Shirur Nhavare Crime : न्हावरे येथील बाजारतळ परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी कारवाई करत 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र संशयित महिला पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाली. 7 जुन 2026 Shirur Nhavare Crime : गावठी दारू जप्त; महिलेचा पोलिसांना चकवा? शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील बाजारतळ परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी कारवाई करत 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र संशयित महिला पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाली. दि. 7 जून रोजी सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास न्हावरे बाजारतळ परिसरात वैजयंता दादाभाऊ गव्हाणे या महिला गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी महिला घटनास्थळावरून पळून गेली. घटनास्थळी 6 लिटर गावठी हातभट्टीची दारू असलेला कॅन जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार राजाराम शेटीबा गायकवाड यांनी फिर्याद दिली असून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 527/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रेपोसी बनकर करीत आहेत. Read more — Shirur Farm Boundary Dispute | शिरूरमध्ये बांधाच्या वादातून रक्तरंजित संघर्ष Shirur Farmer Suicide Case : शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या? ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Beer News Kawathe : कवठे येमाईत बेकायदा बियर? Shirur Rural Crime : उरळगाव येथे 14 लिटर गावठी दारूसह एकाला अटक