4 June 2026, शिरूर, पुणे Shirur Murder Case 2026 : शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या विशाल काळे गंभीर खून प्रकरणात शिरुर पोलिसांनी मोठी कारवाई करत यश मिळवले आहे. सात आरोपींना अटक 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी! Contents 1 Shirur Murder Case 2026 Update: विशाल काळे खुन प्रकरणी 7 अटकेत–2 शिरूर पोलीसाना यश–3 आरोपींची नावे–4 9 जून 2026 पर्यंत पोलीस कस्टडी—5 चिंतेचे वातावरण कायम–5.1 अधिक माहितीसाठी links —5.2 आणखीन ‘सत्यशोधक’ बातम्या —5.3 About The Author5.3.1 Dr.Nitin Pawar5.4 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Murder Case 2026 Update: विशाल काळे खुन प्रकरणी 7 अटकेत– विशाल काळे खुन प्रकरणाचा तपास सुरू असताना शिरुर पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे .त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्व आरोपींना दिनांक 09 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती शिरूर पोलिस सुत्रानी दिली. शिरूर पोलीसाना यश– शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 509/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103, 109, 126(2), 191(2), 191(3), 190, 252, 324(4) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) व 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे— आरोपींची नावे– 1.इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पन्दी,वय -24, राहणार,वाघोली, तालुका-हवेली, जिल्हा-पुणे 2.अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, वय -26 वर्ष, राहणार- बकुरी फाटा, गाडेवस्ती, वाघोली, पुणे 3.सिद्धार्थ उर्फ बाल्या तुकाराम शिंदे,वय- 21, राहणार,बाबुरावनगर, शिरूर 4.पांडुरंग बालाजी कांबळे,वय- 26 वर्ष, राहणार-रामलिंग रोड, शिरूर 5.आदित्य दीपक कांबळे,वय- 19 वर्ष, राहणार, वाघोली, पुणे 6.देवानंद शिवाजी चव्हाण,वय- 27 वर्ष, राहणार-मारुती आळी, शिरूर 7.अभिषेक उर्फ घ्या हनुमान मिसाळ, वय -25 वर्ष, राहणार- सोनार आळी शिरूर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले. 9 जून 2026 पर्यंत पोलीस कस्टडी— सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता लक्षात घेऊन आरोपींना 9 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनमार्फत सुरू असून, गुन्ह्यामागील कारणे, आरोपींची भूमिका तसेच इतर संबंधित बाबींचा सखोल तपास केला जात आहे. चिंतेचे वातावरण कायम– शिरूर परिसरात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहितीसाठी links — 👉Maharashtra Police Official Website mahapolice.gov.in 👉Maharashtra State Police Ministry of Home Affairs – New Criminal Laws mha.gov.in 👉Ministry of Home Affairs Bharatiya Nyaya Sanhita (Official PDF) mha.gov.in Ministry of Home Affairs आणखीन ‘सत्यशोधक’ बातम्या — Shirur Crime News : शिरूरमधील गुन्हेगारीच्या ताज्या बातम्या | Satyashodhak News Breaking News Firing Shirur Case : विशाल काळे व माजी नगरसेवक महेंद्र मल्लाव! अपडेटस काय पुढे येत आहेत? Amreen Tariq Mirza Missing Pune – शिरूर पोलीस शोध सुरू About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन ‘Red Alert’ Bangladeshi Prostitutes in MIDC? : बांगलादेशी महिला वेश्या रांजणगाव MIDC त?