला अपरिचीत आहे असे कोन म्हणू शकेल.’ धडाकेबाज ‘ या गाजलेल्या मराठी चित्रपटात सर्वांनी धडाकेबाज पोलीस इन्पेक्टर महेश जाधव चे पात्र मराठी मनात आजही आहे.ती भुमिका महेश कोठारे यांनी केली होती.ती नंतर महेश कोठारे यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या व अभिनित केलेल्या प्रत्येक चित्रपटात राहिली.केवळ ‘इन्पेक्टर‘ म्हटले तरी ‘महेश‘ असा शब्द तोंडात येत असे.जाधव किंवा कोठारे नंतर येईलच असे काही अपेक्षित नसायचे ! असा हा सर्व धडाकेबाज शब्दाचा असर होता.Read more >>शिरुरमधील भाजी बाजार परिसरात किरकोळ कारणावरुन धारदार हत्याराने डोक्यात मारून जखमी केले तर करडे येथुन 16 वर्षीय तरुणीस पळवुन नेले!गेल्या काही दिवसांपासून शिरुर पोलीसांची पोलीस इन्पेक्टर संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली अशीच धडाकेबाज कामगीरी केली आहे.ही बाब समाधानकारक आहे.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरुर पोलिसांकडुन 21 म्हशीची पारडी ताब्यात ? एक अन्नपाण्याविना मृत्युमुखी ! ट्रॅक्टर च्या धडकेत एक जण मृत्युमुखी !