Contents1 Shirur News Accident :शिरूरमधील भीषण अपघातात दोन मृत, एक जखमी; डंपर चालक पसार1.0.1 Shirur News Accident मधे सागर संभाजी कोळपे आणि यश सुधाकर भिसे मृत्यूमुखी —1.0.2 शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल—-1.0.3 Shirur News Accident अपघातातील चालक अपघात स्थळावरून फरार—1.0.4 वाचकांसाठी सूचना —-1.0.5 ताज्या बातम्यांसाठी भेट द्या:1.0.6 About The Author1.0.6.1 Dr.Nitin Pawar1.0.7 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur News Accident :शिरूरमधील भीषण अपघातात दोन मृत, एक जखमी; डंपर चालक पसार शिरूर, पुणे (18 मे 2025): (Satyashodhak News Report) Shirur News Accident हा शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे 17 मे 2025 रोजी रात्री 8 वाजता भीषण अपघात झाला. भरधाव डंपर (MH 42 SEQ 7696) ने रॉन्ग साईडने येत समोरून येणाऱ्या पिकअप (MH 03 OE 0638) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. Shirur News Accident मधे सागर संभाजी कोळपे आणि यश सुधाकर भिसे मृत्यूमुखी — मृतांमध्ये सागर संभाजी कोळपे (वय 28, रा. मांडवगण फराटा) आणि यश सुधाकर भिसे (वय 12, सध्या रा. मांडवगण फराटा, मूळ रा. खेडवाडी, जि. बीड) यांचा समावेश आहे. तर अनिल बीरा कोळपे हे जखमी झाले आहेत. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल—- या घटनेची तक्रार दादा बाळासो कोळपे (वय 38, रा. मांडवगण फराटा) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून गुन्हा नंबर 341/2025 अंतर्गत संबंधित डंपर चालकाविरुद्ध कलम 281, 106(1), 125(अ)(ब), 324(4)(5), मोटार वाहन कायदा 184, 134/177 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Shirur News Accident अपघातातील चालक अपघात स्थळावरून फरार— Shirur News Accident : शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर. घटना घडल्यानंतर डंपर चालक अपघात स्थळावरून फरार झाला. तपास पोसई नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी पो.नि. संदेश केंजळे (शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी घटनेची माहिती दिली आहे. वाचकांसाठी सूचना —- आपण अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा आणि ट्रॅफिक सेफ्टीबाबत जागरूक राहा. ताज्या बातम्यांसाठी भेट द्या: satyashodhak.blog महाराष्ट्र पोलीस – अधिकृत संकेतस्थळ गूगल मॅप्स ट्रॅफिक अपडेट पुणे ग्रामीण पोलीस फेसबुक पेज सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… Shirur Crime News Kanhur Mesai: कोकरूच्या कारणावरून तलवारीनं हल्ला; शेतकऱ्यावर जीवघेणा प्रहार Motorcycle Theft Shirur Amdabad :शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथून एका शेतकऱ्याची मोटारसायकल चोरीस! About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur News Ganja Case:शिरूर मधे लागोपाठ दुसरा ‘गंजाडी’ पोलिसांच्या तावडीत?२५ वर्षीय युवक अमली पदार्थासह अटक Shirur News Cheating 4 Laksh Case: चार लाखांची विश्वासघातकी फसवणूक; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल