डॉलरचे सावट

सप्टेंबर 23, 2025
IMG 20250923 WA0001

डॉलरचे सावट

कथा : डॉलरचे सावट

कोल्हापूर जिल्ह्यातलं एक खेडं भोरवाडी. पन्हाळ्याच्या डोंगररांगांच्या सावलीत हे वसलेलं ! वाऱ्याने हळुवार झुलणारं, मातीच्या सुगंधाने न्हालेलं गाव. या गावात गावठी फेटेधारी शेतकरी होते, गुरंढोरं होती, शिवारात नांगरट होत होती. पण आयुष्य मात्र कायमच भकास अपुरं वाटायचंच.

त्या गावातला तरुण – अभिजित देशमुख. वय पंचवीस होतं त्याचं. शिक्षणाने इंजिनिअर होता. पण नोकरी मात्र जणु भविष्यात दिसणारं मृगजळ. गावकऱ्यांच्या दृष्टीने तो “हुशार पोरगा होता. गड्याचं डोकं भारी ” होतं. पण त्यालाच आपल्या भविष्याची गाठ न सुटणाऱ्या गाठीसारखी वाटू लागली होती.हे घडली होतं !

आई-वडिलांची हतबलता पाहता पाहवत नव्हती.
घरात आई-वडील हे हाडाची शेतकरी मंडळी. आईचा प्रत्येक दिवस चुलीच्या धुरात सापडुश संपायचा आणि वडीलांचा घाम मातीत मिसळूनही धान्याचं पोतं भरायचा नाही.

आई नेहमी म्हणायची
“बाळा, शिक्षण हीच खरी शिदोरी आहे. आम्ही पोटाचे तेल काढून तुला शिकवलं रे ! आता कुठं तरी उभं रहा,काम बग, आम्हाला अभिमान वाटु दे !”

पण बाजारात महागाई असं डोके वर काढून उभी असायची होती की, घर चालवायचं तरी कसं हा प्रश्न सगळ्यांचाच होता.

म्हणतात ना – “लाकूड वाळलं तरी चुल पेटते, पण पैशाचं लाकूड सुकलं की संसाराची चूल विझते.”

अमेरिकेच्या सावलीचं ओझं अभिजीतच्या मनात होतं.परवाच्या संध्याकाळी गावातला एक शिक्षक वर्तमानपत्र घेऊन वाचत बसला होता. त्यातला मथळी होती –
“अमेरिकेने व्हिसाचे दर वाढवले, निर्बंध लावले, डॉलरचा भाव वाढला; भारतात किंमतींचा भडका उडणार !”

गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर अजून एक चिंता होती. एक शेतकरी म्हणाला –
“काय रे हो, त्या अमेरिकेचा बाप आपल्या कडं भाकरीत तेल टाकतो का? मग आमचं तेल का काढतो म्हणावं ?”

दुसरा हसत म्हणाला –
“अगदी खरंय. चुलीतल्या लाकडासारखे आम्ही जळतोय, पण ऊन मात्र अमेरिकच्या अंगणात पाडतोय.”

अभिजितच्या मनात मात्र धडकी भरली.
त्याने विचार केला – “ही महागाई, ही महत्त्वाकांक्षा,हे ग्रीन कार्ड ,हा डॉलर ! सगळं सुऱ्याच्या धारेसारखं आहे. आता धार कोणावर चालेल? आमच्यासारख्या तरुणांवरच !”

