Dr. B. R. Ambedkar on caste discrimination in modern India – Marathi featured imageडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारे आधुनिक भारतातील जातीय भेदभावाचे सखोल विश्लेषण
Advertisement
Advertisement

Dr. B. R. Ambedkar : विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अवकाश संशोधनाच्या युगातही भारतात जातिव्यवस्था टिकून आहे. असे का? या प्रश्नाचे तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक उत्तर Dr. B. R. Ambedkar यांनी शंभर वर्षांपूर्वीच ‘Castes in India’ आणि ‘Annihilation of Caste’ या ग्रंथांत दिले होते. आजही Dr. B. R. Ambedkar यांचे  विश्लेषण तितकेच समकालीन आणि विचारप्रवर्तक वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी ‘कास्ट्स इन इंडिया’ (Castes in India) आणि ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ (Annihilation of Caste) या प्रबंधांमधून या प्रश्नाचे जे तर्कनिष्ठ विश्लेषण केले, ते आजही तितकेच दाहक आणि सत्य आहे.

Dr. B. R. Ambedkar:जाणीवपूर्वक केलेली ‘तुकडेबंदी’ (Parcelling)

बाबासाहेबांच्या मते (Ambedkar Caste System) , भारतीय समाज हा मुळात एक ‘एकजिनसी’ (Social Endosmosis (सामाजिक अभिसरण) समूह होता. भारताला केवळ भौगोलिकच नव्हे, तर एक खोलवर सांस्कृतिक एकता लाभलेली होती.

मात्र, या एकजिनसी समाजाचे ‘तुकडे’ पाडून त्याला वेगवेगळ्या कप्प्यात बंदिस्त करण्यात आले. ही प्रक्रिया म्हणजे नैसर्गिक विभागणी नसून ती जाणीवपूर्वक केलेली ‘तुकडेबंदी’ (Parcelling) आहे. (Annihilation of Caste)

१. जातीचे मूळ लक्षण:जातीचे मूळ लक्षण : अंतर्विवाह (Endogamy)

Dr. B. R. Ambedkar  बाबासाहेबांच्या विश्लेषणातील केंद्रबिंदू म्हणजे ‘अंतर्विवाह’. त्यांच्या मते, जात (Castes in India) म्हणजे केवळ व्यवसाय किंवा श्रेष्ठ-कनिष्ठता नाही, तर ती मुळात ‘अंतर्विवाह'(Endogamy) आहे. भारतीय समाजात मुळात ‘सगोत्र’ विवाहाची बंदी (Exogamy) होती, म्हणजेच आपल्या गोत्राबाहेर लग्न करण्याचा नियम होता.

जेव्हा एका वर्गाने स्वतःला एका चौकटीत बंदिस्त केले आणि आपल्याच गटात लग्न करण्याचा नियम (Endogamy) लादला, तेव्हा खऱ्या अर्थाने ‘जाती’ची निर्मिती झाली.

Dr. B. R. Ambedkar : जाती या नेहमी अनेकवचनातच असतात

येथे एक महत्त्वाचा सिद्धांत बाबासाहेब मांडतात (Babasaheb Ambedkar Thoughts) : “जात ही संकल्पना एकवचनात अस्तित्वातच असू शकत नाही; जाती या नेहमी अनेकवचनातच असतात.

” जेव्हा एक गट स्वतःला आतून बंदिस्त करून घेतो (Closing In), तेव्हा तो आपोआपच इतरांना बाहेर काढतो (Closing Out). ही ‘आत राहण्याची’ आणि ‘बाहेर काढण्याची’ प्रक्रियाच जातींची गुंतागुंत निर्माण करते.

