Contents1. महायुती चे उमेदवार म्हणून माऊली कटके 29 आक्टोंबर ला अर्ज भरणार !1.1. महायुती शिरुर हवेली विधानसभा निवडणूक पुर्ण ताकतीने लढणार! उद्या अर्ज भरणार !1.1.1. शिरुर,दिनांक 28 आ आक्टोंबर :1.1.1.1. (श्री.प्रकाश करडे यांच्याकडुन )1.1.2. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची असणार उपस्थिती. ..1.1.3. अजित दादांची सभा….1.1.4. महाराष्टातील सर्वात ऐतिहासिक, लक्षवेधी आणि थरारक लढत …. 1.1.5. केजरीवाल ,संजय सिंग स्टार प्रचारक!?…1.1.6. राष्ट्रीय समाज पक्ष देखील !1.1.7. About The Author1.1.7.1. Dr.Nitin Pawarमहायुती चे उमेदवार म्हणून माऊली कटके 29 आक्टोंबर ला अर्ज भरणार !महायुती शिरुर हवेली विधानसभा निवडणूक पुर्ण ताकतीने लढणार! उद्या अर्ज भरणार !शिरुर,दिनांक 28 आ आक्टोंबर :(श्री.प्रकाश करडे यांच्याकडुन )महायुती चे उमेदवार म्हणून माऊली कटके 29 आक्टोंबर ला अर्ज भरणार आहेत अशी माहिती मिळावी आहे.तसेच अर्थातच महायुती शिरुर हवेली विधानसभा निवडणूक पुर्ण ताकतीने लढणार हे स्पष्ट आहे.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची असणार उपस्थिती. ..शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा उमेदवारी अर्ज मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घड्याळ या चिन्हावर दाखल करणार आहे.अजित दादांची सभा….छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केट कमिटी, शिरुर येथून सकाळी ठीक ९ वाजता रॅली निघेल व ठीक ११ वाजता पाच कंदील चौक, शिरूर येथे सभेस सुरवात होईल तरी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली आहे.महाराष्टातील सर्वात ऐतिहासिक, लक्षवेधी आणि थरारक लढत …. महायुती विशेषता अजित दादा पवार व महाराष्टाचे महानेते शरदचंद्र पवार साहेब हे या निमित्ताने आमने सामने आहेत.महाभारतातील युद्धच जणु ! या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा या मतदार संघात पणाला लागली आहे.त्यामुळे दोन्ही बाजुंनी इथे विधानसभा निवडणूकीचे रणमैदान इथे ‘कुरुक्षेत्र’ बनले आहे. हे नवल वाटायला नको.महायुती व इंडिया आघाडी आमने सामने आहेत. शरदचंद्र पवार हे एका बाजुने तर अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अमित शहा दुसर्या बाजुने असे चित्र उभे राहिले आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाराष्टात ‘आप’ ले उमेदवार उभे केलेले नाहीत.केजरीवाल ,संजय सिंग स्टार प्रचारक!?…आप चे संभाव्य उमेदवार म्हणून नितीन पवार यांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते.पक्ष नेते अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयाचे पालन करुन नितीन पवार यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून श्री.अशोक पवार यांना पाठिंबा दिला आहे.स्वत: अरविंद केजरीवाल, संजय सिंग हे इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक म्हणुन शिरुर येथे शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत प्रचारात उतरणार आहेत.असे नितीन पवार यांनी सांगितले आहे.तर महायुती कडुन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे,अजित पवार हे बलाढ्य स्टार प्रचारक उपस्थित राहु शकतात.त्यामुळे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ निवडणुक 2024 ही ऐतिहासिक ठरणार आहे.राष्ट्रीय समाज पक्ष देखील !महादेव जानकर नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष पक्षाकडुन श्री.शिवाजीराव कुर्हाडे हे उमेदवार उभे राहिले असल्याने महादेव जानकर यांचीही शिरुर ल सभा होणार हे निश्चित!About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनमाईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल , कारेगाव येथे दिवाळी पार्टी व दीपोत्सवाचे अनोखे आयोजन ! बहुजन मुक्ती पार्टी चे नाथाभाऊ पाचर्णे ‘शिरुर हवेली’ विधानसभा निवडणूकीच्या मैदानात ! स्व. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे ते जवळचे नातलग !