Anand Nagari Sahakari Patsanstha Case :अखेर गुन्हा दाखल: बहुचर्चित आनंद नागरी सहकारी पतसंस्था शिरूर प्रकरणातील तक्रारदार आणि आरोपींचे प्रतीकात्मक चित्रशिरूरमधील बहुचर्चित आनंद नागरी सहकारी पतसंस्था प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Anand Nagari Sahakari Patsanstha Case मधे अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल ?आनंद नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा  प्रकरणात अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले आहे.बहुचर्चित असा हा घोटाळा शिरुर शहरात झाला होता. अनेक गरीब व श्रिमंतांचाही पैसा या पतसंस्थेत गुंतलेला होता.

1 June 2026 ( Updated)

Contents

Anand Nagari Sahakari Patsanstha Case : मधे अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल ?

शिरुर, दिनांक 10 जुलै : (डॉ.नितीन पवार ,संपादक )

Anand Nagari Sahakari Patsanstha Case मधे अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.आनंद नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा  प्रकरणात अखेर सुत्रधार अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले आहे.

” Anand Nagari Sahakari Patsanstha Case मधे सध्या काय चालले आहे? पुढे काय झाले? असा प्रश्न अनेकांना आहे. तर सध्या शहरात व अगदी पोलीस स्टेशन मधे यातील काही आरोपीचे फोटो लागलेले आहेत. लोक यावर हसतात. काही टिप्पणी करतात. आरोपी सापडलेले नाहीत.शोध सुरु आहे. असे सांगितले जाते. एवढेच!पोलीस व सरकारमधील यन्त्रणा अगदी परदेशात जाऊन ‘गेम’ करु शकतात. उदाहरणार्थ केनडा, पाकिस्तान ( धुरंधर?) इ. पण असे काही छोटे (?) आरोपी पकडू शकत नाहीत!मागे उत्तर प्रदेश मधे कथीत एनकाऊन्टर ( अतिक एहमद) च्या बेगमला विमानाने, हेलिकॉप्टर ने शोधले जात होते. पुढे काय झाले? माहित नाही!”

बहुचर्चित असा हा घोटाळा शिरुर शहरात झाला होता. अनेक गरीब व श्रिमंतांचाही पैसा या पतसंस्थेत गुंतलेला होता.

Dr.Nitin Pawar,Editor – satyashodhak.blog

Anand Nagari Sahakari Patsanstha Case मधे अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल ?आनंद नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा  प्रकरणात अखेर अभय चोरडियांसह 14 जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले आहे.बहुचर्चित असा हा घोटाळा शिरुर शहरात झाला होता. अनेक गरीब व श्रिमंतांचाही पैसा या पतसंस्थेत गुंतलेला होता.
डॉ.नितीन पवार,सम्पादक

‘सत्यशोधक न्यूज ब्लॉग ‘ ची याआधीची आवृत्ती ‘शिरुर वार्ता’ ने प्रथम काही महिन्यांपुर्वी या विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतर काही लोकांचे पैसे परत देण्याचे काम पतसंस्थेकडुन सुरु केले गेले होते. सर्वांचे पैसे परत मिळतील, अशी आशा सर्वांना होती.

परंतु तसे झाले नाही.त्यावेळेस सुद्धा फसवणुक झालेल्या असंख्य गुंतवणुकदारांची पोलिस मदत घेण्याची इच्छा होती.परंतु शहरातील काही प्रतिष्ठीत मान्यवरांनी समेट घडवत मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर तत्कालीन शिरुर वार्ता, न्युज पोर्टल ने हा विषय सबंधितांवर सोडला होता. नंतर आम्ही कधीच पुढुन किंवा मागच्या दाराने या विषयात कोनताही हस्तक्षेप केला नाही.तो आमचा प्रांत नाही.

पत्रकारिता हा आमचा धर्म आहे.पैसा हा नाही. नंतर ‘शिरुर वार्ता’ चे रुपांतर आम्ही ‘सत्यशोधक न्यूज ब्लॉग ‘ मधे केले.डोमेन बदलले,होस्टिंग बदलले .पण आमचे वाचक व वाचकांचा आमच्या वरचा विश्वास बदलला नाही. नवे नाव आम्ही धारण केले.

आमच्या वाचकांनी अपेक्षेपेक्षा कमी कालावधीत नव्या नावाशी आणि आमच्या ध्येय धोरणांशी जुळवून घेत आमची साथ सोडली नाही. आम्हाला ते अपेक्षितच होते.कारण आमचे कर्तव्य आम्ही पार पाडणार असा विश्वास आमच्या शिरुरसह महाराष्ट्र व डिजिटल दुनियातील आमच्या वाचकांना होता.

काही महिन्यांनतर हा विषय पुन्हा पुढे आला.तेव्हा आमच्या कर्तव्य्यांच्या बाबतीत तसुभरही न ढळता आम्ही या विषयाला पुन्हा वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.

आमचे व्यक्तीगत कुणाशीही काहीही वैर नाही. उलट शिरुरला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा मानस आहे.हे आम्ही स्पष्ट करतो.सर्व नागरिकांनी,ग्राहकांनी ,गुंतवणुकीदारांनी,कर्मचाऱ्यांनी ,प्रशासनाने हा प्रश्न शांतता व संयमाने सोडवावा,अशीच ‘सत्यशोधक न्युज’ ची इच्छा आहे. हे आम्ही स्पष्ट करत आहोत !

—– संपादक – डॉ.नितीन पवार, शिरुर.

Anand Nagari Sahakari Patsanstha Case : पतसंस्थेच्या संचालकांचे वारंवार फक्त आश्वासनच…

हा पैसा परत देण्याचे आश्वासन वारंवार अभय चोरडिया, संचालक  यांच्याकडुन देण्यात येत होते. लोकांनी संयम व धीर धरला होता.पण काही किरकोळ पैसा वगळता बहुतेकांचा विश्वासाने पतसंस्थेतील ठेवींमधील मिळाला नाही. परिणामी आज संचालक अभय चोरडरडियासह 14जणांवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आल्याने शिरुर तसेच पुणे येथील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. पतसंस्थांच्या क्षेत्रात देखील हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे अखेर चोरडिया परिवार जाणार तुरुंगात जाणार का ? अशी चर्चा राज्यभर पसरत आहे, असे समजते.

  1. दिनांक  31/12/2013 ते दिनांक  20/02/2020  या कालावधीमध्ये शिरुर, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शिरुर  या संस्थेमध्ये

    1) श्री. अभयकुमार पोपटलाल चोरडिया, संस्था अध्यक्ष /भागीदार

    2) श्री. प्रविण चंपालाल चोरडीया, भागीदार 3) श्री. मुरसलीन वहिंद मोहमद, भागीदार 4) श्री. सनी धरमचंद चोरडीया, भागीदार 5) सौ. सविता अभयकुमार चोरडिया, भागीदार

    6) सौ. सुजाता नितीन चोरडिया, भागीदार 7) सौ. प्रितम प्रविण चोरडिया, भागीदार

    8) श्रीमती पारसबाई पोपटलाल चोरडीया, भागीदार

    9) श्री. चंपालाल बुधमल चोरडिया, भागीदार

    10) श्री. सुरेंद्रकुमार रतनलाल चोरडिया, जामीनदार

    11) श्री. शांताराम गंगाधर देवकर, संस्था व्यवस्थापक

या व्यक्तींनी चाचणी लेखापरीक्षणानुसार संस्था कामकाजात निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी, अपहार, अफरातफर, गैख्यवहार, अनियमितता करुन संस्था सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघातं व फसवणूक केली आहे. तसेच

12) श्रीमती सरिता ब्रिजमोहन सिंह, सनदी लेखापाल
13) श्री. नागेंद्र एच. सोरटे, प्रमाणित लेखापरीक्षक
14) श्री. अजय एच. सोस्टे, प्रमाणित लेखापरीक्षक

संचालक व कर्मचार्यांचे संगनमत…

यांनी संगणमत करून वरील कालावधीत स्वताःच्या फायदयाकरीता आपल्या पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम ही स्वतःचे फायदयासाठी आपल्याच फर्मच्या नावे कर्जाचे वितरण करून ठेवीदारांच्या रु. 16,70,54,361 / – (अक्षरी रुपये सोळा कोटी सत्तर लाख चोपन्न हजार तीनशे एकसष्ट फक्त) एवढ्या रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे.

