Shirur Crime: शिरूरमध्ये बेकायदेशीर दारूवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. याबाबत 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सविस्तर वाचा … शिरूर, पुणे | 26 एप्रिल 2026 Shirur Crime जगताची हवा टाईट केली गेली आहे.विशेषतः बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू बनवणारे, विक्री करणारे यांच्यावर शिरुर पोलिसांनी गेम साधला आहे.शिरूर तालुक्यात बेकायदेशीर दारूविक्री आणि हातभट्टीवर शिरुर पोलिसांनी मोठी कारवाई करत सलग 6 गुन्हे दाखल केले असून विविध ठिकाणांहून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Contents1 कारवाईचा आढावा—1.1 1) आंधळगाव कारवाई-1.2 2) येवले माथा (अण्णापुर)1.3 3) अण्णापुर मोठी कारवाई1.4 4) आंबळे गाव1.5 5) चांडोह पुल परिसर1.6 6) चांडोह (मोठा साठा जप्त)2 एकूण कारवाईचा परिणाम—3 पोलीस प्रशासनाची भूमिका3.1 स्थानिकांमध्ये चिंता4 विश्लेषण—5 निष्कर्ष—-5.1 • Special Shirur Crime वाचा—5.2 About The Author5.2.1 Dr.Nitin Pawar5.3 ❤️ Support Satyashodhak Blog कारवाईचा आढावा— शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने 24 एप्रिल 2026 रोजी विविध ठिकाणी छापे टाकून खालील कारवाया केल्या: 1) आंधळगाव कारवाई- • आरोपी: सचिन अनिल पवार (वय 29) • जप्त माल: विदेशी व देशी दारू (एकूण 2,150 रु.) • गुन्हा: महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) 2) येवले माथा (अण्णापुर) • आरोपी: प्रतिक पांडुरंग पवार (वय 22) • जप्त माल: 5 लिटर हातभट्टी दारू (500 रु.) • गुन्हा: कलम 65(ई) 3) अण्णापुर मोठी कारवाई • आरोपी: किरण चौगुले व मंगलाबाई चौगुले • जप्त माल: • 40 लिटर कच्चे रसायन • 35 लिटर तयार दारू • भट्टी साहित्य • एकूण किंमत: 5,600 रु. आरोपी पोलिसांना पाहून फरार 4) आंबळे गाव • आरोपी: छबु पवार व गणेश पवार • जप्त माल: 31 लिटर हातभट्टी दारू (3,100 रु.) 5) चांडोह पुल परिसर • आरोपी: भानुदास गाडगे • जप्त माल: 60 लिटर हातभट्टी दारू (3,000 रु.) आरोपी घटनास्थळावरून पळून गेला 6) चांडोह (मोठा साठा जप्त) • आरोपी: देविदास उर्फ रामदास शिंदे (वय 42) • जप्त माल: • विदेशी व देशी दारूचा मोठा साठा • विविध ब्रँड्स (बिअर, व्हिस्की, वोडका) • एकूण किंमत: 19,900 रु. एकूण कारवाईचा परिणाम— • एकूण 6 गुन्हे दाखल • हजारो रुपयांचा दारू साठा जप्त • काही आरोपी अटक, काही फरार, तर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई पोलीस प्रशासनाची भूमिका ही कारवाई पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विविध पोलीस अंमलदारांनी यात सहभाग घेतला. स्थानिकांमध्ये चिंता या घटनांमुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांमधे बेकायदेशीर दारू विक्री वाढल्याची चर्चा,तरुणांमध्ये व्यसन वाढण्याची भीती,पोलिसांनी कारवाई तीव्र करण्याची मागणी करणारा सुर निघत आहे. विश्लेषण— सलग 6 गुन्हे उघडकीस आल्याने गावपातळीवर हातभट्टी नेटवर्क सक्रिय असल्याचे स्पष्ट होते. ते सर्रास कार्यरत आहे.काही ठिकाणी पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त होणे गंभीर बाब ठरत आहे. आणखीन किती तरी मोठ्या प्रमाणात हा,’गोरख धन्दा‘ सुरु आहे. असे नागरिक कुजबुजत आहेत. निष्कर्ष—- शिरूर तालुक्यातील ही कारवाई महत्त्वाची असली तरी बेकायदेशीर दारूचा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही. पोलिसांनी सातत्याने अशाच कारवाया केल्यासच या व्यवसायावर आळा बसू शकतो. • महाराष्ट्र दारूबंदी कायद्याची माहिती: https://mahapolice.gov.in/ • भारतीय कायदे (IPC / Prohibition Act संदर्भ): https://indiacode.nic.in/ • महाराष्ट्र पोलीस अधिकृत वेबसाईट: https://mahapolice.gov.in/ • Special Shirur Crime वाचा— Shirur Crime Drugs News : मोठी बातमी? शिरूरमध्ये अमली पदार्थ प्रकरण उघड; तिघांना अटक, 21.52 लाखांचा मुद्देमाल जप्त! Shirur Crime News: धोकादायक गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई, अकोला कारागृहात स्थानबद्ध Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Crime Drugs News : मोठी बातमी? शिरूरमध्ये अमली पदार्थ प्रकरण उघड; तिघांना अटक, 21.52 लाखांचा मुद्देमाल जप्त! Ranjangaon Police Traffic Action: 28 वाहनावर कालरवाई ,₹45,000 दन्ड वसुल!