IMG 20251121 WA0035

📰 शिरूर नगरपरिषद निवडणूक 2025: प्रभाग क्रमांक 7 मधून सौ.अलका दगडु सकट यांचा नगरसेविकापदासाठी दावा?

शिरूर ,दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ | प्रतिनिधी|

शिरूर नगरपरिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू असताना विविध प्रभागांमधील उमेदवारांनी प्रचाराला जोर दिला आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्येही प्रचाराची हवा रंगू लागली असून, जुने जाणते ,सामाजिक कार्यकर्ते श्री.दगडु सकट यांच्या पत्नी सौ.अलका दगडु सकट यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आधारावर मतदारांपुढे दमदार दावा सादर केला आहे.त्यांचे शिक्षण 10 वी आहे.नगरसेविका म्हणुन जबाबदारी बाबत त्यांचा चांगला अभ्यास आहे.त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे.

त्यांनी “चेहरा नवा, बदल हवा” हे घोषवाक्य पुढे करत प्रभागात बदलाचे संकेत दिले आहेत. सामाजिक बांधिलकी आणि सर्व समाजाला घेऊन जाण्याची भूमिका मांडत, स्वतःला “सर्व समाजाला घेऊन चालणारी समाजसेविका” म्हणून मांडले आहे.

स्थानिक राजकारणात या प्रभागात महिलांची उपस्थिती वाढत असताना, या उमेदवाराचा प्रचारकाळ विशेषतः लक्षवेधी बनु पहात आहे. पारंपरिक वेशभूषा, नम्रपणे जुडलेला लोकाभिमुख दृष्टिकोन आणि सामाजिक कामांचा उल्लेख यामुळे मतदारांमध्ये  सौ.अलका सकट यांच्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.

श्री.दगडु सकट यांनी झोपडपट्टी बचाव आंदोलन,शांतीनगर भागातील गरीब,वंचित लोकांचे दैनंदिन नागरी प्रश्न, नळ कनेक्शन,लाईट मिळवून देणे इ.या क्षेत्रात सामाजिक प्रतिष्ठा  प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांना याआधीही भरगोस मते या प्रभागातून मतदान केले गेले आहे.सौ.अलका या त्यांच्या अर्धांगिनी म्हणुन भूमिका बजाबत सामाजिक न्यायाच्या कामाचे धडे घेतले आहेत.त्या सुस्वभावी आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या उमेदवाराला मिळणारा पाठिंबा अधिक बळकट होत असल्याचे मानले जात आहे.

शिरुर शहरातील शांतीनगर झोपडपट्टी वाचवण्यामधे श्री.दगडु सकट यांचा आजवर मोलाचा वाटा राहिलेला आहे.ते मुंबई, दिल्लीत लोकांच्या कामासाठी वर्षानुवर्षे खेट्या घातलेल्या आहेत.पाठपुरावा केलेला आहे.शिरुर व शिरूर तालुक्यातील सर्व समाजातील लोकांच्या प्रश्नांसाठी गेली ४० वर्षे ते कार्यरत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनात सौ.अलका सकट या तयार झाल्या असून यावेळी नगरसेवक पदासाठी आज अखेर अर्ज मागे घेण्यासाठीच्या दिवशीही त्यांचा निर्धार कायम आहे.त्यामुळे त्यांच्या प्रभागातील मतदार नागरिकांना आनंद झाला आहे. त्यांना स्वागत ,अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत.

स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अपेक्षा वाढत आहेत. विशेषतः पाणीपुरवठा, नागरिक सुविधा, रस्ते या मूलभूत मुद्द्यांवर काम करण्यासाठी नव्या सौ.अलका सकट यांना मतदारांचा वाढता पाठिंबा आहे. त्यांनी स्वतःला परिवर्तनाचे प्रतिक म्हणून उभे केले आहे.

प्रभाग क्रमांक 7 मधील मतदारांच्या चर्चांमध्ये सध्या “बदल हवा का? की अनुभव हवा?” हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. या नव्या उमेदवाराने हा बदल स्वतःच्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आगामी काही दिवसांत या प्रभागातील राजकीय समीकरणात आणखी रंगत येणार हे निश्चित आहे.


Read more >>>>>>

शिरुर नगरपालिका निवडणूक 2025: कोण मिळवेल जनतेचा विश्वास?

शिरुर नगरपालिका निवडणूक 2025: उद्योगपतींना यंदा इंटरेस्ट नाही? हा एक ‘विनोद’ म्हणावा की आणखी काही?

शिरूर नगरपरिषद मिशन 2025/26 — तरुण, उच्चशिक्षित आणि परिवर्तनवादी चेहरा: अॅड. स्वप्नीलभैया माळवेंची जोरदार मोर्चेबांधणी! 

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support