दक्षिण भारतातील निवडणूक 2026 निकालांवर आधारित “निकालांचा महोत्सव” ही राजकीय आणि सामाजिक आशय असलेली मराठी कविता — डॉ. नितीन पवार.
Contents
निकालांचा महोत्सव- उत्सवप्रियतेत विश्लेषण जाते विसरून..
12 मे 2026
(तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ निवडणुकांवर एक उपरोधिक मराठी कविता)
निकालांचा महोत्सव 2026 दक्षिण भारत विविध विधानसभा निकाल विविध राज्ये वृत्तांत असा—-
निवडणूक निकालांचा महोत्सव झाला सुरु!टीव्हीवर पुन्हा युद्ध सुरू अर्थात वाक् युद्ध!,हे फक्त वातानुकुलीत जागेत बोलू शकतात!कधी शेतात, गरीब वस्त्यात नाही दिसणार,
पण यावेळी ‘बॉम्ब”मासाईल्स नव्हे तर —“एक्झिट पोल” जणु आण्विक भस्मासुर !अँकर ओरडत होते घसा फोडून आणि तोडून ,
त्याचा पुरेपूर मोबदला मिळतो म्हणे त्याला!
“देश वाचणार की जाणार मोडून?”अवघड प्रश्न |तामिळनाडूत ढोल वाजत होते,पोस्टरवर नेते हसत होते.नेहमीचे टिपीकल स्मित,
एक नेता म्हणे —
“जनतेने विकास पहिला अजेंडा !”दुसरा म्हणे —“नाही! त्यांनी फक्त मोफत चा स्वाद घेतला!”
चेन्नईच्या रस्त्यावर चहा उकळत होता,
पण WhatsApp वर प्रत्येक जण “राजकीय विश्लेषक” झाला होता.पण पोपटपन्छी , मिडीयाने बोलका बनवलेला,
निकालांचा महोत्सव ओळीन्च्या मधला आणि मागिल अर्थाशी अनभिज्ञ!
एका काकांनी आत्मविश्वासात सांगितलं —“मी कालच निकाल ओळखला!” शेजारी म्हणाला —“मग शेअर मार्केट का नाही पकलं?”एक म्हणाला- मी तो मशीन आल्यापासूनच ओळखला आहे!
पश्चिम बंगालमध्ये वेगळंच दृश्य,प्रत्येक भिंतीवर राजकारणाचं चित्र विचित्र.कोणी “खेळा होबे” ओरडत होतं,कोणी “परिवर्तन” विकत होतं.
दिदीना खात्री होतीच?
कोलकात्याच्या पावसात पोस्टर भिजले,पण नेत्यांचे वाद अजूनही ताजे दिसले.एक कार्यकर्ता छाती ठोकून म्हणाला —“जनता आमच्यावर प्रेम करते!”पाठीमागून बायको ओरडली —
“आधी घरी गॅस भरून आण रे बाबा प्रेमवाल्या !”
केरळमध्ये मात्र वातावरण वेगळं,कॉफी, चर्चा आणि राजकारण अखंड चाललेलं.प्रत्येक ऑटोवाला अर्थतज्ज्ञ झाला,
डावा अर्थतज्ञ त्याच्या पिढीजात रक्ताच,
प्रत्येक मासेवाला जागतिक विश्लेषक झाला.एका वृद्धाने शांतपणे सांगितलं —“इथे सरकार बदलो किंवा न बदलो…पावसात छत्री मात्र लागतेच.” टीव्ही स्टुडिओत अँकर मर्कट उड्या मारत होते,
जणू निवडणूक नव्हे IPL चालू होते.
“BIG BREAKING!”“SUPER EXCLUSIVE!”“DEMOCRACY SHOCK!”इतकं ओरडले की शेवटीमाईकनेच राजीनामा दिला.दिल्लीत नेते हिशेब मांडत होते,
कोणी EVM वर संशय घेत होते,
तर कोणी विजयाच्या मिरवणुकीत DJ शोधत होते.एका पक्षाचा नेता म्हणाला —“जनतेने विकासाला मत दिलं!”दुसरा लगेच म्हणाला —“नाही, त्यांनी धर्माला मत दिलं!”