‘Surplus Men’ आणि ‘Surplus Women’ : जातीच्या अस्तित्वाचे साधन

एखाद्या गटाने स्वतःला जातीत बंदिस्त केले की, त्यांच्यासमोर स्त्री आणि पुरुषांच्या संख्येचे संतुलन राखण्याचे तांत्रिक आव्हान उभे राहते. जर समूहातील एखादा पुरुष किंवा स्त्री जोडीदाराविना शिल्लक राहिली, तर ती व्यक्ती जातीबाहेर लग्न करून जातीची भिंत तोडू शकते. या ‘वाढीव’ (Surplus) व्यक्तींची विल्हेवाट लावण्यासाठी समाजाने काही अमानवीय प्रथांना जन्म दिला:

सक्तीचे वैधव्य: सती जाणे सर्वत्र शक्य नसल्यास, स्त्रीचे पुनर्वसन रोखण्यासाठी तिला विद्रूप करणे आणि तिचे मानवी हक्क हिरावणे हा मार्ग स्वीकारला गेला.

बालविवाह (Annihilation of Caste /BAWS) : जर पुरुष ‘सरप्लस’ झाला, तर तो जातीसाठी एक ‘भांडवल’ (Asset) असतो. त्याला बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी वयाने अत्यंत लहान मुलीशी त्याचे लग्न लावून दिले जाते, जेणेकरून लैंगिक समतोल राखला जाईल.

या प्रथा केवळ धार्मिक परंपरा नव्हत्या, तर त्या ‘जातीचे अस्तित्व टिकवण्याचे साधन‘ (Tools for Preserving Caste) होत्या. समाजाने या कडू गोळीवर धर्माचे साखरेचे वेष्टन चढवून ती लोकांच्या गळी उतरवली.

३.अनुकरणाचा संसर्ग (Infection of Imitation)

जात कशी पसरली? याचे उत्तर बाबासाहेब गॅब्रिएल टार्डे (Gabriel Tarde) यांच्या ‘अनुकरणाच्या सिद्धांता’ (Annihilation of Caste / BAWS) तून देतात. समाजात प्रतिष्ठा असलेला वर्ग जेव्हा स्वतःला जातीत बंदिस्त करतो, तेव्हा खालच्या स्तरावरील वर्ग त्याचे अंधानुकरण करू लागतात.

• सायकॉलॉजिकल (मानसिक) प्रक्रिया: ब्राह्मणांनी स्वतःचे दरवाजे बंद केले, हे पाहून इतर वर्गांनीही प्रतिष्ठेपोटी स्वतःला जातीत बंदिस्त करून घेतले. याला बाबासाहेब ‘इन्फेक्शन ऑफ इमिटेशन‘ (Infection of Imitation) म्हणतात

• मेकॅनिस्टिक (यांत्रिक) प्रक्रिया: जेव्हा काही गट स्वतःला ‘आत’ बंद करून घेतात, तेव्हा इतर गट आपोआपच ‘बाहेर’ फेकले जातात. ही प्रक्रिया अनिवार्य ठरते.

यामुळे समाजात ‘सामाजिक अभिसरण’ (Social Endosmosis) थांबते. आदर्श समाजात एका भागातील बदल दुसऱ्या भागापर्यंत पोहोचण्यासाठी मोकळे मार्ग (Channels) हवे असतात, परंतु जातीव्यवस्थेने हे मार्गच कायमचे रोखून धरले.

मनु आणि जातिव्यवस्था : ऐतिहासिक वास्तव

मनुने जात निर्माण केली” हा एक मोठा गैरसमज आहे. बाबासाहेबांच्या मते, जातिव्यवस्था मनुच्या आधीपासूनच अस्तित्वात होती. मनुने केवळ त्या काळच्या प्रचलित नियमांचे संकलन केले आणि त्याला ‘धर्म’ म्हणून घोषित केले.

“मनुने जात दिली नाही आणि तो तसे करू शकत नव्हता. ही व्यवस्था त्यापूर्वीच अस्तित्वात होती. मनु केवळ अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे संहिताकरण (Codification) करणारा आणि ‘जातिधर्मा’चा प्रचार करणारा एक व्यक्ती होता.”

