Contents 1. शिरूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद1.0.1. श्वास घेण्यास त्रास झाल्याने महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू1.0.2. Read more >>>>>1.0.3. About The Author1.0.3.1. Dr.Nitin Pawarशिरूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंदश्वास घेण्यास त्रास झाल्याने महिलेचा उपचारापूर्वी मृत्यूशिरूर, दिनांक 10 जानेवारी 2026 | प्रतिनिधी|शिरूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील 54 वर्षीय महिलेचा श्वास घेण्यास त्रास झाल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे.याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 5/2026 अंतर्गत BNNS कलम 194 नुसार नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणात पोलीस हवालदार एस. एल. दिवटे, नेमणूक एमआयडीसी पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांनी फिर्यादी म्हणून माहिती दिली आहे.मयत महिलेचे नाव पद्मिनी दत्तात्रय माने (वय 54 वर्षे), रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे असे आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.05 वाजण्याच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईक दत्तात्रय आप्पाजी माने (मो. नं. 9849037490) यांनी उपचारासाठी डॉ. विखे हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे दाखल केले होते. मात्र, औषधोपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणाची नोंद 08 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.29 वाजता शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सदर नोंद एंट्री क्रमांक 46 आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथून संबंधित कागदपत्रे टपालाने प्राप्त झाल्यानंतर ही नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या प्रकरणी दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार पालवे यांनी काम पाहिले असून, पुढील तपास पोलीस हवालदार खबाले हे करीत आहेत.Read more >>>>>शिरूर शहरात पोलिसांचा रूट मार्च : नागरिकांच्या सुरक्षिततेचा संदेश !शिरूर : 24 वर्षीय तरुणी बेपत्ता, शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंदशिरूरमध्ये टेम्पोवर कारवाई — लोखंडी गजांनी वाहतूक धोक्यात, चालकाविरोधात गुन्हाAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरूरमध्ये टेम्पोवर कारवाई — लोखंडी गजांनी वाहतूक धोक्यात, चालकाविरोधात गुन्हा शिरूर कवठे येमाई रोड अपघात : भरधाव दुचाकीच्या समोरासमोर धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक जखमी