Contents
🚨 निर्वी (ता. शिरूर) येथे शेतातून 85 हजारांच्या शेती अवजारांची चोरी
शिरूर, दि. 30 ऑक्टोबर 2025|प्रतिनिधी |
मौजे निर्वी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे अज्ञात चोरट्याने शेतातून तब्बल ₹85,000 किमतीची शेती अवजारे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा र. नं. 774/2025 भारतीय न्यास संहिता कलम 303 (2) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी: दिनेश गुलाब टिंगरे (वय 35 वर्षे, व्यवसाय शेती, रा. विश्रांतवाडी धानोरी, ता. हवेली, जि. पुणे)
संपर्क: 9763655555
घटनेचे ठिकाण व वेळ:
दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत मौजे निर्वी येथील गट नं. 594 मधील फिर्यादीच्या शेतातील रूमसमोरून चोरी घडली.
चोरी गेलेला माल:
- ₹60,000 किमतीचा हायड डबल रिव्हर्सीबल प्लग (45 HP कंपनीचा)
- ₹25,000 किमतीचा काकया सीड डील मॅन्युअल (9 टाइन कंपनीचा)
एकूण नुकसान: ₹85,000
घटनेचे स्वरूप:
अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय व लबाडीच्या हेतूने वरील अवजारे चोरून नेले. घटनेची माहिती समजताच फिर्यादी दिनेश टिंगरे यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
प्राथमिक तपास:
- दाखल अंमलदार: पोहवा खेडकर
- तपासी अंमलदार: पोहवा मोरे
- प्रभारी अधिकारी: पोनि. संदेश केंजळे (शिरूर पो. स्टे.)
पोलीस तपास सुरु असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे व स्थानिक माहितीदारांना चौकशीसाठी जोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
Read more >>>>>>
दिवाळीसाठी टॉप 5 मोबाईल फोन 2025 (₹30,000 खाली)
जमीनीचा वाद शिगेला :पोलिस हस्तक्षेपाची गरज !(पहा व्हिडिओसह…)
सोशल मीडियावरील गैरवापर थांबवा; शिरुर पोलीसांचा इशारा!
