Ranjangaon MIDC Motorcycle Theft : रांजणगाव MIDC पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली.रांजणगाव MIDC पोलिसांची कारवाई; मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत, चोरीची मोटारसायकल जप्त.

शिरूर | 23 जुलै 2026:

Ranjangaon MIDC Motorcycle Theft : रांजणगाव MIDC Motorcycle Theft प्रकरणाचा छडा लावण्यात रांजणगाव MIDC पोलीसांना यश मिळाले आहे.आरोपीला अटक करण्यात आली आहे.चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

Ranjangaon MIDC Motorcycle Theft प्रकरणाचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली हिरो होंडा डिलक्स (MH 23 BJ 5836) मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी रांजणगाव येथील महागणपती पार्किंगमधून राजेंद्र गोतीराम जाधव (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांची हिरो होंडा डिलक्स मोटारसायकल चोरीस गेली होती. या प्रकरणी १८ जुलै २०२६ रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने २५ ते ३० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच तांत्रिक तपास केला. तपासादरम्यान शंकर भगवान गोसावी (वय ३८, रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव) याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्याला २२ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची कोठडी घेऊन आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड आणि पोलीस हवालदार अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस हवालदार अजित पवार करीत आहेत.

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.