Does God Exist? Marathi discussion on the existence of God featuring philosophical and scientific perspectives by Satyashodhak Blog.ईश्वर अस्तित्वात आहे का? विज्ञान, तत्त्वज्ञान आणि धर्माच्या विविध दृष्टिकोनातून सखोल विचार.
Advertisement
Advertisement

17 July 2026

Contents

🌅 प्रस्तावना

Does God Exist ?

“ईश्वर आहे का?”

‘अल्लाह’ अस्तित्वात आहे का?

सामान्य माणसाचा ‘देव’ अस्तित्वात आहे का?

असे वेगवेगळे प्रश्न मी काही कारणास्तव विचारले आहेत.

● पहिले तीन प्रश्न हे गहन प्रश्न आहेत. चौथा प्रश्न, ‘ चित्र, चित्रपट, मालिका,सिरीज, फिक्शन ,मुर्ती मधील देव खरा असतो.आणि एवढे लोक मानतात म्हणून तो खरा आहे.असे साधारण ‘पाहिलेला’,या पद्धतीने पाहिलेला, सांगितलेला ‘देव’ म्हणजे खरा देवही मानतात. म्हणजे अन्धस्द्धेतला देव मानतात. अगदी tribal अवस्थेतला, पुर्वजान्चा देव खरोखरच असतो. असे मानतात.

● “अनेक लोक लोकप्रिय संस्कृतीतील देवप्रतिमांना वास्तव समजून मानसिक आधार शोधतात. हा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक असले, तरी तो ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा ठरत नाही.”

● तसा Does God Exist? प्रश्न मानवजातीला हजारो वर्षांपासून सतावत आला आहे. विज्ञान प्रगत झाले, तंत्रज्ञान विकसित झाले, समाज बदलला — पण ईश्वर अस्तित्व चिंतन आजही तितक्याच तीव्रतेने सुरू आहे.

● Does Dod Exist?” या विषयावर लेखक आणि सार्वजनिक विचारवंत जावेद अख्तर तसेच विविध धार्मिक विद्वानांमधील चर्चाही प्रसिद्ध आहेत.”

” हा Debate आपण पाहिला असेल ! नसेल तर यु ट्युब वर पहा.”

हा प्रश्न केवळ धार्मिक नाही. तो तत्त्वज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र आणि मानवी अनुभव यांच्या संगमावर उभा आहे.

🔍 Does God Exist ? : ‘ईश्वर अस्तित्व चिंतन’ का आवश्यक आहे?

मानव हा प्रश्न विचारणारा प्राणी आहे.
● “मी कोण?”
● “जगाची निर्मिती कशी झाली?”
● “मृत्यूनंतर काय होते ?”

“अनेक तत्त्वज्ञांच्या मते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांत ईश्वराची संकल्पना विकसित झाली.”

📌 भीती आणि आश्रय

वादळ, वीज, पूर यांसारख्या घटनांमुळे मानवाने अदृश्य शक्तीची कल्पना केली.

📌 अर्थ शोधण्याची गरज

अराजकातही व्यवस्था शोधण्याची प्रवृत्ती मानवात आहे.

Advertisement
Advertisement

श्रद्धा विरुद्ध तर्क? की दोघांचा संवाद?

🧠 तत्त्वज्ञानातील ईश्वर अस्तित्व चिंतन

🔹 कारण-कार्य सिद्धांत
प्रत्येक गोष्टीला कारण असते. विश्वाचेही कारण असावे.
त्या अंतिम कारणाला “ईश्वर” म्हणतात. Does God Exist? या प्रश्नावर काही लोक हा युक्तिवाद करतात.

🔹 रचना सिद्धांत

विश्वातील अचूकता आणि गणिती संरचना पाहता नियोजनाची कल्पना येते.म्हणून नियोजन करणारा ईश्वर आहे,असे मानतात.

🔹 नैतिक सिद्धांत

” मानवात असलेली चांगले-वाईट फरक करण्याची जाणीव कुठून आली?”

🔬 विज्ञान आणि ‘ईश्वर अस्तित्व’ चिंतन

“विज्ञान मुख्यतः ‘कसे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधते; तर ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर अनेकदा तत्त्वज्ञान आणि धर्माच्या क्षेत्रात शोधले जाते.”असे म्हटलं जाते.

” म्हणून ईश्वराचा प्रश्न “का?” या क्षेत्रात येतो.”

🌌 बिग बँग सिद्धांत

“बिग बँगपूर्वी काय होते, किंवा ‘पूर्वी’ हा प्रश्न अर्थपूर्ण आहे का, यावर आजही संशोधन सुरू आहे.”मात्र ही थिअरी जास्त प्रमाणात तथ्य असलेली आज मानली जाते. एक बिन्दु होता. वस्तुमान अगणितच असणार फिजीक्सच्या दृष्टीने ! त्याचा भयंकर असा स्फोट Big Bang झाला.

