Ranjangaon MIDC News 19 August 2026 Ranjangaon MIDC News : कारेगाव येथे दुप्पट पैशांचे आमिष दाखवून २० कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक; तीन आरोपींना अटकContents1. Ranjangaon MIDC News:भिशीच्या नावाखाली २० कोटींची फसवणूक?2. Ranjangaon MIDC News:शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील घटना3. Ranjangaon MIDC News:आरोपींची नावे आणि पोलिसांची कारवाई4. Ranjangaon MIDC News : पोलीसांकडून आवाहन4.1. About The Author4.1.1. Dr.Nitin PawarRanjangaon MIDC News:भिशीच्या नावाखाली २० कोटींची फसवणूक?भिशीच्या नावाखाली पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.Ranjangaon MIDC News:शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील घटनाकाय आहे प्रकरण? शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील ‘कारेश्वर भिशी मंडळ’ ही संस्था सरकारी कार्यालय, बँक किंवा धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत नव्हती.असे असूनही ही संस्था नोंदणीकृत असल्याचे भासवून आरोपींनी बेकायदेशीरपणे भिशी चालवली.“पैसे दुप्पट करून देतो” असे सांगून फिर्यादी बारकू चंदर सोनवणे (वय ५४, रा. चंदननगर, पुणे; मूळ रा. वाघाळे, ता. शिरूर) यांच्यासह एकूण ३९ नागरिकांकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात तब्बल २०,३४,६५,५०० रुपये उकळले.ही रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून नागरिकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.Ranjangaon MIDC News:आरोपींची नावे आणि पोलिसांची कारवाईया प्रकरणी खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे: १. सुलभा शरद नवले (वय ५०, रा. कारेगाव) – अटक २. नितीन शरद नवले (वय ३२, रा. कारेगाव) – अटक ३. सुहास शरद नवले (वय ३०, रा. कारेगाव) – अटक ४. अश्विनी नितीन नवले (रा. कारेगाव) ५. प्रतीक्षा सुहास नवले (रा. कारेगाव)दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांनी आरोपी सुलभा नवले, नितीन नवले आणि सुहास नवले यांना अटक केली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (घोडनदी, शिरूर) यांनी या तीन आरोपींना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड (पीसीआर) मंजूर केली आहे.Ranjangaon MIDC News : पोलीसांकडून आवाहनपोलीस आवाहन: सदर आरोपींनी अशाच प्रकारे भिशीच्या नावाखाली इतर कोणत्याही नागरिकांची फसवणूक केली असल्यास, त्यांनी आपल्याकडील पुराव्यांच्या कागदपत्रांसह रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. कुमार कदम यांनी केले आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. कुमार कदम करत आहेत.Read more》》》》Shirur Crime News : डोंगरगण येथे गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; २७ हजारांचा मुद्देमाल जप्तShirur Gramin News : शिरसगाव काटा येथे 37 वर्षीय तरुणाचा गळफास घेऊन मृत्यूAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Crime News : डोंगरगण येथे गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; २७ हजारांचा मुद्देमाल जप्त Marathi Language for Auto Drivers: महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी आवश्यक?