MD Drug Seizure Shirur : शिरुर मेफेड्रोन बालकाचा वापर हेतुपुर्वक? ₹1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने खळबळ!शिरुर,दि.11 एप्रिल 2026 –प्रतिनिधीMD Drug Seizure Shirur ही बातमी प्राप्त होत आहे. या बातमीने शिरुर परिसरात खळबळ उडाली आहे. शिरुर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेला आज मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. Mafedron हा बेकायदेशीर अम्मली पदार्थ आहे. त्याची नशा काही लोक करतात. ती प्राणघातक ठरु शकते. तरी कोनतेही नैतिकतेचे भान न ठेवता याची विक्री करुन पैसा कमवणारी प्रवृत्ती समाजात आहे. हे वास्तव समाजाला व्यथीत करणारे आहे.पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, शिरूर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत MD Drug Seizure Shirur अंतर्गत मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.Mephedrone म्हणजे काय हे जाणून घ्या: https://en.wikipedia.org/wiki/Mephedrone) स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित बालक शिरूर बायपास येथील बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेलजवळ अमली पदार्थ विक्रीसाठी येणार होता. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून 6.94 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत अंदाजे ₹1,38,800 इतकी आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 321/26 अन्वये NDPS Act कलम 8(क), 21(ब) तसेच BNS कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.NDPS Act बद्दल सविस्तर माहिती : https://www.indiacode.nic.in/handle/123456789/1867) ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे तसेच शुभम चव्हाण, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर आणि नीरज पिसाळ यांनी सहभाग घेतला.या MD Drug Seizure Shirur कारवाईमुळे शिरूर परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Drug abuse awareness बद्दल अधिक माहिती: https://socialjustice.gov.inअधिक Shirur Crime News वाचा:Shirur Crime Savindane Firing Incident: परवानाधारक पिस्टलचा गैरवापर, तिघांवर गुन्हा दाखलShirur Crime News MIDC : राजगणगाव MIDC मध्ये महिला व्यावसायिकाची मारहाण, पोलिसांत तक्रारShirur Crime News: धोकादायक गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई, अकोला कारागृहात स्थानबद्धAbout The Author Dr.Nitin Pawaradministratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Education News: सरकारी शाळा वाचवा अभियानांतर्गत पद नियुक्ती कार्यक्रम उत्साहात शिरूरमध्ये महिला विनयभंग प्रकरण : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल