महाराष्ट्रासाठी आता पहिली महिला मुख्यमंत्री पाहिजे आहे ! असे माझे ठाम मत आहे.महाराष्ट्रासाठी कोण व का पहिली महिला मुख्यमंत्री असु शकते तेही वाचायला आपल्याला या लेखात मिळेल.श्री.शरदचंद्र पवार : हेच ते करु शकतात!

‘घोडगंगा सहकारी साखर कारखान्या’ चा प्रश्न अखेर मा.श्री.शरदचंद्र पवार सोडवणार ? 

घोडगंगा बाबत मा.श्री शरद पवार यांनी मारले एका बाणात दोन पक्षी ?

शिरुर,दि.3 नोव्हेंबर: (संपादकीय) 

 

'घोडगंगा सहकारी साखर कारखान्या' चा प्रश्न अखेर मा. श्री. शरदचंद्र पवार सोडवणार असा आशावाद घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे पिडीत शेतकरी कुटुंबांना निर्माण झाला आहे, असे चित्र दिसत आहे. या 'भिष्म प्रतिज्ञेतुन मा. श्री. शरद पवार एका बाणात दोन पक्षी मारले आहेत असे म्हणायला हरकत नाही. 
श्री.अशोक पवार

 

घोडगंगा सहकारी साखर कारखान्या’ चा प्रश्न अखेर आदरनीय श्री. शरदचंद्र पवार सोडवणार असा आशावाद घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे पिडीत शेतकरी कुटुंबांना निर्माण झाला आहे, असे चित्र दिसत आहे. या ‘भिष्म प्रतिज्ञेतुन आदरनीय श्री. शरद पवार एका बाणात दोन पक्षी मारले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

घोडगंगा बाबत मा.शरद पवार यांची ‘भिष्म प्रतिज्ञा’. …

घोडगंगा सहकारी साखर कारखाना कसा सुरू होत नाही हे मी पाहतो.असे मा.शरद पवार यांनी म्हटले आहे.घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा कळीचा विषय बनलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तालुक्यामधील,शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत असा एक चित्र निर्माण करण्यात आलेले आहे. प्रत्यक्षामध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखाना आज बंद पडलेला आहे .त्यामध्ये विद्यमान आमदार श्री. अशोक पवार, जबाबदार आहेत.त्यांनी स्वतःचा ‘सोमेश्वर सहकारी साखर कारखाना नफ्यामध्ये चालवला असताना आणि ते स्वतः चेअरमन असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना मात्र बंद कसा पडला ? असा प्रश्न उपस्थित होवुन संपूर्ण हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण होण्यामध्ये याचा परिणाम झाला आहे. श्री.अशोक पवार यांच्या मतानुसार हा कारखाना त्यांच्यामुळे बंद पडलेला नसून राज्य सरकारने अर्थात् अजितदादा पवार यांच्या असहकार्यामुळे बंद पडलेला आहे. असे अशोक पवार यांनी सांगितले होते.’घोडगंगा

फडणवीस प्रणित ‘महानाट्य’. …

 

त्या आधीच्या राज्यामधील राजकारणात जे महानाट्य घडले.त्यानुसार अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.आणि ते राज्यामधील शिंदे- फडणवीस सरकारमधे सामिल झाले. त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार देखील सामील झाले. पण मुळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ हे चिन्ह देखील अजीत दादा पवार यांनी पळवुन नेले . असा विश्वास अनेक मराठी माणसांचा आहे. मात्र हे सर्व काही कायदा, न्यायालये, निवडुणक आयोग,विधानसभा अध्यक्ष यांनी कायद्यानुसार केले,नियमा नुसार केले आहे. झाले आहे. असे कागदोपत्री onpaper clear झाले आहे, असे सरकार कडुन सांगितले गेले होते . परन्तु नैतिकदृष्ट्या ते अनैतिक पद्धतीने काम पाडले गेले. असे बहुतांश मराठी माणसांना वाटले. वाटते. हे खरे आहे. या त ईडी, इंन्कम टैक्स, इ.सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. असे बहुसंख्येने मराठी माणसांचे मत आहे.

हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत….

हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळ शिवसेनेच्या बाबतीतही केले होते. असे ही मराठी माणसांचे मत बहुसंख्येने बनले आहे. पवार आणि ठाकरे कुटुंबे त्यांच्या घरात फुट पाडून तोडली गेली. असे देखिल मराठी माणसांचे मत आहे. अर्थात् गद्दारी, धोकेबाजी हा मराठी माणसांचा मुळ स्वभाव नाही. आणि कुटुंबांत कलह निर्माण करून घर फोडणे मराठी माणसांना आवडत नाही. ‘घरफोड्या’ मराठी माणसांना आवडत नाही. पर्यायाने भारतीय जनता पक्ष, फडणवीस,केंद्र सरकार, ईडी, निवडणुक आयोग हे मराठी माणसासाठी खलनायक ठरले !

अजितदादा यांचीही अशोक पवार यांच्या बाबतीत ‘भिष्म प्रतिज्ञा’. ..

'घोडगंगा सहकारी साखर कारखान्या' चा प्रश्न अखेर मा. श्री. शरदचंद्र पवार सोडवणार असा आशावाद घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे पिडीत शेतकरी कुटुंबांना निर्माण झाला आहे, असे चित्र दिसत आहे. या 'भिष्म प्रतिज्ञेतुन मा. श्री. शरद पवार एका बाणात दोन पक्षी मारले आहेत असे म्हणायला हरकत नाही. 
श्री.अजित दादा ‘पवार’ 

 

शिरुर हवेली चे आमदार अजितदादांबरोबर गेले नाहीत. मा.शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. हे मराठी माणसांस आवडणारी बाब नक्कीच होती.ती शिरुर हवेलीत देखील असणार ! पण अजितदादा ‘अशोक पवार हे कसे निवडुन येतात तेच पाहतो’ असे म्हणाले. अशोक पवार शिरुर हवेली विधानसभा निवडणूक मतदार संघात निवडुन येतील असे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आहेत. एकनिष्ट आहेत. त्यामुळे ते महाआघाडीचे उमेदवार आहेत. भक्कम आहेत. निवडुन येण्याजोगे उमेदवार म्हणून उम्मेदवार आहेत. पण त्यांचा एक विक पोईंट निघाला. घोडगंगा साखर कारखाना बंद झाला होता. त्याचे संचालक अशोक पवार हे होते. इतरही काही आर्थिक मुद्यांबाबत अशोक पवार यांच्यावर आक्षेप आहेत. ते विरोधांकी मोठ्या ताकतीने उचलले. शिरुर शहर व शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघांतील अनेक गावांमधे ‘अशोक पवार चोर है’ अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. तो एक विरोधकांकडून मोठा तोफगोळा अशोक पवार यांच्यासाठी होता.

मा.शरद पवार यांनी शोधुन काढली ‘घोडगंगा ‘ प्रश्नावर मात्रा…

आता अशा परिस्थितीत मा. शरद पवार यांना हा मुद्दा लक्षात येणार नाही असे कदापी होणारं नाही. तो परत सुरु करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. हे सरळ आहे. नाही तर या मुद्यावर बरेच मतदार प्रभावित होतील असा विश्वास सर्वांना वाटतो.

एका दगडात दोन पक्षी. ..

पण शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत .बंद पडलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना आपले सरकार आले तर सुरु करणार आहे अशी एक ‘भिष्म प्रतिज्ञा’ च शरद पवार यांनी केली. ते शब्द पाळणार नाहीत असे देखिल म्हणता येणार नाही. दुसरे हे की निवडुन आल्यानंतर म्हणजे अशोक पवार यांना निवडुन द्यावे लागेल. असा ही एक दमच (?) या कारखान्याच्या पिडीत शेतकरी यांना दिला आहे. त्यामुळे या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हा मतदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे फिरु शकतो.अथवा फिरणार !

थोडक्याच अशोक पवार यांचे संभाव्य नुक्सान बरेच  टळणार ! असेच सध्या तरी दिसते !

About The Author