Beer News Kawathe

Beer News Kawathe : कवठे यमाई (ता. शिरूर) परिसरात बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलिसांनी कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Beer News Kawathe : कवठे यमाई मधे बेकायदा बिअर?

कवठे यमाई (ता. शिरूर) परिसरात बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलिसांनी कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 जून 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हॉटेल विसावा परिसराच्या पाठीमागील बाजूस हेमंत अशोक देटके (वय 39) हे बेकायदा मद्यविक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.

कारवाईदरम्यान पोलिसांनी किंगफिशर बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या तीन बाटल्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत सुमारे 600 रुपये आहे. पंचांसमक्ष जप्तीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून नमुना बाटलीही तपासासाठी राखून ठेवण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार विकी पंडीत मैंद यांनी फिर्याद दिली असून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 528/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत.

Read more —-

Shirur motorcycle theft: शिरूर तालुक्यात घरासमोरील मोटारसायकल चोरी!

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.