तिसरा शांतपणे म्हणाला —“सर, त्यांनी फक्त राग काढला.”तर एक म्हणाला- मशीन बदला, तोपर्यंत निकाल खराच नाही मानणार!
दरम्यान सामान्य जनता?
ती अजूनही पेट्रोलचे दर पाहत होती.महागाईशी आट्यापाट्या खेळच होती.नोकरीच्या वेबसाइट refresh करत होती.वीज बिलाकडे बघून ध्यान करत होती.
एका बेरोजगार तरुणाने हसत विचारलं —
“निकाल लागले…आता माझी job notification पण येईल का?”सगळे शांत.एका शेतकऱ्याने टीव्ही बंद केला,
आणि म्हणाला —
“पाऊस वेळेवर पडला तर तोच खरा निकाल.”सोशल मीडियावर memes फुटले,पराभूत नेते motivational quotes टाकू लागले.
“लोकशाही जिंकली.”“जनतेचा कौल मान्य.“आम्ही आत्मपरीक्षण करू.”पण दोन दिवसांनी पुन्हा
त्याच जुन्या भांडणांची सुरुवात झाली.
चेन्नईपासून कोलकात्यापर्यंत,तिरुअनंतपुरमपासून दिल्लीपर्यंत,जनता एकच प्रश्न विचारत होती —
“निवडणूक संपली…
आता काम कधी सुरू होणार?”तेवढ्यात एका छोट्या मुलाने विचारलं —“आई, हे नेते रोज भांडतात का?”आई हसली आणि म्हणाली —“हो बाळा…कारण TV वर TRP आणि
राजकारणात Drama कधीच संपत नाही.”
आणि आकाशात कुठेतरीलोकशाही शांतपणे हसत होती.कारण तिला माहिती होतं —नेते येतात.नेते जातात.पोस्टर बदलतात.घोषणा बदलतात.
पण चहाच्या टपरीवरचं राजकारण विश्लेषण कधीच संपत नाही. बिन बुडाचे गाडगे! ☕
मराठी कविता प्रकारांविषयी 5 FAQs खास आमच्या वाचकासाठी—
1. मराठी कवितेचे प्रमुख प्रकार कोणते आहेत?
मराठी कवितेत भावकविता, अभंग, ओवी, गझल, मुक्तछंद, चारोळी, पोवाडा, शौर्यगीत, भक्तीगीत आणि सामाजिक कविता असे अनेक प्रकार आढळतात. प्रत्येक प्रकाराची शैली, लय आणि विषय वेगळा असतो.
2. मुक्तछंद कविता म्हणजे काय?
मुक्तछंद कविता ही ठराविक वृत्त, यमक किंवा छंदाशिवाय लिहिली जाणारी कविता आहे. यात कवीला विचार आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असते.
3. अभंग आणि ओवी यात काय फरक आहे?
अभंग हा मुख्यतः भक्तीपर काव्यप्रकार असून संत साहित्याशी संबंधित आहे. ओवी हा लोककाव्याचा प्रकार असून स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, श्रम आणि भावना यातून व्यक्त होतात.
4. गझल लिहिताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात?
गझलमध्ये काफिया, रदीफ, मतला आणि मकता यांसारखी रचना महत्त्वाची असते. प्रत्येक शेर स्वतंत्र अर्थपूर्ण असतो, पण संपूर्ण गझल एकाच भावविश्वाशी जोडलेली असते.
5. चारोळी लोकप्रिय का आहे?
चारोळी हा चार ओळींचा छोटा पण प्रभावी काव्यप्रकार आहे. कमी शब्दांत गहन भावना व्यक्त करता येत असल्याने सोशल मीडिया आणि आधुनिक लेखनात तो खूप लोकप्रिय झाला आहे.
आणखीन सत्यशोधक कविता वाचा—
Mother’s Day 2025 : प्रत्येक ;आईसाठी एक खास दिवस!
