ही माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 आहे — कोयना ते टॉपर या प्रवासातून घडलेलं आत्मचिंतन.
मी कोण आहे?
हा प्रश्न मी आयुष्यभर स्वतःला विचारत आलो आहे.
कधी मी वर्गात टॉपर होतो.
कधी रुग्ण.
कधी अपयशी विद्यार्थी.
कधी आक्रमक वक्ता.
कधी तत्त्वचिंतक.
आणि तरीही प्रश्न कायम राहतो — “मी” कोण?
तत्त्वज्ञानात याला आदिम प्रश्न म्हणतात.
मी हे लिहितो आहे, मला हे समजतं आहे — याचा अर्थ मी आहे.
माझं नाव नितीन पवार आहे, हे मला माहीत आहे.
पण हे नाव मिळण्याआधीही मी होतोच.
जर माझं नाव अकबर हुसेन असतं, किंवा डेव्हिड ब्राऊन असतं,
तरीही ही जाणीव तशीच राहिली असती.
मग प्रश्न असा उरतो —
हा “मी” म्हणजे शरीर आहे का?
की शरीर पाहणारी जाणीव?
हे हात टाईप करत आहेत.
पण हे हात पाहणारे डोळे कोणाचे?
आणि डोळ्यांनाही पाहणारे कोण?
‘मी’ म्हणजे जाणीव आहे का?
“मी” म्हणजे फक्त एक awareness, consciousness आहे का?
जी शरीरात आहे… की शरीरापासून वेगळी?
जर शरीर नसलं, तरी “मी” राहीन का?
आणि जर कोणी शरीराशिवाय जाऊन परत आला असता
आणि सांगितलं असतं —
“हो, शरीर नाहीसं झाल्यावरही ‘मी’ आहे”,
तर तो सर्वमान्य पुरावा ठरला असता.
पण असा कोणी परत आलेला नाही.
म्हणून एवढंच ठरवतो — शरीर आणि नाव हे temporary आहेत.
पुरावा एकच — मृत्यू.
तो आज ना उद्या येणारच आहे.
मृत्यू तात्पुरता नाही. तो शाश्वत आहे.
आता शरीराची गोष्ट
आता ही माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 आहे शरीराची.
नाव दिलेल्या अस्तित्वाची — नितीन पवार.
प्रत्येकाची अशीच एक स्टोरी असते.
तीही temporary.
पण हा temporary काळ time-relative असतो.
हे आईनस्टाईनने दाखवून दिलं.
म्हणजे subject आणि object नुसार
वेळ वेगळी अनुभवली जाते.
आठ वर्षे मी थेट निसर्गात वाढलो.
माझ्या स्वभावाची जडणघडण तिथेच झाली.माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 ही त्यातुन आली आहे.
“हा मुलगा हिरा आहे”
मी लहानपणापासून अभ्यासात पुढे.
नेहमी पहिला.
मार्क्स म्हणजे माझं अस्तित्व.
मी पहिला आलो की
आप्पांच्या चेहऱ्यावर प्रकाश यायचा.
एक समीकरण नकळत तयार झालं —
मी यशस्वी = वडील आनंदी मी पहिला = मी मौल्यवान
चुलते MBBS.
ते मला “genius” म्हणायचे.
आप्पा म्हणायचे —
“हा हिरा आहे. चौकोनी चिरा आहे.”
तो शब्द अर्थ न कळता
मनात बसला.
मी मुलगा राहिलो नाही.
मी हिरा झालो.
शरीर क्षीण, अपेक्षा प्रचंड
बुद्धी तेजस्वी होती.
पण शरीर नाजूक.
हडकुळा.
वारं आलं तरी उडून जाईल असा.
तरीही विजिगीषु वृत्ती जबरदस्त.
मी वारंवार आजारी पडायचो.
ताप, अशक्तपणा.
आप्पांना माझी भीती वाटायची.
ते माझ्यावर जास्त प्रेम करायचे.
इतर भावंडं सुदृढ.
मी वेगळा.
वेगळेपण सुखदही होतं,
आणि एकाकीही.
सततच्या बदल्या – तुटणारी मुळे
दर तीन वर्षांनी बदली.
नवीन गाव.
नवीन शाळा.
नवीन मित्र.
आणि अचानक — सगळं संपतं.
मोबाईल नव्हते.
सोशल मीडिया नव्हतं.
मित्र म्हणजे प्रत्यक्ष चेहरे.
मी रडत नसे.
पण आत हळहळ साठत गेली.
कोयना – स्थैर्याचा शेवटचा टप्पा
कोयना हा सर्वात सुंदर टप्पा.
निसर्ग.
तरुण वडील.
मी अव्वल.
आज कोयना आठवतो तेव्हा
आनंद नाही — हळहळ येते.
कारण ते जग परत येणार नाही.
वडिलांचा निर्णय
आप्पांना छातीत धडधड सुरू झाली.
मोठ्या अपेक्षा. कमी पगार.
त्यांनी Voluntary Retirement घेतली.
तो निर्णय भीतीचा नव्हता.
तो प्रेमाचा होता.
“मुलं सुरक्षित असावीत.
बाकी पुढे बघू.”
साल 1987.
वय 52.
गावी परत
मी आठवीत असताना
आम्ही सविंदणे गावी आलो.
मी पुन्हा पहिला.
दहावीत रेकॉर्ड ब्रेक मार्क्स.
पुन्हा अभिमान.
पुन्हा प्रकाश.
MBBS चे स्वप्न
MBBS.
ते स्वप्न तयार होत होतं.
पण आज मागे वळून विचारतो —
मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं
की वडिलांचा अभिमान जपायचा?
एक जखमी बीज
कोयनेत मी अव्वल होतो.
पण तिथेच एक जखमी बीज रुजलं.
प्रत्येक स्थलांतर = तुटणं.
प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणं.
मी शिकलो —
जगात टिकायचं असेल तर अव्वल राहा.हेच माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 ची प्रेरणा बनली.
निष्कर्ष – भाग 1
आज मी हे लिहितो आहे
तेव्हा त्या मुलाला पाहतो आहे.
हडकुळा.
टॉपर.
वडिलांचा अभिमान.
वारंवार तुटणारा.
तो मुलगा अजूनही माझ्यात आहे.
पण आता मी मोठा झालो आहे.
(पुढील भागात…)
MBBS चे स्वप्न, TB, नाशिक आणि आयुष्यातील पहिला मोठा तडा.
FAQs: माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 बाबतचे प्रश्न!
❓ माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 कशाबद्दल आहे?
ही आत्मकथा लेखकाच्या बालपणापासून सुरू होणाऱ्या आत्मचिंतनात्मक प्रवासाचा पहिला भाग आहे. ❓ कोयना लेखकाच्या जीवनात का महत्त्वाचा आहे?
कारण कोयना हा त्याच्या आठवणी, निसर्ग आणि मानसिक जडणघडणीचा पाया आहे. ❓ पुढील भागात काय येणार आहे?
MBBS चे स्वप्न, TB, नाशिकचा काळ आणि आयुष्यातील पहिला मोठा तडा.