Shirur Weekly Market Police Patrol during security patrol at Shirur Market Yard on 27 June 2026शिरूर मार्केट यार्डातील आठवडे बाजारात पोलीसांनी विशेष पेट्रोलिंग करून नागरिकांशी संवाद साधला तसेच बाजार परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

Shirur Weekly Market Police Patrol कारवाई मधे आठवडे बाजारात विशेषतः शनिवारी आज शिरुर पोलीसानी पेट्रोलिंग केले.वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बातमीत सविस्तर वाचा….

शिरूर, प्रतिनिधी, 27 जुन 2026

 

Shirur Weekly Market Police Patrolling कारवाई अंतर्गत शनिवारी,दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 10.30 ते 11.10 या वेळेत शिरूर शहरातील मार्केट यार्ड येथे भरलेल्या आठवडे बाजारात शिरुर पोलीसांनी विशेष पेट्रोलिंग केले. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

Shirur Weekly Market Police Patrol:श्रीगोंदा, पारनेर, शिरुर तीन तालुक्यातील शेतकरी व ग्राहकांची असते मोठी सन्ख्या

दर शनिवारी भरणाऱ्या या आठवडे बाजारात शिरूर शहरासह परिसरातील नागरिक तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी-विक्रीसाठी येत असल्याने बाजार परिसरात मोठी गर्दी असते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलीस वेळोवेळी अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असतात.

बाजार परिसरात व्यापक गस्त

मोबाईल चोरी, दागिने चोरी, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे टाळण्यासाठी अधिकारी व पोलीस अंमलदारांनी बाजार परिसरात व्यापक गस्त घातली. यावेळी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला.त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

प्राप्त सूचना व समस्यांबाबत आवश्यक उपाययोजनांसाठी मार्केट यार्ड प्रशासनाला लेखी पत्राद्वारे कळविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिल्म लावलेली वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने, वाहन चालविण्याचा परवाना नसलेले वाहनचालक मुख्य लक्ष–

यानंतर सकाळी 11.00 ते 11.30 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे विशेष नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान ब्लॅक फिल्म लावलेली वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने, वाहन चालविण्याचा परवाना (Driving Licence) नसलेले वाहनचालक तसेच विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Advertisement
Advertisement

वाहतूक नियम, नागरिकांसाठी सुरक्षा टिप्स आणि पोलीस सेवांबाबत अधिक माहितीसाठी—

mahapolice.gov.in

https://reference-url-citation.invalid/

महामार्ग वाहतूक सुरक्षेसाठी

highwaypolice.maharashtra.gov.in

https://reference-url-citation.invalid/

तसेच ई-चलान तपासणी व भरण्यासाठी

mahatrafficechallan.gov.in

https://reference-url-citation.invalid/

या अधिकृत संकेतस्थळांना वाचक भेट देऊ शकतात.

Shirur Weekly Market Police Patrol मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हे प्रतिबंधित करणे आणि बाजार परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करणे या उद्देशाने राबविण्यात आली.

आणखीन बातम्या वाचा—

Shirur Crime News Gharfodi: शिरूरमध्ये बंद घरफोडी : गुजरमळा भागातून 62,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला

MD Drugs Shirur : शिरूर तालुक्यात ;मेफेड्रॉन प्रकरणा;ची मोठी चर्चा

Shirur Illegal Liquor Raid : शिरूर तालुक्यात पोलीस ;सिंघम; मोडवर !गावठी व विदेशी दारूचा वाल्यांवर;कहर; बरसला!

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

You missed