“गावात परतलो… पण मी तोच राहिलो नव्हतो!” — एक वैचारिक प्रवास
Mazi Story: गावात परतलो तेव्हा लोकांना वाटलं — “हा परत आला, म्हणजे अपयशी ठरला.”
पण मला आतून ठाऊक होतं — मी हरलेलो नव्हतो, मी बदललो होतो. मेडिकल कॉलेज सोडणं हा शेवट नव्हता, तर एका नवीन विचारप्रवासाची सुरुवात होती. या प्रवासात मी समाज, स्वतः आणि सत्य यांना नव्याने समजायला सुरुवात केली…
Contents
Mazi Story : अपयश नाही, परिवर्तन होतं! माझा विचारांसह नवा जन्म
मला वाटते की या platform वर लिहिने हे फक्त लिहिने नाही. Keyboard वर Type करणे देखील आहे. अनुभव असा आहे की कागदावर लिहिणे सोपे आहे. मला वेगाने Type करता येत नाही. मीच स्वतः पण का करतो? कारण मलाच आठवावे लागते. वेळ माझी वेगळा असते. शब्द निवडताना पुरेसा वेळ व विचार करणे अशा लेखणासाठी स्वतन्त्र देणे योग्य. काल मी भाग 5 लिहिला. Publish केला. कमीत कमी जे लिहिणे आवश्यक आहे. ते Publish करायला हरकत नाही. मधे भावनांचे फुटणे हा भाग येणार आहे. याची मला जाणीव आहे. अर्थात माझ्या भावनांचे!
तो लक्षात घेऊन आधी महत्वाचे तथ्य लेखनात उतरणे. महत्वाचे आहे. हे तितके प्रातिनीधीक उदाहरणही नाही. हे अनुभव, विचार, आठवणी, तर्क, विश्लेषण अचुक व वास्तव होणे गरजेचे आहे. म्हणून काही वेळा एखाद्या दिवशी थोडं वेगळं लिखाण आले तर त्याची सुसन्गत मान्डणी पुढे होईल. हे नक्की.
मी आधी नाशिक येथील वास्तव्याचा भाग लिहित मी एका टप्प्यावर मी ते मेडिकल कालेज सोडले असे लिहिले. हे ही लिहिले की सोडले नाही. तर परत गावी आलो.परत कधी मी तिकडे सम्पर्क केला नाही. त्याचे कारण देखील मी लिहिले आहे. त्यापेक्षा वेगळे खोटे कारण काही मला लिहीता येत नाही.अक्षर साहित्य हे आहे, असा काही दावा मी करणे हास्यास्पद होईल.
मेडिकल कालेज मधून मी परतल्यावर लोकांनी पहिले काय विचारले? खरं म्हणजे लोकमत हे महत्वाचे नसते. ते ज्याचे त्याचे ‘स्व’ चे प्रक्षेपण असते. हे मला नन्तर किंवा आज समजते. मी care करत नाही लोकमताची आज.इथले लोकमत भिकार Criteria लावणारे आहे. पण तेव्हा तसे नव्हते. म्हणून आणि ते थेट माझ्या जगण्याला प्रभावित करत होते. म्हणून आठवणीत राहिले. आज ते अनेक अन्गान्नी एक महत्वाचा दस्त ऐवज आहे. हे मला चांगले समजते.
“काय झालं मेडिकलचं?”! काय सोडलं की काय? अरे असं करु नको ! ते मिळत नाही सहज कुणाला? थेट निष्कर्ष. थेट सल्ला. जीवन मिळते का सहज? मग हा किती कारणी लावतो ते? हे एरवी रोज भजन किर्तनातुन ऐकणार्या या लोकांना मधल्या काळात कधी आठवले नाही. हा कुठे आहे? कसा आहे? पण इथं म्हणजे शिरुरमधे काही दिवस पुन्हा पुन्हा मी दिसल्यानन्तर खात्री झाली काही लोकांना ! मग आवाज देऊन हाक मारत. विचारत.