५. सामाजिक सुधारणा आधी की राजकीय?

स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय स्वातंत्र्यासाठी धडपडणाऱ्या नेत्यांना बाबासाहेबांनी काही टोकदार प्रश्न विचारले होते. त्यांचा स्पष्ट पवित्रा होता की, जो समाज आपल्याच बांधवांना गुलाम मानतो, तो राजकीय सत्तेसाठी पात्र कसा?

त्यांनी सामाजिक विषमतेची काही दाहक उदाहरणे दिली आहेत:

• पेशवे काळ: पुण्यात अस्पृश्यांना गळ्यात थुंकण्यासाठी गाडगे आणि पाऊलखुणा पुसण्यासाठी कमरेला झाडू बांधून फिरावे लागत असे. (Annihilation of Caste / BAWS)

• इंदूरमधील बलई (Balais) समुदाय (Annihilation of Caste किंवा BAWS) : या समुदायाला सोन्याची जर असलेली पागोटी (Gold-lace-bordered pugrees) वापरण्यास, रंगीत काठ असलेली धोतरे नेसण्यास आणि स्त्रियांना चांदीचे दागिने वापरण्यास बंदी होती. केवळ ‘उच्चवर्णीयांच्या’ बरोबरीने राहण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना गावाबाहेर काढण्यात आले.

• चक्रवारा (Chakwara)  येथील (Annihilation of Caste / BAWS) घटना: एका अस्पृश्याने आपल्या पाहुण्यांना ‘तूप’ (Ghee) खाऊ घातले, म्हणून संपूर्ण गावावर हल्ला करण्यात आला. कारण तूप खाणे हे केवळ उच्चवर्णीयांचेच ‘वैभव’ मानले जाई.

• रोममधील ‘पॅट्रिशियन’ आणि ‘प्लेबियन'( Annihilation of Caste / BAWS)  यांच्यातील संघर्षाचा दाखला देत बाबासाहेब बजावतात की, जोपर्यंत आपण सामाजिक समता प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत कोणतीही राजकीय घटना टिकणार नाही.

निष्कर्ष आणि भविष्याचा वेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विश्लेषण आपल्याला अंतर्मुख करते. त्यांच्या मते, “लोकशाही हा केवळ सरकारचा प्रकार नाही, तर तो मुळात ‘सहजीवनाचा‘ (A mode of associated living) एक मार्ग आहे.” जात ही माणुसकीच्या मार्गातील सर्वात मोठी भिंत आहे.

लेख संपवताना एकच प्रश्न उरतो—आपण आजही जातीच्या नावावर जे अभिमान बाळगतो, ते प्रत्यक्षात आपल्याच समाजाला कमकुवत करण्याचे जुने सापळे तर नाहीत ना? जोपर्यंत आपण धार्मिक संकल्पनांचा पाया बदलून माणुसकीला धर्माच्या वर स्थान देत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ‘जातीचा अंत’ शक्य आहे का?—Dr. B. R. Ambedkar

“जातीचा अंत केवळ कायद्याने होत नाही; तो मनातील भिंती कोसळल्यावरच शक्य होतो. बाबासाहेबांचा संघर्ष आजही पूर्ण झालेला नाही, म्हणून त्यांचे विचार आजही तितकेच आवश्यक आहेत.”

संदर्भ :

• Castes in India (1916)

• Annihilation of Caste (1936)

• Dr. Babasaheb Ambedkar : Writings and Speeches (BAWS)

WA 1783784616091
Advertisement

Read More>>>>

How to Celebrate Ambedkar Jayanti? : आदर्श आंबेडकर जयंती कशी साजरी करावी?- लेख-10

Ambedkar Jayanti 2026 Education : Why Education is a Tool of Social Change | 6

Ambedkar Jayanti 2026 Our Duties : आपली संविधानिक जबाबदारी काय असते ?लेख- 4

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.