त्या बिन्दुत सामावलेले ब्रम्हाण्ड चौफेर विखुरले गेले. पुढे वस्तूमान असलेल्या आकाशगन्गा बनल्या. तारे बनले. गृह बनले. पृथ्वी हा गृह बनला. पाणी, हवा व सर्व सृष्टी बनली. त्याची उत्क्रान्ती झाली. यातुन आजचा माणूस तयार झाला. पुढे देखील तो असाच बदलेल, वगैरे.याला करोडो वर्ष लागली.

🧬 उत्क्रांती सिद्धांत

जीवन नैसर्गिक प्रक्रियेतून विकसित होणे झाले. वर सांगितल्याप्रमाणे Evolution अर्थात उत्क्रांतीवाद हे सांगतो. तोही जास्त प्रमाण मानला जातो.

⚛️ क्वांटम भौतिकी

अतिसूक्ष्म कण- आपलेच सजिव आणि निर्जीव कण हे अतिसूक्ष्म पातळीवर अनिश्चितता आणि शक्यता दाखवतात.उदाहरण-एक बिन्दु एका वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्व दाखवतो. म्हणजे माझ्या तुमच्या सारखे model universe मधे एका वेळेस अनेक ठिकाणी अस्तित्वात असु शकतात. शक्यतान्ची शक्यता अनेक दाखवतो. पण हे अजून सन्शोधन अवस्थेत आहे. कदाचित exact व clear चित्र सापडेलही नन्तर!

तर असे असणे हा — दैवी हस्तक्षेप की नैसर्गिक नियम? असा प्रश्न विचारत हेच ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करते. असा दावा करतात.

“क्वांटम भौतिकी अनिश्चिततेचे गणितीय वर्णन करते. काही लोक त्यातून दैवी अर्थ शोधतात; परंतु मुख्य प्रवाहातील विज्ञान असा निष्कर्ष काढत नाही.”

प्रश्न अनंत… उत्तर शोध सुरूच…

प्रसिद्ध विचारवंतांची मते—

१. Albert Einstein

“विज्ञानाशिवाय धर्म अपूर्ण आहे आणि धर्माशिवाय विज्ञान आंधळे आहे.”

२. Stephen Hawking

“विश्व समजून घेण्यासाठी विज्ञानाचे नियम पुरेसे आहेत; त्यासाठी अलौकिक हस्तक्षेप गृहीत धरण्याची आवश्यकता नाही.”

३. Carl Sagan

“असामान्य दाव्यांसाठी असामान्य पुरावे आवश्यक असतात.”

४. Richard Dawkins

“पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रश्न विचारणे आणि तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.”

५. Francis Collins

“विज्ञान आणि श्रद्धा हे परस्परविरोधी नाहीत; अनेकांसाठी ते सत्याचा शोध घेण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत.”

🚫 नास्तिकता आणि अज्ञेयवाद

🔹 नास्तिकता

ईश्वराचा पुरावा नाही — म्हणून स्वीकार नाही.

🔹 अज्ञेयवाद

ईश्वर आहे की नाही — सांगता येत नाही.

“दोन्ही भूमिका ‘ईश्वर अस्तित्व चिंतन’ – Does Dod Exist?च्या परिघातच येतात.”

🧘वैयक्तिक अनुभव

काही लोकांना ध्यान, प्रार्थना, संकटातून बाहेर पडताना ईश्वराची अनुभूती येते.असे सांगितले जाते.पण ती अनुभूती ईश्वराची की एक मानसिक अवस्था?

● विज्ञान सांगते — मेंदूचे न्यूरोलॉजिकल पॅटर्न—-अनुभूती
• श्रद्धावादी म्हणतात — दैवी अनुभूती.

⚖️ दुःखाचा प्रश्न

जर ईश्वर सर्वशक्तिमान असेल, तर दुःख का?

स्वतंत्र इच्छा ? free will जी मानवात अस्तित्वात आहे तिचा परिणाम होऊन दुखः मिळते.

” मात्र जन्मताच गंभीर आजाराने पीडित बालकाचे दुःख आपण कसे समजावून सांगू?”

● मग कर्म सिद्धांत? मागील जन्मावर आधारित सिद्धांत,मागील जन्मात केलेले पाप !

● “कर्मसिद्धांत हा धार्मिक-तत्त्वज्ञानातील दृष्टिकोन आहे; त्याला वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.”

● विकासाची प्रक्रिया?
हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

” तरी जुळण्यासारखा वाटतो.”

🇮🇳 भारतीय विचारपरंपरा

भारतात विविध दृष्टिकोन आढळतात:

● वेदांत — ब्रह्म ही अंतिम सत्यता.
● बौद्ध विचार — ईश्वर संकल्पनेला दुय्यम स्थान.
● चार्वाक — भौतिकवाद.