Objective Question! Yes or No. मी सांगत असे. पण ‘ती’ बाब सांगण्याची काही केल्या हिंमत झाली नाही. माझ्या मनात काही रहात नाही. असे इतर नेहमी आजही म्हणतात. पण हे मी काही सांगु शकलो नाही. याचे कारण मला त्यापेक्षा मोठे भय वाटणे हे होते. जे आज वाटत नाही.उरले नाही.
हा प्रश्न शब्दांत साधा वाटत होता. पण माझ्या छातीत खोल घाव करायचा.एक मी निश्चित सांगतो की असे जे काही अनुभव आहेत. ते फक्त माझ्या सम्पर्कात असणार्या व्यक्तींबाबत मी सांगतो. इतर नाही. ते किती प्रातिनिधीक होते? किंवा कसे हे नन्तरच्या माझ्या समजेवर अवलंबून आहे. किंवा मोठ्या भाष्यकारानी नोंदवलेली मते आणि माझे अनुभव यांचा काय ताळमेळ बसतो? किंवा कसे यावर अवलंबून आहे.पण ठाम आणि थेट नोंद करणे माझे वैशिष्ट्य आहे.अलिकडच्या माझ्या पत्रकारितेतील लेखनात ते किमान शिरुर मधील लोकांना बरेच माहित आहे.
मी हसून उत्तर द्यायचो तसे — “आरोग्य बिघडलं. थांबलो.””आर्थिक अडचण आली”, समाजकल्याण होस्टेलवर काही गोष्टी अवलंबून होत्या. खाजगी कालेज. समाजकल्याणच्या तरतुदी थेट काही पोहचल्या नाहीत. तुम्हाला सांगतो आजही सरकारी समाजकल्याणचे होस्टेल किती महत्वाचे असते. हे कोनताही मेडिकल स्टुडन्ट सांगु शकेल. अन्यथा शहरात राहणे आजही अनेकांच्या आवाक्यात नाही.
अनुसुचित जाती जमाती मधील मेडिकल स्टुडन्ट साठी तरी ! आणि Infection काही सांगितलं तर कोणी जवळही येणार नाही. म्हणून ते सांगणे म्हणजे आत्महत्या करणे होईल. हे मला समजत होते हे खरे.हा इथला समाज माथेफिरु आहे. एखाद्या स्रीला तो चेटकीण समजून जिवंत जाळू शकतो. चेटुक करणे अन्धस्रद्धा असुनही.
Medical Knowledge बाबत समाजाची ऐशी तैशी आहे आजही . Problem of Acuracy ! Acurate माहिती ! ऐकूनच धन्य व्हाल. बातमीबाबत माहिती काढताना मी रोज अनुभवतो. टि व्ही वरील बातमी पाहणार्याला विचारा. काय बातमी आहे? ऐकून हसू आल्याशिवाय राहणार नाही.कशाचा कशाचा ताळमेळ बसत नाही. फसवणारे या समाजाला किती आणि कसे फसवित असतील , ते सहज समजेल. पुढे आणखीन लिहिन तेव्हा किस्से सांगिन याबाबतचे. हसुन हसुन पुरेवाट होईल आपली. बेमालुण फसवणूक कोठे होते, कशी ते पुढे लिहीन.
तसा पहिला क्रुर आणि अपेक्षाभंग करणारा चेहरा मला दिसला तो माझ्या तथाकथित जातभाईन्चा . जात ही अन्धस्रद्धा आहे.तिला वेज्ञानिक आधार नाही. जात कुणाला सोडायची नाही. फार कमी अपवाद आहेत. जातीचा काही Biological/Genetic अभ्यास , सर्वे व deep study करावा . Mitochondrial DNA बदल हजारो वर्षात किन्चित 0.001 असे बदल होतात. म्हणजे तेवढ्या वर्षापुर्वी यांचा पुर्वज एकच होता. Common होता. सेपीयन होता. त्याचे अवशेष, हाडे इ. सापडले आहेत. त्यावर अभ्यास झाला आहे. पुरावे आहेत. मुळ येकच.नंतर फान्द्या. पण हे स्विकारत नाहीत.त्याचे आता काय करायचं असे निर्बुद्धपणे विचारता.
