Contents1 Shirur News Theft: शिरूरमध्ये उसतोड मजुराकडून दुचाकी आणि रोख रक्कम चोरी1.0.1 घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —1.0.2 Shirur News Theft चा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल— 1.0.3 चोरीस गेलेली मालमत्ता पुढीलप्रमाणे —1.0.4 Shirur News Theft मधे विश्वासघात करणारा मंजूर?—1.0.5 पोलीस तपास सुरू–1.0.6 शिरूर परिसरात वाढती चोरीची प्रकरणं—1.0.7 सुरक्षेसाठी उपाय—-1.0.8 आणखीन उपयुक्त माहितीसाठी खालिल लिंक तपासा. ..1.0.9 निष्कर्ष काय निघतो!?—-1.0.10 About The Author1.0.10.1 Dr.Nitin Pawar1.0.11 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur News Theft: शिरूरमध्ये उसतोड मजुराकडून दुचाकी आणि रोख रक्कम चोरी Shirur News Theft 25 May: (Satyashodhak News Report ) Shirur News Theft:शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात एका शेतकऱ्याच्या घरातून तब्बल ₹१.१० लाखांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. Shirur News Theft या प्रकारात उसतोडकामगार म्हणून काम करणाऱ्या इसमानेच विश्वासघात करत चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे — शेतकरी मोहन निवृत्ती सरके (वय ४३, रा. न्हावरे, निंबाळकर वस्ती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी लखन पांडुरंग अडागळे (रा. पाणीटाकी जवळ, डोमलगाव, ता. अंबड, जि. जालना) याने दिनांक २३ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजता त्यांच्या घराजवळून एक चेतक इलेक्टिक दुचाकी (MH 12 XP 4407) व घरातील कपाटातून ₹१०,००० रोख रक्कम चोरी केली आहे. Shirur News Theft चा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल— Shirur News Theft : शिरूर पोलिस स्टेशन, शिरुर. या चोरीसंदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर 353/2025 नुसार भारतीय दंड संहिता BNS 306 अंतर्गत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेली मालमत्ता पुढीलप्रमाणे — 1. बजाज चेतक इलेक्टिक स्कूटर – आर.टी.ओ. क्रमांक MH12XP4407, पांढऱ्या रंगाची व हिरवी नंबर प्लेट असलेली. • चासी नंबर: MD2C59209RAH49030 • इंजिन नंबर: E20ARH61080 • अंदाजे किंमत: ₹१,००,००० 2. रोख रक्कम: ₹१०,००० (५०० रुपयांच्या २० नोटा) • एकूण नुकसान: ₹१,१०,००० Shirur News Theft मधे विश्वासघात करणारा मंजूर?— या चोरीमध्ये महत्त्वाचं म्हणजे, आरोपी लखन अडागळे हा फिर्यादी मोहन सरके यांच्या शेतात उसतोड मजूर म्हणून काम करत होता. कामानिमित्ताने त्याचा घरात मोकळा प्रवेश होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने चावीसह दुचाकी व रोख रक्कम चोरली आणि पसार झाला. पोलीस तपास सुरू– सदर गुन्ह्याचा तपास एएसआय बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गुन्हा एएसआय थेऊरकर यांनी दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असून, या प्रकरणातील पुढील तपास त्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. शिरूर परिसरात वाढती चोरीची प्रकरणं— या घटनेमुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उसतोडकामगार, मजूर यांच्यावर विश्वास ठेऊन कामावर ठेवण्यासंबंधी नागरिक आता अधिक सतर्क झाले आहेत. सुरक्षेसाठी उपाय—- • घरातील मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घ्या. • नवीन कामगार नेमण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासा. • दुचाकी किंवा चारचाकी चावी सुरक्षित जागी ठेवा. • घरात CCTV कॅमेरा लावा. आणखीन उपयुक्त माहितीसाठी खालिल लिंक तपासा. .. पोलीस भरती 2025 माहिती शेतकरी कर्जमाफी व योजना माहिती वाहन चोरी झाल्यास काय करावे? निष्कर्ष काय निघतो!?—- Shirur News Theft प्रकारातील ही घटना एक इशारा आहे – विश्वासास पात्र वाटणाऱ्या व्यक्तीकडून देखील धोका होऊ शकतो. पोलिसांनी वेगाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक होईल, अशी अपेक्षा आहे. सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून — Breaking Shirur News Ladies Arrested? शिरूर बसस्थानक परिसरात 8 तोळे सोनं चोरलेल्या दोन महिला आरोपींना अटक! Shirur News Baburavnagar 1 Year’s Old Child Dead :बाबूरावनगरमध्ये १ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू! About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur News 16 Years Girl Missing : वॉशरूमला गेलेली बहाणा 16 वर्षीय तरुणी पळाली? वाचा सविस्तर. . Breaking News Ranjangaon Lady Murder: रांजणगावमध्ये महिला आणि दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या!