राजकीय हेतूसाठी फक्त रुपालीताई चाकणकर यांचा वापर होतोय का?
Contents
Rupalitai Chakankar ठरत आहेत का बळीचा बकरा ? अन्य नावान्चे काय?
पुणे / शिरूर | 29 मार्च 2026|(Updated on 26 April 2026
Rupalitai Chakankar ठरत आहेत का बळीचा बकरा ? अशोक खराब प्रकरण या विषयावर पुणे आणि महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली. या प्रकरणात नेमकं काय घडलं, कोण जबाबदार आहे आणि आरोपांचा केंद्रबिंदू रुपालीताईंवर का येतोय, याचा वेध घेण्याची आवश्यक आहे.
प्रकरण काय आहे?
नाशिक जिल्हा परिसराशी संबंधित असलेल्या या प्रकरणात अशोक खरात नावाच्या व्यक्तीशी निगडित गंभीर आरोप समोर आले आहेत.हे आपण पहातो आहोतच. काही दिवसांपासून या घटनेची चर्चा स्थानिक पातळीवर राज्यभर झाली आहे.पण अन्तिम निष्कर्षापर्यन्त काही सरकार पोचले नाही.पण एक नावच फार चर्तेत राहिले ते Rupalitai Chakankar यांचे! असे का? इतर अनेक नावे या प्रकरणात उच्चारली गेली. पण सर्व मिडिया फक्त फोकस रुपालीताई चाकणकर यांना टार्गेट करताना दिसला. त्यामुळे साहजिकच प्रश्न निर्माण होतो की इतर नावे व त्यांची चौकशी होणार आहे की नाही.
मुख्य मुद्दे—-
- घटना नाशिक जिल्हा परिसराशी संबंधित असली तरी दुरदुरपर्यन्त महाराष्ट्र व देशभर याची प्रतिक्रिया उमटली.
- अशोक खरात यांच्यावर गंभीर आरोप हे प्रामुख्याने स्रियावरील लैंगिक अत्याचाराचे आहेत.त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
- राजकीय व सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया निर्माण होणे स्वाभाविक होते. Rupalitai Chakankar यांनी महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा देखील दिला.
- तरी इतर नावे व सविस्तर खुलासा सरकार कडून अद्याप आला नाही. यापुर्वी अनेक खळबळजनक प्रकरणात कुणाला तरी एकाला बळी देऊन इतर सामील बड्या धेन्डान्ना वाचवल्याचे काही नवीन नाही.
कोण आहेत Rupalitai Chakankar चाकणकर?
रुपालीताई चाकणकर या महाराष्ट्रातील एक परिचित राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व मानल्या जातात.त्या राज्य महिला आयोगाच्या प्रमूख होत्या. प्रकरण महिला अत्याचाराचे आहे. त्या स्वतः महिला आहेत. पण त्यांनी या विषयावर सुरुवातीला सन्वेदनशिलता दाखवली नाही.उलट मुख्य आरोपी अशोक खरात याच्या त्या भक्त होत्या. ही बाब महत्वाची आहेच. पण या भोन्दू बाबाचे सम्बंध अनेक राजकीय व वजनदार लोकांशी आहेत. असे पुढे आले.
मात्र या प्रकरणात रुपालीताई चाकणकर यांचे तेवढे नाव समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत:
- त्यांचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय? की त्या भोन्दूबाबा खरात याच्या,’ व्यापक’ लिलान्बाबात अनभिज्ञ होत्या.
- त्या थेट जबाबदार आहेत की अप्रत्यक्षरित्या गुंतल्या आहेत?
- कथित अत्याचारातील शोषित महिला आधी तिथे व पुन्हा तिथे गेल्या असतील तर तत्काळ त्यांनी अशी बाब पोलीस स्टेशन किंवा माध्यमातून का नाही प्रगट केली?
- विशिष्ट राजकीय वातावरणात असे भान्डे फोड करणारी प्रकरणे नेमकी पुढे येतात की आणली जातात?
- आणि केवळ रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घेऊन वरकरणी आम्ही कारवाई करत आहोत. असे सरकार दाखवत आहे. बरेच काही त्यातून झाकायचे की वगळायचे तर प्रयत्न होत नाहीत ना?
वाद का निर्माण झाला?
या प्रकरणात रुपालीताईंना “बळीचा बकरा” बनवलं जात असल्याचा आरोप काही स्थानिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.ही बाब महत्वाची आहे.
संभाव्य कारणे:
- राजकीय दबाव निर्माण करुन इतर काही विषयाकडे दुर्लक्ष करणे, असा हा प्रकार तर नाही ना?
- जाणुनबुजुन एकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणे व इतर व्यक्ती व विषय यांबाबतची चर्चा दुसरीकडे वळवणे, असा हेतू आहे का?
- खऱ्या आरोपींपासून लक्ष विचलित करणे हे तर एक महत्वाचे आहेच पण अनेक पटीने रोहित पवार यांचे आक्षेप व मागणी देखील महत्वाची होती.
यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
घटना कशी घडली?
प्राथमिक माहितीनुसार अशोक खरात यांच्याशी संबंधित घडामोडींमध्ये काही निर्णय किंवा कृतींवरून वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर काही लोकांनी रुपालीताईंचं नाव पुढे केलं.ते चर्चेत ठेवले. माध्यमातून रन्गवले. प्रमुख साक्षीदार, व्हिडीओ ज्याने बनवले तो कुठे आहे? त्याला का ताब्यात ठेवले आहे? आणखीन बड्या लोकांचे बाबतचे व्हिडीओ त्याच्याकडे आहेत का?
तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
- पुरावे आणि साक्षीदारांची पडताळणी सुरू आहे. ती कुठपर्यंत चालणार?
- पोलिसांकडून चौकशी वेगात होणे तसे अवघड नाही. पण तेवढा वेग तपासात दिसत नाही.
- सरकारकडून अधिकृत निवेदनांची प्रतीक्षा आहे.
पोलिस आणि प्रशासनाची भूमिका
नाशिक पोलीस व गृह विभागाच्या प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती का?
सध्याची स्थिती:
- तपास सुरू
- संबंधित व्यक्तींची चौकशी
- कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार
प्रशासनाने अद्याप कोणतीही अंतिम भूमिका जाहीर केलेली नाही.
स्थानिक प्रतिक्रिया
शिरूर, पुणे परिसरात या प्रकरणावरून लोकांमध्ये संभ्रम आणि चर्चा वाढली आहे.
नागरिकांचे मत:
- काहीजण रुपालीताईंना समर्थन देत आहेत
- काहीजण निष्पक्ष तपासाची मागणी करत आहेत
- सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
विश्लेषण: बळीचा बकरा की सत्य?
या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना दोन बाजू स्पष्ट दिसतात:
एक बाजू म्हणते:
- रुपालीताईंना अन्यायकारकपणे टार्गेट केलं जात आहे.
दुसरी बाजू:
- तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही क्लीन चिट देऊ नये.
यामुळे सत्य काय आहे, हे तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होईल.
निष्कर्ष: प्रशासनावर मोठे प्रश्न
या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत:
- तपास किती पारदर्शक आहे?
- खरे दोषी कोण?
- राजकीय हस्तक्षेप आहे का?
प्रशासनाने निष्पक्ष आणि जलद तपास करून सत्य जनतेसमोर आणणे अत्यंत गरजेचे आहे.
• राष्ट्रीय महिला आयोगाबाबत अधिक माहिती वाचा:
• महाराष्ट्र शासन अधिकृत वेबसाईट:
https://www.maharashtra.gov.in/
• भारतातील महिला अत्याचार कायदे (IPC Sections) जाणून घ्या:
• ‘ सत्यशोधक ‘ च्या आणखीन बातम्या व विश्लेषण वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन—
Pune Corporation Tender Controversy: बाणेर वसतिगृह प्रकरणात टक्केवारीचा आरोप
SC Reservation in Maharashtra : 59 अनुसूचित जातींसाठी न्याय की नव्या विभाजनाची सुरुवात? लेख-13
Shinde Fadnavis Cold War : तर तुमचा टांगा पलटी करु ; एकनाथ शिंदे !