गावातली सगळी माणसं एका ठिकाणी गोळा केली मिक्स करुन तर कोण कोनत्या जातीचा आहे हे ओळखता येणार नाही. तरीपण ते जमणार नाही म्हणतात. रगील, अडेलतट्टू . बेशरम देखील आहे हा समाज ! साधारण 20 वर्षापुर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरान्च्या काळात मुर्खांची सन्खा थोडी कमी झाली होती. असे आठवते. आणखीन कमी होणे अपेक्षित होते. शिक्षण व Research वर बराच खर्च झाला. पण हे प्रमाण वाढले. कारणे पुढे लिहीन.इथेही थोडक्यात सांगतो. अभ्यासक्रम काही लोक ठरवतात. काय माहिती मुलांना सांगायची. काय नाही. हे सत्तेतील स्थितीवादी/जैसेथेवादी ठरवतात. मोठं अर्थकारण, राजकारण, सत्ता कारण मोठी यन्त्रनना आहे यामागे.
प्रश्न विचारणारे विद्यार्थी नकोत. पाहिजे ते उत्तर देणारे विद्यार्थी पाहिजेत यांना . मानवी विकास जागतिक सर्वेमधे हा समाज 160 + क्रमांकावर आहे. म्हणजे 159 देशातील लोक सर्वान्गिन विकासात पुढे आहेत. लोकसंख्येत आता प्रथम क्रमांकावर आहे हा समाज. लोकसंख्येच्या प्रमाणात किती सन्शोधक निर्माण व्हायला पाहिजेत ? किती नोबेल पुरस्कार मिळायला पाहिजेत ? Olympics किती मेडल्स मिळाली पाहिजेत? कोणी भाषणात/व्याख्यानात सांगितलं तर हसतात. लाज वाटत नाही. GDP मधे देशातील प्रमुख उद्योगपती ही मोजतात. त्यामुळे तो जास्त दिसतो.
पण दरडोई उत्पन्न किती? हे सांगण्याचे टाळतात. सम्पत्तीचे विकेन्द्रीकरण नको का व्हायला? पण नाही.तेच टाळायचे असते यांना. गुणात्मकता Quality महत्वाची असते. Quantity नसते.गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी अभियान सरकारला करावे लागते. इथून सुरवात.
तर सेकंदात एखादी बातमी पसरावी तशी ही बातमी या जातभाईना कशी पोचली आणि कोनत्या स्वरुपात हे हळुहळु समजु लागले . गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी अभियान सरकारला करावे लागते. इथून सुरवात.
तर शिरुरमधील तथाकथित कार्यकर्ते एक से एक महान विचार , मते आणि सल्ले खास ‘चळवळीतील😅’ केडर बेस, प्रशिक्षीत, महापुरुषांची चळवळ पुढे चालवणारे अशी विशेषणे आणि दावा दिवसरात्र करणारे हे लोक असत. आधी ते ऐकून आधार वाटत असे. पण ‘ खिंडीत’ सापडल्यावर हे लोक नेमके काय करतील, असे काही माहित नव्हतं.या अनुभवामुळे मते मिळत नाहीत. पुढे आणखीन लिहीन. अनेक किस्से महानतेचे पुढे लिहीन.
पहिला सल्ला- अरे रामदास आठवले यांना जावुन भेट! यडा आहेस का?.’यडा आहेस का?’ असं जोडायला या लोकांना का आवडत असे. हे मला काही दिवसात समजले. त्याचे कारण समजले. ते असे- हे जन्मतहा: रक्तात चळवळ घेऊन जन्माला येतात. चळवळीचे विचार, महापुरुषांचे तत्वज्ञान यांच्या रक्तात जन्मत: येते. Enlighted असल्यामुळे इतर साहजिकच ‘येडे’ असतात. इतर जातींमधील लोकही ,’ येडे ‘ असतात. असं हे खाजगीमधे नेहमी बोलत असतात. त्यांचे प्रबोधन केले पाहिजे, असे यांना प्रामाणिकपणे वाटते. पण त्यासाठी स्वतः काही तयारी करणे आवश्यक आहे. हे यांच्या थांगपत्ता नाही. आणखीन किस्से पुढे लिहीन.
