IMG 20260601 WA0545 1

Breaking News Firing Shirur चित्तथरारक!अनेक प्रश्न?

शिरूर, दि. 1 जून 2026

Breaking Nrews Firing Shirur पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सरदवाडी हद्दीत आज सायंकाळी झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार राजस्थान ढाब्यासमोर दोन वाहनांमध्ये धडक घडवून आणली गेली. नन्तर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यात विशाल काळे ठार झाला आहे. हा रेकार्ड वरील गुन्हेगार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटा टायझर (MH 12 XQ 5104) या कारमधून उमेश अनिल जगदाळे,वय- 26 वर्ष, केदार झाडगे विशाल काळे हे तिघेजण न्हावरा बाजूकडून शिरूरकडे येत होते. त्यावेळी किया सोनेट (MH 14 LA 1128) या कारने त्यांच्या वाहनास धडक दिली.

त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी टायझर कारच्या पुढील काचेवर अंदाजे चार राऊंड फायर केले केल्याची माहिती समोर आली आहे.

गोळीबारानंतर तिघेही कारमधून उतरून पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी पुन्हा त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.

या घटनेत विशाल काळे, वय – 30, राहणार-शिरूर याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा देखील आढळल्या आहेत. घटनास्थळी दोन रिकामी काडतुसे तसेच अनेक मोठे दगड आढळून आले आहेत.

दुसरा जखमी केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश अनिल जगदाळे हा घटनास्थळावरून पळून गेला होता.

मात्र सध्या तो पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

आरोपी सनी यादव,राहणार- बकोरी फाटा, वाघोलीआणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृत विशाल काळे आणि संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. अधिकृत माहिती आल्यानंतर पुढील अपडेट दिले जातील.

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support