Contents 1. शिरूरमध्ये इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टवरून तरुणाला मारहाण1.1. शिरूरमध्ये इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टवरून तरुणाला मारहाण : गुन्हा दाखल !1.2. तक्रारदाराची माहिती—1.3. आरोपींची नावे—-1.4. घटनेचा तपशील—-1.5. पोलिसांची कारवाई——-1.5.1. अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••1.5.2. ‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••••1.5.3. About The Author1.5.3.1. Dr.Nitin Pawarशिरूरमध्ये इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टवरून तरुणाला मारहाणशिरूरमध्ये इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टवरून तरुणाला मारहाण : गुन्हा दाखल !शिरूर ,ता. पुणे,दिनांक ३० सप्टेंबर २०२५| प्रतिनिधी |” शिरूर तालुक्यात इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टवरून तरुणावर चार जणांनी हल्ला केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.”इंस्टाग्रामवर पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही या किरकोळ कारणावरून शिरूर तालुक्यातील तरुणाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चार जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली कारवाई सुरू आहे.तक्रारदाराची माहिती—फिर्यादी रोहन मळीभाऊ खामकर ,वय 21 वर्षै, व्यवसाय – वेल्डिंग, राहणार – शिनगारवाडी, म्हसे बु., ता. शिरूर, जि. पुणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.आरोपींची नावे—-1. अमर मुंजाळ, रा. डोंगरगण2. हर्षद खाडे, रा. म्हसे बु.3. करण चव्हाण, रा. म्हसे बु.4. सचिन पवार, पत्ता माहित नाहीघटनेचा तपशील—-📅 घटनेची तारीख व वेळ – 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 2.30 वा. 📍 ठिकाण – हॉटेल स्वरा, डोंगरगण फाटा, ता. शिरूर, जि. पुणे.फिर्यादी रोहन खामकर हे हॉटेल स्वरा येथे फॅब्रिकेशनचे काम करीत होता.आरोपींनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नव्हती. हे आरोपींच्या जिव्हारी लागले होते.त्यांचे मन दुखावले होते. या कारणावरून आधी त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आरोपींनी एकत्र येऊन लाकडी दांडक्यांनी, हाताने व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीवर हल्ला केला. या मारहाणीत फिर्यादीच्या हातावर, चेहऱ्यावर व डोक्यावर जखमा झाल्या आहेत.पोलिसांची कारवाई——-• गुन्हा क्रमांक – 689/2025• नोंद तारीख – 30/09/2025, सायं. 7.44 वा.• संबंधित कलमे – भा. दं. सं. 115(2), 118(1), 352, 351(2), 3(5)• दाखल अंमलदार – पो. हवालदार शिंदे.• तपासी अंमलदार – सफौ गायकवाड.• प्रभारी अधिकारी – संदेश केंजळेशिरूर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होणार असल्याचे कळते.अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••Maharashtra Police Official WebsiteIndian Penal Code (IPC) SectionsCyber Crime Awareness‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••••रांजणगाव एम.आय.डी.सी. परिसरात मारहाणीचा प्रकार : नोकरी करणाऱ्या युवकावर सहा जणांचा हल्ला हवालदार मिलिंद देवरे यांची धडाकेबाज तत्परता : हरवलेली चिमुरडी सुखरूप पालकांच्या स्व आधीच‘अखिल भारतीय कुष्ठ सेवा संघ ‘ मानवसेवेतील वाटचालीत १५ ऑगस्ट २०२५ निमीत्त देणार नवीन रुग्णांना आधार!About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनसोशल मीडियावरील गैरवापर थांबवा; शिरुर पोलीसांचा इशारा! शिरूरमध्ये दारूच्या नशेत ट्रक चालक आढळला; शिरूर पोलिसांची कारवाई