बुद्धापासुन आ. ह. साळुंखे यांच्या लेखनापर्यन्त एक मोठी परंपरा आहे. ती कायमच मुळातुन वाचली पाहिजे. हे महत्वाचे असते. आजही आहे. कार्ल मार्क्स जोडीला का पाहिजे? आणि बुद्धाचा ‘आतला’ प्रवास ओशोकडुन समजून घेतला तर आणखीन बरे होईल. कान्शीराम राजकारणात Practically कसे काम करावे? हे सांगतील.मुलनिवासी कोण इव्हाल नोआह हरारी सांगतील. हे माझे आजचे म्हणणे आहे. ते develop होणे तेव्हा पासून सुरु झाले हे खरे. मी कुणाच्याही मुळ लेखनाशिवाय इतरांवर विश्वास क्वचित ठेवतो.Second Hand Sources भाषणात ऐकायला मिळतात. सोईनुसार त्यात काही माहिती लपवली जाते. जे दिसते त्याच्या मागे Back End काय दाखवायचे? हे आधी ठरलेले असते. याबाबत काडीची माहिती नसते.
ते Stratagical असते. हे स्पष्ट अनेक कार्यकर्ते आणि पक्ष, सन्घटना यांचे प्रमुख बोलतात. त्यानंतर हे समजले. नंतर हे लक्षात आले की Strategy आणि Funding यांचे काही नाते आहे. म्हणून शेकडो पक्ष, सन्घटना, सन्था यांची नोंद देखील होते.ती इतकी का? एकच उद्देश पण इतक्या नोंदी कशाला? समाजसेवा करायची ना?
तर तेव्हा कोणी सहानुभूती दाखवायचे. समजा शिक्षक किंवा डाक्टर असेल तर, ‘Payback To Society’ हे बाबासाहेबांचे तत्व व आणि मान्य. कान्शीराम नोंद करतात तसे-,’ मान्गणेवाला समाज मत बनो, देनेवाले बनो. देणेवालो को सन्मान मिलता है’. हे कुणी लक्षात समोरासमोर आणुन दिले तर? या पोरानेच एकदम तसे सांगितलं तर? हा अशी महत्वाची वाक्ये Perfect लक्षात ठेवतो.
एक बाब महत्वाची झाली. माझे वाचन वाढत गेले. चौफेर ते असावे असा आतला आवाज असे. लेखन कुणाचे मला अस्पृश्य नाही. आजही. सर्वांत जास्त ब्राह्मण, यहुदी यांचेच वाचणे झाले. जसे आज इव्हाल नोआह हरारी वाचतो तसे.मात्र बाबासाहेब यांचे लिखाण मी स्रद्धेने वाचत आलो. जरी प्रत्येक स्रद्धा ही आन्धळी असतेच. स्रद्धेची पुर्व अट असते की शन्का, किन्तु असेल तर ती स्रद्धेच्या व्याख्येत बसतच नाही.बाबासाहेब यांच्यावर माझी स्रद्धा आहे.
धार्मिक बाबतीत ‘अहम’ ला Surrender केले नाही. तर विकार काम, क्रोध, मत्सर इ. विसर्जित कसे होतील? त्यासाठी विवेक हा पर्याय असु शकतो का? पुढे लिहिन.
दुसरे बहुजन, चळवळ, महापुरुष, केडर बेस, Pay Back To Society, 85% बहुजन, 15 अभिजन जे मनुवादी, वगैरे शब्द वापरणार्या, सारखे घोकणार्या व्यक्तीला जरा पारखूनच घ्यावे बहुजन काय आणि किंवा आणखीन कोणत्या काय समाजाने ! इतर अशा आवृत्या देशात आहेत. त्या कोनत्या ? ते पुढे लिहिन!
कोणी शांत राहायचे.कोणी मनात मोजमाप करायचे. काय घडले असेल?