अभिजिताचं स्वप्न होतं – पुण्यात जायचं, मोठ्या कंपनीत काम करायचं, आई-वडिलांना सुख द्यायचं. पण तो जेव्हा अर्ज करायला जात असे, तिथे उत्तर मिळायचं – “अनुभव हवा. आम्ही फ्रेशरना नोकरी देत नाही आम्ही “

अभिजीत कायम विचार करत बसे.
“मग हा अनुभव कुठून आणायचा? जिथे अनुभव मिळतो तिथं नोकरीच मिळत नाही व जिथं नोकरी मिळते तिथं अनुभव लागत नाही. आम्हाला काय फक्त नुसती वाऱ्यावरची पतंग करायची आहे का?”
“स्वप्नं उभी, दगड पुढे, चालणं थांबतं,
डॉलराचं ओझं आमच्या अंगावर ढकललं जातं.
आईच्या मायेचं कर्ज फेडायचं मनात आहे,
पण महागाईच्या भिंतीवर खिसे पोरकट दिसतात.”

एकदा पुण्यात गेला. मित्र म्हणाला –
अमेरिका भारतावर,चीनवर  कर लावते, डॉलर आकाशाला भिडतो. आयात महाग होते. मग त्याचा परिणाम आपल्या दळणवळणावर, आपल्या पेट्रोलवर, आपल्या बाजारावर होतो. तू व मी काय करू? फक्त बघत राहाणं भाग आहे !”

अभिजित संतापाने म्हणाला –
“मग आपण कायम गुलाम राहायचं का? ‘डॉलर’ने ठरवलं की आम्ही रडायचं? हा देश इतका निर्बळ आहे का?”

मित्र हसून म्हणाला – “अरे शहाणपणा कर! एकट्या तुझ्या संतापाने डॉलर नक्कीच खाली येणार नाही.”

त्या रात्री अभिजितनं आपल्या डायरीत लिहीलं –
“एकटा मी उभा आहे, पण पाठोपाठ नव्या पिढ्या उभ्या आहेत. मी झुकलो तर सगळे झुकतील. जर ‘स्वदेशी’चा विचार नसला तर या देशात प्रत्येक घास आयात करूनच तोंडात जाणार असं दिसतं ”

गावात येऊन त्याला आणखीन बिकट परिस्थिती दिसली.किराण्याच्या दुकानावर भांडणं,शेतकऱ्यांनी शेतं सोडून शहर गाठणं.असं काही बाही.

एक म्हातारा शेतकरी म्हणाला –
पूर्वी भाजीपाला हा गोरगरिबांच्या ताटातल्या चटणीसारखा असायचा. आता हिरवी मिरची सोन्याच्या किंमतीत मिळते. काय खायचं आम्ही?”

“महँगाई ने हर ख़्वाब को तोड़ दिया,
ग़रीब के दामन से सारा रंग छीन लिया.
जिस मिट्टी ने पाला हमें दूध से,
आज उसी ने खून के आँसू पी लिया.”

गावातल्या तरुणांनी एक संध्याकाळ बैठक घेतली. सगळेजण व्यथित होता. प्रश्न तेच – रोजगार नाही, शेती उजाड, महागाई अनावर.

अभिजित उठून म्हणाला –
“आपण आता खरंच गुलामच झालोय. पण आता आपण डोकं वर काढायचं. ज्या अमेरिकेने आपल्यावर ओझं टाकलंय, त्याला आपण आत्मनिर्भर होवुन कामाने उत्तर द्यायचं. गावात छोट्या छोट्या उद्योगांची सुरुवात करू. परदेशी वस्तू टाकून देऊयात. आपलीच बी-बियाणं जपू या.”

गावकऱ्यांना सुरुवातीला हसू आलं. कोणीतरी म्हणालं – “काय बाळा, डॉलरविरोधात लढायचं म्हणजे खेळ समजतोस काय?”
तो ठामपणे म्हणाला – “हो. प्रत्येक लढा हा खेळासारखाच सुरू करावा लागतो. जिंकायची हिंमत असेल तर खेळ युद्ध बनतो.”

त्याने गावात लघुउद्योग सुरू करण्याचा प्लॅन एक बनवला.गुरांच्या दुधावर आधारित चीज, दही, तूप तयार करायचं ठरवलं.गावातल्याच तरुणांकरवी ऑनलाइन विक्रीचं जाळं उभं करायचं.आयात खतांऐवजी देशी कंपोस्ट खताची शेती करायची.

