शिरूर येथे सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम संपन्न !
शिरूर येथे सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 'संविधान दिना' निमित्त हा 'संविधान वाचना' चा कार्यक्रम शिरुर शहरामधील सिद्धार्थ नगर येथे संपन्न झाला.
शिरूर येथे सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम संपन्न !
शिरूर नगर मधील सिद्धार्थ नगर येथे सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम साजरा !
शिरुर,दि.26 नोव्हेंबर : ( कल्पना पुंडे यांच्याकडुन)
डा.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व संविधानाची उद्देशिका.
शिरूर येथे सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ‘संविधान दिना’ निमित्त हा ‘संविधान वाचना’ चा कार्यक्रम शिरुर शहरामधील सिद्धार्थ नगर येथे संपन्न झाला.
संविधान किंवा कोनतेही तत्वज्ञान हे माणुस बदलण्यासाठी असते.हे बदलणे बाह्यजगतातील परिस्थिती बदलणे नसते.अंतर्यामीचे
26 नोव्हेंबर : संविधान दिवस का?
प्रत्येक देशाला त्याचे एक संविधान असते. त्या संविधानानुसार तो देश चालतो. भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत मंजूर करण्यात आले होते. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये संविधान दिवस म्हणून पाळला जातो. साजरा केला जातो. भारताच्या संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ,सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शामाप्रसाद मुखर्जी ,मौलाना अब्दुल कलाम आझाद असे मान्यवर सदस्य होते.
Dr.Not in Pawar, Editor -satyashodhaknews.com
“भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आज देशांमध्ये तशी पाहिली तर अनेक सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक वगैरे आंदोलने चाललेली आहेत. असतात. परंतु सर्वात प्राथमिकता देऊन, पहिली प्राधान्यता म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्वारा मतदान करण्याची पद्धत बंद करणे यासाठी सर्वात आधी देशव्यापी आंदोलन करणे आवश्यक आहे.
अमेरिकेसारख्या देशांमध्ये देखील ज्या वेळेस ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात येत असे. त्यावेळेस थोड्या लोकांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर तिथील सरकारने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्वारे मतदान करण्याची पद्धत बंद केलेली होती. मात्र भारतामध्ये याच पद्धतीने लाखो, करोडो लोकांचा याबाबत आक्षेप असताना भारत सरकार आणि निवडणूक आयोग बॅलट पेपर वर मतदान का घेत नाही ? याच्यामागे निश्चित काहीतरी ‘गौड बंगाल’ आहे.
ॲलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे ‘मॅन्युप्युलेट’ होऊ शकते. असे विधान केले होते आणि त्यानंतर त्यांच्या नव्या तंत्रज्ञानाला भारत सरकारने मान्यता देऊन त्याच्याशी इंटरनेटच्या बाबतीतील करार केलेला आहे. ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कदाचित ॲलन मस्कला याबाबत खात्रीशीर माहिती असावी . कारण अलन मस्क अत्यंत ‘जीनियस’ असा शास्त्रज्ञ आणि उद्योगपती देखील आहे. आणि त्यांनी थोडीशी वाच्यता केल्यानंतर तत्काळ त्याच्या कंपनीबरोबर करार करण्यात आला आणि त्याद्वारे आता इंटरनेट सेवा अत्याधुनिक पद्धतीने भारतामध्ये उपलब्ध होणार आहे. यातून देखील एक प्रकारचा मेसेज मिळत आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे ‘मन्युप्युलेट’ होऊ शकते.
याबाबत कोणावर काही आरोप करण्याचा उद्देश आमचा हेतु नाही. परंतु बॅलेट पेपरवर मतदान करण्याची पद्धत सुरू केली पाहिजे. असे आमचे मत आहे आणि त्यासाठी देशातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. आणि एकदाच या सगळ्या शंका कुशंका दूर होऊन पारदर्शक मतदान पद्धतीने भारतामध्ये सुरळीतपणे सुरू होईल आणि त्यामुळे भारतातील लोकशाही बळकट होईल यासाठी हे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते.”
संविधानातील तत्वे आचरणात आणण्यासाठी. …
संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. भारताच्या संविधानामध्ये सुरुवातीला संविधानाची उद्देशिका लिहिलेली आहे. संविधानाची उद्देशिका ही भारतीय संविधानाचा सारांश आहे. यामध्ये मूलभूत अशी हजी तत्वे आहेत. जी भारतीय नागरिकांनी डोळ्यासमोर ठेवून ती तत्वे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही दिलेली आहे. भारतीय संविधान तयार होण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला होता. भारतीय संविधान आणि जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपाचे संविधान आहे. भारतीय संविधान हे आजही जगामध्ये सर्वात उत्कृष्ट असे संविधान मांडले जाते. कारण अनेक प्रकारच्या विविधता भारतामध्ये असून देखील भारत एक संघ ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने पार पडलेले आहे.
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा. ——- अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा. —– आपला, डा.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज, satyashodhak.blog
आपले सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे आपण कोणती ध्येय गाठण्यासाठी जगले पाहिजे. याची जाणीव प्रत्येक भारतीय नागरिकाला होणे आवश्यक असते. संविधान दिनाच्या निमित्ताने दरवर्षी आठवण सर्वांना व्हावी या उद्देशाने ‘संविधान दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाला ‘भारताचा कायदा दिवस ‘ म्हणून देखील मानले जाते. 1915 मध्ये 26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करायला सुरुवात होऊ लागली .
मान्यवरांची उपस्थिती….
या कार्यक्रम प्रसंगी सतिश बागवे,संदिप शिंदे, शिवाजी पवार,किरण दिवटे, साहिल सोनवणे, रोहन सोनवणे, दिपक कांबळे, ज्ञानेश्वर शेलार,पंडित ससाणे,प्रकाश डंबाळे,राजाराम तराळ,बुआ जगताप,सोमनाथ सुतार,हेमंत लोखंडे,शिवा दिवेकर,गौतम गायकवाड,मायाताई गायकवाड,साखरे मॅडम, करिश्मा बुलाखे,सिमा शिंदे,मोहिनी सुतार,किर्ती दिवटे,आरती सोनवणे,बबई नाडे,आशाताई पवार,फुलाबाई धोत्रे,सुनिता भापकर हे मान्यवर उपस्थित होते.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com