पण मला आतून कळत होतं —
मी गावात परतलेला आधीचा मुलगा नव्हतो.मध्यन्तरीच्या काळात औषधोपचार पुर्ण झाले होते. चेहरा Fresh झाला होता. शरीरात Infection राहिले नव्हते. मी एक अपूर्ण स्वप्न घेऊन आलेला तरुण होतो.
घर, पेन्शन आणि मर्यादित अर्थव्यवस्था
वडील आता पेन्शनर.
पेन्शन म्हणजे स्थैर्य नव्हे,
तर मर्यादा.
घर चालत होतं.
पण स्वप्नांची जागा आकुंचन पावलेली होती आधी.
मी स्वतःला विचारलं –
“आता पुढे काय?”
MBBS नाही.
मोठं पद नाही.
पण मेंदू आहे.
वाचन आहे.
तर्क आहे.
मी ठरवलं —
मी थांबणार नाही.
गावातील नजरा
गाव लहान असतं.
ते विसरत नाही.
“हा मेडिकलला गेला होता.”
“परत आला.”
काहींच्या आवाजात सहानुभूती.
काहींच्या आवाजात लपलेला आनंद.तर काहींना कुचेष्ठा करावी वाटते.
मला ते दिसायचं.
मला ते कळायचं.
पण आता मी आधीसारखा भावनिक नव्हतो.
मी निरीक्षक झालो होतो.
मी लोकांकडे बघू लागलो —
त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीकडे.
त्यांच्या मानसिकतेकडे.
त्यांच्या जात-जाणीवेकडे.वर्गजाणीव देखील.
शिक्षण विरुद्ध सामाजिक ओळख
मी टॉपर होतो.
पण गावात माझी ओळख मार्क्सवर ठरत नव्हती.मुळ गावी.
इथे जात, घराणं, परंपरा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या होत्या.इथं व्यक्ती नसतोच समुह असतो. जात हा समुह. जात त्याची ओळख.जी जात नाही ती जात.असेही बेजबाबदारपणे म्हणतील. आजची स्थिती काय? तोंडात, शब्दात जात नाही. पण मनात आहे. जातीतला, लीच Girlfriend, Boyfriend निवडताच.
हे एक कठिण काम आहे. हे Subconscious मधे लहानपणी बसते. इथं Concious चा पत्ता नाही.भक्ती म्हणजे Surrender ची जुणाट सवय. त्यामुळे विवेक, तर्क, विश्लेषण, विज्ञान, नवनिर्मिती, Synthesis या फारच दुरच्या बाबी.
त्यामुळे IQ सुमार दर्जाचा असतो व्यक्तीचा. हा परिणाम. वैज्ञानिक दृष्टिकोन Science Draduate, Double Graduate, Doctors, Lawers, Professors, Teachers अशा घटकांमधे नाही तर इतरांचे काय? विद्यार्थ्यांत नेमका हा अभाव! पुढे विवेक सहज गळुन पडाणे क्षणात शक्य होते. त्यामुळे प्रशासन भ्रष्ट, लोकप्रतिनिधी भ्रष्ट, व्यवस्था भ्रष्ट.हे सर्वांचे. याला कोनतीच जात, धर्म, वर्ग, प्रान्त अपवाद नाही. फक्त सन्धी मिळत नाही तोपर्यंत तो प्रामाणिक असतो. परिवर्तनवादी,पुरोगामी, विवेकवादी, ध्येयवादी वगैरे असतो.
तरी हा समाज चालतो कसा? टिकून कसा? परकिय सध्या तरी आक्रमण करु शकत नाहीत. हे का? पुढे लिहीन.
मला जाणवलं —
भारतीय समाजात शिक्षण पुरेसं नाही.
तुमची जन्मताच ओळख तुमच्याआधी चालते.पन्तप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री देखील जातीने ओळखले जातात. माध्यमे तशी ओळख करून देतात. मुद्दाम 🤣.
तेव्हा मी एक निर्णय घेतला.
