Shirur Missing Woman Case: मोराची चिंचोली येथील 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता, शिरूर पोलिसांकडून शोध सुरूशिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; शिरूर पोलिसांनी नागरिकांना माहिती
Advertisement
Advertisement

Shirur Missing Woman Case घटनेत शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील एक 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सविस्तर बातमी पुढे वाचा….

शिरूर, दिनाक, 30 जुन 2026

Shirur Missing Woman Case घटनेत शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील एक 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची नोंद शिरूर पोलीस स्टेशन मधे करण्यात आली आहे.

या प्रकरणी मिसिंग क्रमांक 101/2026 दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.

Shirur Missing Woman Case : महिला 23 वर्षीय विवाहिता

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता योगेश नानेकर,वय- 23 वर्ष या दिनाक 27 जून 2026 रोजी घरातून कोणालाही न सांगता बाहेर गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर त्या घरी परतल्या नसल्याने त्यांच्या पतीने शिरूर पोलीस स्टेशन मधे कायदेशीर तक्रार दिली आहे.

Shirur Missing Woman Case : रात्री घरी परतल्यानंतर घराचे दार उघडे..

तक्रारदार योगेश विलास नानेकर, वय- 27 वर्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नेहमीप्रमाणे कामासाठी कंपनीत गेले होते. रात्री घरी परतल्यानंतर घराचे दार उघडे दिसले. असे चित्र दिसल्याने ते घाबरले.

त्यांची एक वर्षांची मुलगी घरात झोपलेली होती.मात्र पत्नी निकिता या घरी आढळून आल्या नाहीत.त्यानी परिसरात शोध घेतला.तसेच त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मोबाईल बंद असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांत मिसिंगची नोंद करण्यात आली.

Shirur Missing Woman Case : महिलेचे वर्णन—-

• नाव : निकिता योगेश नानेकर

वय : 23 वर्षे

उंची : सुमारे 5 फूट

रंग : काळासावळा

भाषा : मराठी व हिंदी

अंगावर : राखाडी (ग्रे) रंगाचा टी-शर्ट, काळी पँट, गळ्यात मणीमंगळसूत्र, कानात झुमके,पायात काळ्या रंगाच्या सँडल

या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मुंडे करीत आहेत.

नागरिकांना आवाहन :

Shirur Missing Woman Case महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा शिरूर पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

«टीप : ही बातमी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मिसिंग नोंदीवर आधारित आहे. सदर महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा अन्य निष्कर्ष नोंदविण्यात आलेला नाही.»

Read more>>>>

Shirur Missing Woman Case 2026 : शिरूरमधून 25 वर्षीय महिला बेपत्ता?

Missing Girl News : शिरूर येथे १९ वर्षांची तरुणी बेपत्ता !

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support