श्रीगोंदा येथील बेपत्ता तरुण लखन बाळासाहेब गुळीक यांचा फोटो
Contents
Missing Man Shrigonda Ahmednagar Case Lakhan Gulik
4 May 2026 : प्रतिनिधी
Missing Man Shrigonda Ahmednagar या अहिल्यानगर जिल्ह्यातील केसमधे श्रीगोंदा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जोशी वस्ती, श्रीगोंदा कारखाना येथे राहणारे लखन बाळासाहेब गुळीक (वय 36 वर्ष) हे 11 जानेवारी 2026 पासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या आई नंदाबाई बाळासाहेब गुळीक (वय 55 वर्ष) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Missing Man Shrigonda Ahmednagar: घटनेचा आढावा
नंदाबाई गुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या आपल्या मुलगा लखन आणि नातू कृष्णा यांच्यासोबत राहतात. कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. लखनची पत्नी रतनमाला ही मागील एक वर्षापासून वेगळी राहत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
घटनेच्या दिवशी 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता लखन गुळीक हे काष्टी येथील निकम हॉटेलमध्ये कामासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. आईने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, 12 जानेवारीपर्यंत फोन लागत होता, मात्र त्यांनी फोन उचलला नाही.
यानंतर नंदाबाई यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली.मात्र कोणालाही लखनबाबत काही माहिती मिळाली नाही. त्यांनी काष्टी येथील निकम हॉटेलमध्ये जाऊनही चौकशी केली असता, हॉटेल मालकाने सांगितले की लखन 11 जानेवारीच्या रात्री हॉटेलवर होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ते तेथून निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
बेपत्ता लखन गुळीक यांचे सविस्तर वर्णन
लखन गुळीक यांचे वर्णन देताना नंदाबाई यांनी सांगितले की, त्यांची उंची सुमारे 165 सेंटीमीटर आहे. त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट (काळ्या रेषांसह), निळ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात बूट आणि सोबत हिरव्या रंगाची पिशवी घेतलेली होती.
कुटुंबियांची जीवाला धोका असल्याची भीती
तसेच, नंदाबाई गुळीक यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांच्या मुलाच्या जीवाला त्याची पत्नी रतनमाला आणि तिच्या तीन बहिणींकडून धोका असल्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तात्काळ तपास सुरू करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, रतनमाला ही सध्या शिरूर येथे तिच्या मेव्हण्याकडे राहत असून, गणेश करडे यांच्या घरी राहून धुणी-भांडीची कामे करून उपजीविका करत असल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीगोंदा पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस अधिक तपास करत असून, लखन गुळीक यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
‘ सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या वाचा —-
Shirur News Missing: शिरूरमधून 21 वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; 5 तोळे सोने बरोबर नेले?
Shirur Missing News: शिरूरमध्ये 18 वर्षीय युवक बेपत्ता; विराज चौधरीचा शोध सुरू
Shirur Crime Breaking:शिरूर तालुक्यात क्रिकेट स्पर्धेतून वाद; पिस्तुलातून फायरिंग, 7 जणांवर गुन्हा