कोनतेही Certificate देण्यास हा समाज लायक नाही.त्याच्याकडे Criteria नाही. माफदन्ड नाही. मी माझी ओळख स्वतः तयार करेन. पायन्डा पाडीन. Copy कुणाचीच करणार नाही. आदर्श एकापेक्षा जास्त असु शकतात. देशाबाहेरीलही असु शकतात. देश ही सन्कल्पना देखील सन्कुचित विचार होईल. हे आता फार दुर राहिल. नवीन पिढी जातीव्यवस्था उधळुन लावील. पण अप्रत्यक्षपणे. लैंगिक आकर्षण हे मुख्य कारण असेल.सेक्स सतत पुढे करुन ते Business Strategy म्हणून नवीन पिढीच्या माथी मारले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता AI पारदर्शकता आणेल. मानवाची मानव- 2 ही नवीन प्रजाती असेल.
Deta भरणे एक आव्हान आहे. त्यात Partiality सध्या बरीच दिसते. माहिती Digital Form मधे व्यक्ती, कार्यकर्ते, समाज धुरीण यांनी Convert करणे, जतन करणे हे एक काम राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ते यांचे प्रथम प्राधान्याने असावे लागेल. पुढचे काम AI, AI Tools, AI वस्तू करतील. म्हणून !
वाचनाचा वेग वाढला
मी दिवस-रात्र वाचू लागलो.
इतिहास.
तत्त्वज्ञान.
राजकारण.
मानसशास्त्र.
समाजरचना.
मी नोट्स काढायचो.
तुलना करायचो.
भारतीय आणि जागतिक संदर्भ जोडायचो.
माझ्या डोक्यात विचारांचे नकाशे तयार होत होते.
मी लक्षात घेतलं —
मी फक्त माहिती गोळा करत नाही,
मी समज बांधतो आहे.जास्तीत जास्त चित्र Clear करण्याचा प्रयत्न करतो आहे.
मी पुढे Management मधे डाक्टरेट सम्पादन केली. ISBM, Pune येथून. 98 हजार खर्च झाला. मी लागतील असे शब्द Bank अधिकार्याना बोललो. ते मन्जुर केले Bank ने. तीन वर्ष लागली. प्रबन्ध पुर्ण करायला. ‘महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्याचे व्यवस्थापन व एका मल्टिस्पेशल हास्पिटल अभ्यास’ असा विषय होता. 250+ पानांचा तो English मधे अर्थात लिहीला.
बोलण्याची ताकद
तथ्य.
संविधान.
इतिहास.
जागतिक उदाहरणे.
विज्ञान,
अर्थकारण इ. विषयावर चर्चा झाली तर…
१५ मिनिटांत मी हावी होतो. वातावरण बदलते.
लोक शांत होतात.
कोणी म्हणाते —
“तुमच्याशी वाद घालणं अवघड आहे.”
त्या दिवशी मला कळलं — एक वयस्कर व्यक्ती म्हणाला- ” तुम्ही समोरच्या व्यक्तीला Hypnotize करता.”
हे काही हुरळुन जाण्याची बाब नाही. पण लोक ऐकतात. काही शब्द, English आणि जगभरातील सन्दर्भ लोकांसाठी काही चांगले करण्याची सन्धी निर्माण करतात. जेवढे जमेल तेवढं समाजासाठी, मानवतेसाठी करणे हे माझे ध्येय व जीवन असले पाहिजे.
माझं शस्त्र शब्द आहेत.
करुणा : क्रोध
माझ्यात दोन प्रवाह होते.
एक — करुणा.
वडिलांकडून आलेली.
लोकांना मदत करावीशी वाटायला लावणारी.दयाळू वृत्ती.
दुसरा — राग, क्रोध
व्यवस्थेवर.
दुटप्पीपणावर.
जातीनुसार मोजमाप करणाऱ्या समाजावर.
हा राग मला जाळत नव्हता.
तो मला धार आणि धार देतो.
मी लोकांना घाबरवतो का?
एकदा एका वयस्कर माणसाने सांगितलं —
“तुम्ही बोलता तेव्हा समोरच्याला भीती वाटते.”
मी विचार केला —
भीती का?