हा विचार लोकांना पटू लागला. “स्वदेशीचा स्वप्नदूत” म्हणून तरुण त्याला हाक मारू लागले.

“ज्याच्या घामात नदीचा प्रवाह दडलेला,
त्या शेतकऱ्याला उपाशी ठेवतात.
जो तरुण उडायचं स्वप्न पाहतो,
त्याचे पंख डॉलर कापुन टाकतो,
पण उठणार आहे नवा वारा,
स्वदेशीचा, परिवर्तनाचा ताजा फुंकारा.”

दरम्यान शहरातला एक व्यापारी गावात येऊन म्हणाला – “तुम्ही स्थानिक उत्पादन करणार? पण डॉलरची बाजारभावाशी टक्कर कशी द्याल? मोठ्या कंपन्या तुम्हाला गिळून टाकतील.”

अभिजितने ठाम आवाजात सांगितलं –
“आम्ही हरणार नाही. आम्ही स्वाभिमान जपणार. सोनं सुद्धा हा देश पिकवतो,आणि आम्हाला सांगतात की डॉलरचं गुलाम व्हा? नाही चालणार हे !”

हळूहळू गाव बदलू लागलं.बरीच कुटुंबं आत्मनिर्भर झाली. भाजीपाला विकण्यासाठी गावच्या बाजारात रांगा वाढल्या. आयात पॅकेज्ड वस्तूंच्या जागी गावातून तयार वस्तूंना मागणी येऊ लागली.

त्यामुळे सरकारी अधिकारीसुद्धा चौकशीसाठी येऊ लागले. काहींनी अडचण निर्माण केली. पण गावकरी ठाम राहिले.

“जहाँ इरादे मज़बूत होते हैं,
वहाँ हर तूफ़ान झुक जाता है.
‘डॉलर’ हो या दुनिया की ताक़त,
युवाओं का जुनून सबको रोक जाता है.”

एका दिवशी अभिजीत कंपनीत मुलाखत द्यायला पुन्हा पुण्यात गेला. तिथे त्यांनी विचारलं –”तुझ्याकडे अनुभव नाही. मग आम्ही तुला का घ्यावं?”

तो शांतपणे म्हणाला –
“अनुभव हा केवळ कंपनीत काम करूनच मिळत नाही साहेब . अनुभव मिळतो जेव्हा तरुण गाव बदलतो, लोकांना आत्मनिर्भर करतो, महागाईला थेट भिडतो. जर ते काम अनुभव नसेल, तर कुठलंही अनुभवाचं परिमाण अपूर्ण आहे सर.”

कंपनीवाल्यांनी त्याला नोकरीची ऑफर दिली. पण अभिजित हसून म्हणाला –
“मला तुमच्याकडे नोकरी नको. मला माझ्या मातीशीच नाळ जोडायची आहे सर ”

गावातला विकास बघून त्याचे वडील म्हणाले –
“बाळा, तू आमचं स्वप्न उजळवलंस आज. डॉलरने घातलेलं ओझं तू जनतेवरून उतरवलंस आज. आता वाटतंय, हा देशपण बदलू शकतो.”

अभिजितच्या डोळ्यांत आसवं तरळली. तो म्हणाला –
“मी एकटा काय करीन? पण आपला प्रत्येक तरुण उठला तर डॉलरसारखं ओझं गवताच्या पातीसारखं हलकं होईल.”

“प्रत्येक थेंबात समुद्र दडला आहे,
प्रत्येक पावलात इतिहास बदलला आहे.
तरुणाई उठली की साखळी तुटते,
गुलामी नाही, स्वाभिमान जिंकतो.
डॉलराचं सावट आता फक्त राहिली होती आठवण,
भारतीय तरुण झाला होता नवा किरण.”

—- लेखक: डॉ.नितीन पवार, शिरुर ,पुणे.

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support