Advertisement25 August 2026 Shirur Crime Worker Cheated : मजुरांच्या नावाखाली १२ लाख ५० हजारांची फसवणूक!सविस्तर बातमी वाचा….शिरूर तालुक्यातील कोळपेवस्ती, मांडवगण फराटा येथील शेतकऱ्याची मजूर पुरवण्याच्या बहाण्याने १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.AdvertisementContents1. ●Shirur Crime Worker Cheated:विठ्ठल कोळपे फिर्यादी2. ●Shirur Crime Worker Cheated:ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे सांगितले!3. ●शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर3.1. About The Author3.1.1. Dr.Nitin Pawar●Shirur Crime Worker Cheated:विठ्ठल कोळपे फिर्यादीयाप्रकरणी बाबुराव विठ्ठल कोळपे (वय ३६, रा. कोळपेवस्ती, मांडवगण फराटा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश दल्नु चव्हाण आणि रोशन सुरेश चव्हाण (दोघे रा. हारसवाडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.●Shirur Crime Worker Cheated:ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे सांगितले!फिर्यादीनुसार, ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे सांगून आरोपींनी वारंवार पैशांची मागणी केली. त्यानुसार फोन पे, आरटीजीएस तसेच रोख स्वरूपात एकूण १२ लाख ५० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर मजूर देण्याचे आश्वासन देऊन फिर्यादीला आरोपींच्या गावात बोलावण्यात आले. मात्र, मजूर उपलब्ध नसल्याचे सांगत पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. वारंवार मागणी करूनही पैसे परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.Advertisement●शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टरयाप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७५९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत आहेत.●Read moreChetak E-Bike Theft in Shirur:शिरूरमध्ये चेतक ई-बाईकची चोरीShirur Drunk Driving Case : शिरुरमधे दारू पिउन वाहन चालवणे आता पडणार महागात!About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनChetak E-Bike Theft in Shirur:शिरूरमध्ये चेतक ई-बाईकची चोरी