● न्याय

● वैशेषिक

● सांख्य

● योग

● मीमांसा

● वेदांत

● बौद्ध

● जैन

● चार्वाक

ही विविधता भारतीय बौद्धिक परंपरेची एक ताकद आहे.सामान्य माणसाची नाही !

🌍 आधुनिक काळातील ईश्वर अस्तित्व चिंतन

आज अनेक लोक स्वतःला म्हणवतात:

मी “Spiritual but not religious.”

“ते ईश्वरतत्व मानतात, पण संस्थात्मक धर्म स्वीकारत नाहीत.”

📌 निष्कर्ष

Does God Exist ?: ‘ईश्वर अस्तित्व चिंतन’ हा अंतिम निष्कर्षाचा प्रश्न नाही असाच अनुभव आहे.पण राहीलच असेही नाही—

● “श्रद्धा आणि तर्क हे परस्परांचे शत्रू नसून मानवी ज्ञानप्रवासातील दोन वेगवेगळे मार्ग असू शकतात. अंतिम उत्तरापेक्षा प्रामाणिक शोध अधिक महत्त्वाचा आहे.”

● तो प्रवास नक्कीच आहे.

● श्रद्धा असो वा नास्तिकता —

👇महत्त्वाचे म्हणजे ‘प्रश्न विचारण्याची वृत्ती जपणे’.

कदाचित ईश्वर हा बाह्य शक्ती नसून अंतर्मनातील प्रकाश असू शकतो!

तुमचे मत काय?

👇ईश्वर अस्तित्वात आहे असे तुम्हाला वाटते का? की हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.

FAQs

1: ईश्वर आहे का?

उत्तर: ईश्वराच्या अस्तित्वाबाबत आजपर्यंत सर्वमान्य वैज्ञानिक किंवा तत्त्वज्ञानात्मक निष्कर्ष उपलब्ध नाही. श्रद्धा, तर्क, विज्ञान आणि वैयक्तिक अनुभव यांच्या आधारे लोकांची मते वेगवेगळी आहेत.

FAQ 2: विज्ञान ईश्वराच्या अस्तित्वाला मान्यता देते का?

उत्तर: विज्ञान ईश्वराचे अस्तित्व सिद्ध किंवा खोडून काढत नाही. विज्ञान नैसर्गिक घटनांचे निरीक्षण, प्रयोग आणि पुराव्यांच्या आधारे स्पष्टीकरण देते.

FAQ 3: नास्तिकता आणि अज्ञेयवाद यामध्ये काय फरक आहे?

उत्तर: नास्तिकता (Atheism) ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही, तर अज्ञेयवाद (Agnosticism) ईश्वर आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही, अशी भूमिका मांडतो.

FAQ 4: बिग बँग सिद्धांत ईश्वराचे अस्तित्व नाकारतो का?

उत्तर: नाही. बिग बँग सिद्धांत विश्वाच्या प्रारंभाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देतो. तो ईश्वराचे अस्तित्व सिद्ध किंवा नाकारत नाही.

FAQ 5: भारतीय तत्त्वज्ञानात ईश्वराबद्दल कोणते विचार आहेत?

उत्तर: भारतीय तत्त्वज्ञानात वेदांत, सांख्य, न्याय, योग, बौद्ध, जैन आणि चार्वाक अशा विविध परंपरा आहेत. काही ईश्वर स्वीकारतात, काही ईश्वराला गौण मानतात, तर काही ईश्वर मानत नाहीत.

FAQ 6: श्रद्धा आणि तर्क एकत्र नांदू शकतात का?

उत्तर: होय. अनेक तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांच्या मते श्रद्धा आणि तर्क हे परस्परविरोधी नसून सत्याचा शोध घेण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात.

FAQ 7: ईश्वराचा अनुभव हा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे का?

उत्तर: ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक अनुभव अनेक लोक सांगतात. विज्ञान अशा अनुभवांचा मेंदू आणि मानसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करते; मात्र ते ईश्वराच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा मानले जात नाहीत.

FAQ 8: ‘Does God Exist?’ हा प्रश्न आजही महत्त्वाचा का आहे?

उत्तर: कारण हा प्रश्न केवळ धर्माशी संबंधित नाही. तो विश्वाची उत्पत्ती, मानवी अस्तित्व, नैतिकता, चेतना, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्वांशी निगडित असल्यामुळे आजही चर्चेचा आणि संशोधनाचा महत्त्वाचा विषय आहे.

आणखीन लेख वाचा….

ईश्वराच्या अस्तित्वाबाबत चिंतन : श्रद्धा, तर्क आणि मानवाचा शोध

साक्षीभावाचे टप्पे आणि अडचणी कोनत्या? : साक्षीभाव भाग- 2

Mind Reading Trick: खरोखर मन वाचता येते का? 5 Viral Tricks मागचे विज्ञान

WA 1783784616091
Advertisement

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.