प्रमुख फिर्यादी संजयकुमार सखाराम पुंडे , वय – 56 वर्ष, व्यवसाय- शासकीय नोकरी , राहणार- 1103, जे – 2 टॉवर , लेजर टाऊन, अमनोरा फायरस्टेशन मागे, हडपसर, पुणे – 411028  हे आहेत.

अखेर गुन्हा दाखल ! 

आरोपींवर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 626/2024 म्हणुन वरील नमूद 14 लोकांच्या विरुद्ध  सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस सब इन्पेक्टर मुजावर हे डी वाय एस पी श्री. प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक श्री.जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

आता शिरुर पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सहकारी पतसंस्था आर्थिक गैरव्यवहार कायदा काय असतो?

महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांमध्ये सहकारी पतसंस्था या सामान्य नागरिकांच्या बचतीचे, आर्थिक गरजांचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते . शेतकरी, कामगार, लघु उद्योजक, निवृत्त कर्मचारी, मध्यमवर्गीय नागरिक आपल्या कष्टाने कमावलेली रक्कम पतसंस्थांमध्ये ठेव स्वरूपात गुंतवतात.

मात्र काही ठिकाणी व्यवस्थापनातील निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार किंवा फसवणुकीमुळे ठेवीदारांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी “सहकारी पतसंस्था आर्थिक गैरव्यवहार कायदा” व संबंधित कायदेशीर तरतुदी महत्त्वाच्या ठरतात.

सहकारी पतसंस्था म्हणजे काय?

सहकारी पतसंस्था ही त्या सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली सहकारी संस्था असते. सदस्यांकडून ठेवी स्वीकारणे, कर्ज वाटप करणे तसेच आर्थिक व्यवहार करणे ही तिची प्रमुख कामे असतात.

आर्थिक गैरव्यवहार म्हणजे काय?

जेव्हा पतसंस्थेचे पदाधिकारी किंवा कर्मचारी संस्थेच्या निधीचा चुकीचा वापर करतात, बनावट कागदपत्रे तयार करतात, नियमबाह्य कर्जवाटप करतात किंवा ठेवीदारांची फसवणूक करतात, तेव्हा त्याला आर्थिक गैरव्यवहार म्हणतात.

आर्थिक गैरव्यवहाराची सामान्य उदाहरणे–

  • बनावट कर्ज प्रकरणे तयार करणे
  • अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींना कर्ज दाखवणे
  • संस्थेच्या निधीचा वैयक्तिक वापर
  • खोटे लेखापरीक्षण अहवाल तयार करणे
  • ठेवीदारांची रक्कम परत न देणे
  • मालमत्तेची चुकीची खरेदी-विक्री
  • नियमबाह्य गुंतवणूक करणे
  • खात्यांमध्ये फेरफार करणे

कोणते कायदे लागू होतात?

1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960

महाराष्ट्रातील बहुतेक सहकारी संस्थांचे नियमन या कायद्यांतर्गत केले जाते. संस्थेचे व्यवस्थापन, लेखापरीक्षण, निवडणुका, कारवाईची प्रक्रिया या कायद्यात नमूद आहे.

2. भारतीय दंड संहिता (IPC) / भारतीय न्याय संहिता (BNS)

आर्थिक फसवणूक झाल्यास खालील प्रकारचे गुन्हे देखील लागू होऊ शकतात:

  • फसवणूक
  • विश्वासघात
  • अपहार
  • बनावट कागदपत्रे तयार करणे
  • कट रचणे

3. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा

शासकीय अधिकारी किंवा सार्वजनिक पदावरील व्यक्तींचा सहभाग असल्यास हा कायदा लागू होऊ शकतो.

4. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा

बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला पैसा लपवण्याचा प्रयत्न झाल्यास हा कायदा लागू होऊ शकतो.

चौकशी कोण करते?

  • सहकार विभाग
  • निबंधक, सहकारी संस्था
  • लेखापरीक्षक
  • आर्थिक गुन्हे शाखा (EOW)
  • स्थानिक पोलीस
  • राज्य शासन नियुक्त चौकशी समिती

गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होते?

  1. एफआयआर नोंदवला जातो.
  2. कागदपत्रे जप्त केली जातात.
  3. आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाते.
  4. संबंधित अधिकारी आणि संचालकांची चौकशी होते.
  5. आवश्यक असल्यास अटक केली जाते.
  6. न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते.

ठेवीदारांचे अधिकार

  • माहिती मिळवण्याचा अधिकार
  • तक्रार करण्याचा अधिकार
  • चौकशीची मागणी करण्याचा अधिकार
  • नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार
  • न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार

पतसंस्थेच्या संचालकांची जबाबदारी

संचालक मंडळावर संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची नैतिक,कायदेशीर जबाबदारी असते. निष्काळजीपणा किंवा जाणूनबुजून केलेला गैरव्यवहार सिद्ध झाल्यास त्यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी निश्चित होऊ शकते.

लेखापरीक्षणाचे महत्त्व

दरवर्षी होणारे लेखापरीक्षण संस्थेच्या आर्थिक आरोग्याचे परीक्षण करते. अनेक घोटाळ्यांमध्ये लेखापरीक्षणातील त्रुटी किंवा दुर्लक्ष हा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे.

गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाय

  • नियमित लेखापरीक्षण
  • व्यवहारांचे डिजिटल रेकॉर्ड
  • सदस्यांना माहितीचा अधिकार
  • पारदर्शक कर्जवाटप
  • मजबूत अंतर्गत नियंत्रण व्यवस्था
  • शासनाचे नियमित निरीक्षण

न्यायालयीन शिक्षेची तरतूद

गुन्ह्याच्या स्वरूपानुसार दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये मालमत्ता जप्त करण्याची कारवाईही केली जाऊ शकते.

समाजावर होणारे परिणाम

पतसंस्था घोटाळ्यांमुळे हजारो कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटते. वृद्धांचे आयुष्यभराचे संचय, शेतकऱ्यांची बचत, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास धोक्यात येतो. त्यामुळे अशा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.

निष्कर्ष

सहकारी पतसंस्था ही सहकार चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र व्यवस्थापनातील पारदर्शकता, नियमित लेखापरीक्षण आणि कठोर कायदेशीर कारवाई यांचा अभाव असेल तर आर्थिक गैरव्यवहार घडू शकतात. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे, दोषींना शिक्षा करणे आणि सहकार क्षेत्रावरील विश्वास टिकवून ठेवणे ही शासन, यंत्रणा आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

Free Links /Authoritative Sources-

1. Maharashtra Cooperative डिपार्टमेंट

https://sahakarayukta.maharashtra.gov.in/

(सहकारी संस्था व पतसंस्थांबाबत अधिकृत माहिती)

2. Maharashtra Police Citizen पोर्टल

https://citizen.mahapolice.gov.in/

(एफआयआर, तक्रारी व पोलिस सेवांसाठी अधिकृत पोर्टल)

3.Reserve Bank of India Financial Awareness

https://www.rbi.org.in/

(आर्थिक साक्षरता व गुंतवणूकदारांसाठी माहिती)

Read more इंटरेस्टिंग टॉपिकस >>>>

शिवाजी महाराज vs टिपू सुलतान तुलना का नको? | ऐतिहासिक विश्लेषण

Modi Vs Pawar : ‘भटकता आत्मा ‘ हे श्री.नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आणि श्री.पवारांचा प्रतिहल्ला:  एक विश्लेषण! 

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support