Beer News Kawathe : कवठे यमाई (ता. शिरूर) परिसरात बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलिसांनी कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Contents1 Beer News Kawathe : कवठे यमाई मधे बेकायदा बिअर?1.1 About The Author1.1.1 Dr.Nitin Pawar1.2 ❤️ Support Satyashodhak Blog Beer News Kawathe : कवठे यमाई मधे बेकायदा बिअर? कवठे यमाई (ता. शिरूर) परिसरात बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलिसांनी कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 जून 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हॉटेल विसावा परिसराच्या पाठीमागील बाजूस हेमंत अशोक देटके (वय 39) हे बेकायदा मद्यविक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी किंगफिशर बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या तीन बाटल्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत सुमारे 600 रुपये आहे. पंचांसमक्ष जप्तीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून नमुना बाटलीही तपासासाठी राखून ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार विकी पंडीत मैंद यांनी फिर्याद दिली असून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 528/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Rural Crime : कुरुळीत गावठी दारू विक्री करताना इसम पोलिसांच्या जाळ्यात Shirur Nhavare Crime : न्हावरे येथे गावठी दारू जप्त; महिला पोलिसांना चकवा देऊन पसार