शिरूर नगरपरिषद निवडणूक 2025 : पोलिस प्रशासन सज्ज — शिरूर शहरात रूट मार्चशिरुर ,दिनांक : 11 ऑक्टोबर 2025 | प्रतिनिधी | शिरुर पोलिस निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी सज्ज !शिरूर नगरपरिषद निवडणूक 2025 पारदर्शक, शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी शिरूर पोलिस प्रशासन सक्रिय झाले आहे. आज (11 ऑक्टोबर 2025) रोजी संध्याकाळी 6.30 ते रात्री 7.20 या वेळेत शिरूर शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला.रूट मार्चमध्ये 2 पोलीस अधिकारी व 30 पोलिस अंमलदार सहभागी होते. पोलिसांकडून शहरातील मुख्य ठिकाणी पायी व वाहनांच्या सहाय्याने गस्त वाढविण्यात आली. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षा व विश्वास निर्माण करणे हा या रूट मार्चचा उद्देश असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनकडून देण्यात आली.रूट मार्चचा मार्ग पुढीलप्रमाणे :➡ शिरूर पोलीस स्टेशन ➡ बीजे कॉर्नर ➡ राम आळी ➡ पाच कंदील चौक ➡ जैन मंदिर ➡ एसटी स्टँड ➡ डंबे नाला ➡ जुनी नगरपालिका ➡ इंदिरा गांधी पुतळा चौक ➡ विद्याधाम शाळा चौक ➡ पुन्हा शिरूर पोलीस स्टेशनरूट मार्चदरम्यान शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलिसांचे स्वागत केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा तसेच अवैध कृत्यांना प्रतिबंध व्हावा, म्हणून पोलिसांनी दुकाने, चौक, स्टँड परिसरातील हालचालींवर देखील विशेष लक्ष ठेवले.शिरूर शहर हे शांतता आणि सुसंस्कृत राजकीय प्रक्रियेसाठी ओळखले जाते. पोलिस प्रशासन पूर्ण सज्ज आहे, नागरिकांनी बिनधास्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले.📌 ‘सत्यशोधक’ हे निवडणूक प्रक्रियेतील घडामोडींचे अपडेट्स नियमित देत राहील.About The Author Dr.Nitin Pawaradministratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरूर नगरपरिषद निवडणूक 2025: प्रभाग क्रमांक १ मधुन गणेश कुर्लप यांची उमेदवारी? शिरूर नगरपालिका निवडणूक 2025: आजी व माजी आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होणार?