कदाचित कारण मी अभ्यास करून बोलतो.
कदाचित कारण मी अर्धवट बोलत नाही.
कदाचित कारण मी प्रश्न विचारतो.माझे तर्क जोरदार असतात?
पण आतून मला माहीत होतं —
मी कोणालाही हरवण्यासाठी बोलत नाही.
मी सत्य मांडण्यासाठी बोलतो.
मोठेपणाची नवी व्याख्या
मेडिकल कॉलेजच्या काळात मोठेपण म्हणजे डॉक्टर होणं होतं. आता हे हास्यास्पद वाटते.आता तर समाज कोणालाच किंमत देत नाही.
गावात मोठेपण म्हणजे Money, Mussle Power, Media Propoganda, Mafia, Political Merit, Brand
माझ्यासाठी मोठेपण म्हणजे स्पष्टता.जी सत्य आणि न्याय यांच्या जवळ जाणारी पाहिजे .मी आधी म्हटले आहे. अन्तीम सत्य मला वाटते, मानवाच्या ‘बसकी’ बात नहीं. कदाचित तो पोहचु लागला तिथे तर त्याच्यासह हा ग्रह, सुर्यकुल, Gallaxy, Universe नष्ट होईल. म्हणजे दुसऱ्या Form मधे जाईल.
कोणते तरी अधिक प्रगत तन्त्रज्ञान, आयाम- Dimension, Multiverse प्रभावित, नियन्रित करत आहे मानवाला ! अज्ञात ज्ञान अद्याप प्रचंड असावे . हा आतला आवाज सांगतो. असे का वाटते? पुढे लिहीन.
मी स्वतःला म्हणालो तेव्हा —
तू पदवीने नाही, विचाराने मोठा हो.चारित्र्य व्यक्ती सापेक्ष, काळसापेक्ष दिसते. पण न्याय तुलनेने स्पष्ट दिसतो. तो यन्रणेत आलेला नाही. ती निकाल देते. निकाल लावते.न्याय देते याची काही खात्री नाही.
पुढे त्या दिवसापासून
मी स्वतःला कमी लेखणं बंद केलं.
एक नवीन ध्येय
मी ठरवलं —
मी लिहीन.
मी जे पाहतो,
जे समजतो,
जे अनुभवतो —
ते शब्दांत मांडेन.
लोकांनी वाचलं तर ठीक.
नाही वाचलं तरी ठीक.
पण मी शांत बसणार नाही.
अंतर्मनातील बदल
गावी परतताना जो मुलगा हरल्यासारखा वाटत होता,
तो आता शोधक झाला होता.
माझ्या डोळ्यांत आता भीती नव्हती.
प्रश्न होते.
तर्क होता.
आणि एक शांत आत्मविश्वास होता.
त्यावेळी मी स्थिर नव्हतो.
पण मी कोसळलेलोही नव्हतो.
पुढील वळण
पुढे माझ्या आयुष्यात
नोकरीचे प्रयत्न,
आर्थिक अस्थिरता,
सामाजिक संघर्ष
आणि वैचारिक उभारीचे नवीन टप्पे येणार होते.
हा प्रवास सोपा नव्हता.
पण आता मी तयार होतो.आहे.
भाग ४ मध्ये –
आर्थिक संघर्ष, नोकरीचे वास्तव, समाजातील दुटप्पीपणा आणि माझ्या विचारांची सार्वजनिक सुरुवात.
माझी स्टोरी चे आधीचे भाग-
माझी स्टोरी : आत्मकथा भाग 1 – कोयना आणि बालपण
माझी स्टोरी भाग 2: MBBS सोडल्यानंतरचा वैचारिक संघर्ष
माझी स्टोरी – सत्यशोधकाचा विचारप्रवास (भाग-3) | My Story Self Reflection
Majhi Story – भाग ४ : सत्य, समाज आणि संघर्ष – माझ्या जीवनाचा विचारप्रवास
Majhi Story Autobiography – भाग 5 | मेडिकल कॉलेज, आजार आणि जीवनाचा संघर्ष

