27 मे 2026 Shirur Missing Woman Case 2026 प्रमाणे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चिंचणी गावातून एक 25 वर्षीय विवाहित असलेली महिला बेपत्ता झाल्याची नोंद शिरूर पोलीस स्टेशन मधे करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिरुर व परिसरात चिंता व्यक्त होत आहे.शिरुर पोलिसांनी सदर प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे शिवाजी महाराज vs टिपू सुलतान तुलना का नको? | ऐतिहासिक विश्लेषण Contents 1 Shirur Missing Woman Case 2026 नुसार शिरूरमधुन 25 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू2 महिलेचे वर्णन असे—3 शिरुर पोलिसांकडून तपास सुरू—4 नागरिकांनी काय करावे?5 FAQ:नेहमी विचारले जाणारे प्रश्न—5.1 आणखीन ‘सत्यशोधक’ बातम्या वाचा—5.2 About The Author5.2.1 Dr.Nitin Pawar5.3 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Missing Woman Case 2026 नुसार शिरूरमधुन 25 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू Shirur Missing Woman Case 2026 : नेमके काय घडले? ते सविस्तर पाहू.Shirur Missing Woman Case 2026 मधे मिळालेल्या माहितीनुसार शिरुर तालुक्यातील चिंचणी गावात राहणारी एक महिला 25 मे 2026 रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान घरातून गायब झाली आहे. ती कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे. सुरवातीला तिचा शोध कुटुंबीयांनी परिसरात घेतला. मात्र तिचा शोध लागला नाही.अखेर शिरूर पोलीस ठाण्यात या घटनेची मिसिंग म्हणून नोंद करण्यात आली आहे. महिलेचे वर्णन असे— • वय : 25 वर्षे • उंची : सुमारे 5 फूट • शरीरयष्टी : मध्यम • वर्ण : सावळा • कपडे : पांढरा पंजाबी ड्रेस, लाल रंगाचे जॅकेट • इतर ओळख : डाव्या पायाच्या पोटरीवर महादेव नाव गोंदलेले आहे. शिरुर पोलिसांकडून तपास सुरू— या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक 76/2026 अंतर्गत नोंद करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. नागरिकांनी संबंधित महिलेबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलीस स्टेशन शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Modi Vs Pawar : ‘भटकता आत्मा ‘ हे श्री.नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आणि श्री.पवारांचा प्रतिहल्ला: एक विश्लेषण! नागरिकांनी काय करावे? अशा प्रकारच्या घटना दिसल्यास किंवा बेपत्ता व्यक्ती दिसल्याची माहिती किंवा शन्का असल्यास त्वरित जवळच्या स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी. वेळेवर दिलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षित शोधात महत्त्वाची ठरू शकते.कदाचित कुणाचा तरी प्राणही वाचवू शकते. FAQ:नेहमी विचारले जाणारे प्रश्न— 1. महिला कोणत्या गावातील आहे? उत्तर: चिंचणी, ता. शिरूर, जि. पुणे. 2. घटना कधी घडली? उत्तर: 25 मे 2026 रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान. 3. पोलिसांनी काय कारवाई केली? उत्तर: मिसिंग नोंद करून तपास व शोधमोहीम सुरू केली आहे. 4. नागरिकांनी काय करावे? उत्तर: माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आणखीन ‘सत्यशोधक’ बातम्या वाचा— Shirur Crime News Gharfodi: शिरूरमध्ये बंद घरफोडी : गुजरमळा भागातून 62,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला Shirur Crime News MIDC : राजगणगाव MIDC मध्ये महिला व्यावसायिकाची मारहाण, पोलिसांत तक्रार Shirur Crime Breaking ; शिरूर तालुक्यात क्रिकेट स्पर्धेतून वाद; पिस्तुलातून फायरिंग, 7 जणांवर गुन्हा About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Liquir Raid News Shirur : शिरुर पोलीसाचा तालुक्यात ‘धुम धडाका’ सुरुच!