Contents1 Shirur Farmer Suicide Case ने अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर2 संध्याकाळचा ‘तो’ फोन आणि क्षणात बदललेले आयुष्य—-3 पोलिसांकडून तपास सुरू4 ग्रामीण वास्तवाचा कठोर चेहरा—5 समाजाने आता जागं होण्याची गरज—6 प्रशासन आणि समाजासाठी मोठा इशारा6.1 आणखीन, ‘सत्यशोधक स्थानिक ‘बातम्या वाचा–6.2 🙏 सत्यशोधक न्यूजला सहकार्य करा6.3 About The Author6.3.1 Dr.Nitin Pawar Shirur Farmer Suicide Case ने अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर 15 मे 2026 : प्रतिनिधी Shirur Farmer Suicide Case ने पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव हे गाव गुरुवारी संध्याकाळी वेदनादायी घटनेने सुन्न झाले. दिवसभर शेतात राबणारा, कुटुंबासाठी झटणारा आणि गावात साध्या स्वभावासाठी ओळखला जाणारा भास्कर पाटीलबुवा मचाले,वय -51 वर्ष यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली. या Shirur Farmer Suicide Case मुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील मानसिक ताण, आर्थिक दबाव तसेच एकटेपणाचा प्रश्न चर्चेत आला आहे. गावातील लोक अजूनही या घटनेवर विश्वास ठेवू शकत नाहीत.अशी परिस्थिती आहे. कारण काही तासांपूर्वीच गावातील काही लोकांशी बोलणारे भास्कर मचाले अचानक इतके टोकाचे पाऊल उचलतील, याची कुणालाच कल्पना नव्हती.त्यामुळे अनेक शन्का कुशन्का नागरिक व्यक्त करत आहेत. संध्याकाळचा ‘तो’ फोन आणि क्षणात बदललेले आयुष्य—- ‘सत्यशोधक’ ला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक 14 मे 2026 रोजी सन्ध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भास्कर मचाले यांचा मुलगा निखील याने कुटुंबीयांना फोनद्वारे वडिलांनी शेतातील झाडाला गळफास घेतल्याची माहिती दिली. हा फोन मिळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. भाऊ रामदास मचाले हे तातडीने त्या शेताकडे धावले. शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने भास्कर मचाले त्यांना लटकलेल्या अवस्थेत दिसले.त्यानंतर कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ त्यांना खाली उतरवले. गावातील चैतन्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच ते मृत झाल्याचे घोषित केले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. एका शेतकरी,कष्टकरी व्यक्तीचा असा अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.शांत स्वभावाचा माणूस, पण आतून तुटत होता का?— भास्कर मचाले हे शेती करत होते. गावातील लोकांच्या मते ते अत्यंत शांत, मनमिळावू,कोणाशीही वाद न घालणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल का उचलले असावे ?हा प्रश्न सध्या गावात चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी आर्थिक अडचणी, शेतीतुन अनिश्चित उत्पन्न, वाढती महागाई, कर्जाचा ताण तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे मानसिक तणावाखाली जगत आहेत. अनेक वेळा हा ताण बाहेरून दिसत नाही.पण आत्महत्या किंवा खुन यासारख्या कृती करण्याआधी व्यक्तीच्या मनात दिर्घकाळ धुममुस चालू असते. असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. गावात हसतमुख दिसणारा माणूस आतून किती खचलेला आहे, हे त्याच्या जवळच्या लोकांनाही बर्याच वेळा समजत नाही. ही घटना देखील अशाच एखाद्या दडपणाची परिणती तर नाही ना, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अ.मयत रजिस्टर नं.75 /2026 असा आहे.बीएनएस कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. खबर रामदास पाटीलबुवा मचाले यांनी दिली.पोलीस हवालदार बनकर यांनी नोंद प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खबाले हे करत आहेत. प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुटुंबीयांचे जबाब व इतर परिस्थितीजन्य बाबींची पडताळणी केली जात आहे. ग्रामीण वास्तवाचा कठोर चेहरा— Shirur Farmer Suicide Case ही केवळ एक पोलिस नोंद नाही.ग्रामीण समाजातील वाढत्या मानसिक व कदाचित आर्थिक तणावाचे वास्तव दाखवणारी घटना आहे. शेतकरी हा समाजाचा अन्नदाता नसतो. तो एका कुटुंबाचा आधारही असतो. जेव्हा तोच खचतो, तेव्हा पूर्ण कुटुंब अंधारात ढकलले जाते. आज ग्रामीण भागात शेती करणे कठीण बनत चालले आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चात वाढ, बाजारातील अस्थिरता, आर्थिक असुरक्षितता यामुळे अनेक शेतकरी मानसिकदृष्ट्या थकलेले आहेत.पण मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याची संस्कृती व जागृती अजूनही ग्रामीण समाजात फारशी विकसित झालेली नाही. अनेकदा “बरं आहे” म्हणणारा माणूस आतून मदतीसाठी झगडत असतो. पण त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचत नाही. समाजाने आता जागं होण्याची गरज— इनामगावातील ही घटना अनेकांना अस्वस्थ करून गेली आहे. गावातील नागरिक, नातेवाईक मित्रपरिवार अजूनही या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. एका व्यक्तीच्या जाण्याने केवळ एक जीव संपत नाही. अनेक नाती तुटतात.अनेक स्वप्नं भन्गतात. ग्रामीण भागात मानसिक आरोग्य, ताणतणाव, समुपदेशन याबाबत अधिक जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती शांत दिसत असली तरी तिच्या मनातील संघर्ष समजून घेण्याची संवेदनशीलता समाजात निर्माण नाही. ही सत्य बाब आहे. प्रशासन आणि समाजासाठी मोठा इशारा शिरूर तालुक्यात घडलेली शेतकरी आत्महत्या ही घटना प्रशासनासाठीही मोठा इशारा मानली जात आहे. केवळ आर्थिक मदत पुरेशी नाही. मानसिक आधार, समुपदेशनाची यंत्रणा ग्रामीण पातळीवर मजबूत करणे आवश्यक आहे. गावागावांत आरोग्य शिबिरे, मानसिक आरोग्य जनजागृती मोहीम, शेतकऱ्यांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध झाल्या तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात. भास्कर मचाले यांच्या मृत्यूने इनामगावात एक वेदनादायी शांतता आहे. शेतातील त्या लिंबाच्या झाडाकडे पाहताना गावकऱ्यांच्या डोळ्यांत आजही असंख्य प्रश्न दिसतात — “नेमकं असं काय घडलं असेल?” आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे, “आपण वेळेत कुणाला वाचवू शकतो का?” आणखीन, ‘सत्यशोधक स्थानिक ‘बातम्या वाचा– Shirur Crime News: न्हावरे गावात शेतजमिनीच्या वादातून देशमुख कुटुंबीयावर हल्ला – 4 जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई Breaking Shirur Crime: महाशिवपुराण कथेदरम्यान महिलेचा संशयास्पद मृत्यू — सत्य दडपले जात आहे का? 🙏 सत्यशोधक न्यूजला सहकार्य करा स्वतंत्र, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी तुमचे आर्थिक सहकार्य महत्त्वाचे आहे. ☕ Support Now आपले छोटे सहकार्यही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे ❤️ About The Author Dr.Nitin Pawar Dr. Nitin Pawar is the Founder & Editor of Satyashodhak Blog. He writes on social justice, education, politics and current affairs with a bold, analytical and ground-level perspective. डॉ. नितीन पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण व निर्भीड लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशन Amreen Tariq Mirza Missing Pune – शिरूर पोलीस शोध सुरू